मुंबई – पार्श्वगायन क्षेत्र खूप मोठी स्पर्धा असते. प्रत्येक क्षेत्रात पुढे जायचे असते. परंतु त्यांच्या मध्ये स्नेहपूर्ण आणि प्रेमाचे संबंध देखील असतात. याचा प्रत्यय नुकताच एका रियालिटी शोमध्ये आला. वास्तविक या ठिकाणी दोन्ही व्यक्ती प्रसिद्ध असून त्यांनी एकमेकासोबत बदला घेतला असे म्हटले असले तरी यामध्ये गमतीचा भाग होता. काय होता हा किस्सा…
त्याचे असे झाले की, ज्येष्ठ पार्श्वगायक कुमार सानू यांनी अलीकडेच ‘बाजीगर’ चित्रपटातील गाण्यात रॅप गाण्याची इच्छा असल्याचे उघड केले. ‘तुझे देखा तो’ आणि ‘चुरके दिल मेरा’ सारखी सुपरहिट गाणी गायलेल्या कुमार सानूने ‘सा रे ग म पा’ या टीव्ही शोमध्ये या आपल्या अपूर्ण राहीलेल्या स्वप्नाबद्दल सांगितले. कुमार सानू या शोमध्ये विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते.
त्याने कार्यक्रमात अनु मलिकचे ‘ये काली काली आंखे’ हे गाणे पुन्हा तयार केले आणि त्याचा रॅप भाग गायला.
तसेच शो मध्ये कुमार सानू म्हणाला, ‘मला खरोखरच अनु मलिकचा बदला घ्यायचा होता. कारण त्याने मला ‘ये काली कली आंखे’चा रॅप भाग गायला दिला नाही. कुमार सानू म्हणाले, ‘मी हे सहज करू शकलो असतो, पण त्याने मला ते करू दिले नाही. तेव्हापासून मला मनापासून इच्छा होती की एक दिवस मी गाण्याचा हा भाग गाऊन त्याचा बदला घेईन.
या रिअॅलिटी शोच्या एपिसोडमध्ये विशाल ददलानी, शंकर महादेवन आणि हिमेश रेशमिया जज बनले आहेत. तर अभिनेता आणि गायक आदित्य नारायण या शोचे सूत्रसंचालन करत आहेत आणि हा शो दर शनिवार आणि रविवारी रात्री 9 वाजता झी टिव्ही वर प्रसारित केला जातो. ‘सा रे ग म पा’ हा झी टीव्हीचा सर्वात जुना आणि सर्वात यशस्वी शो आहे.