इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सतत लाइमलाईटमध्ये असलेल्या कलाकारांना त्यांच्या विचित्र जीवनशैलीमुळे अनेक प्रकारच्या त्रासांना तोंड द्यावे लागते. तब्येतीच्या अशाच त्रासांना तोंड देऊन नुकतच कमबॅक केलेल्या योयो हनी सिंग याने आपले आजारपण आणि अन्य गोष्टींबाबत मनमोकळेपणाने चर्चा केली आहे. पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीपासून बॉलीवूडपर्यंत रॅपर म्हणून हनी सिंगची यशस्वी ओळख आहे. स्वतःच्या हिमतीवर त्याने त्याची जागा निर्माण केली आहे. मधल्या काही वर्षांमध्ये तो इंडस्ट्रीमधून पूर्णपणे गायब झाला होता. अनेकांना त्याच्याबद्दल काहीच माहीत नव्हतं. आता कमबॅक केल्यानंतर हनी सिंगने चाहत्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तर दिली आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने स्वतःला तोंड द्यावे लागलेला मानसिक आजार आणि वेदनादायी संघर्षावर पहिल्यांदाच उघडपणे बोलला आहे.
हनी सिंग सांगतो, “माझं करिअर पिक वर असताना मला अनेक आजारांनी घेरलं. शाहरुखबरोबर मी नुकतीच स्लॅम टूर केली होती. ‘स्टार प्लस’च्या प्रोजेक्टवर काम केलं होतं. ज्याचं नाव मी निवडलं होतं. हा संपूर्ण शो मी स्वतः डिझाइन केला होता. जेव्हा शो सुरू झाला तेव्हा माझ्याकडे खूप काम होतं. मी एक पंजाबी चित्रपटही करत होतो. आजूबाजूला बऱ्याच गोष्टी घडत होत्या. ‘रॉ स्टार’च्या सेटवर अनेकदा मला त्रास होत असे, पण तेव्हा काय आजार आहे, ही लक्षणे कसली आहेत, याबद्दल मला काहीच कल्पना नव्हती. पण माझ्या मेंदूमध्ये काहीतरी वेगळं घडतंय, हे मला जाणवत होतं. या काळात माझ्या कुटुंबीयांचा मला खूप आधार मिळाला. त्यांनी मला अनेकदा समजवायचा प्रयत्न केला. पण, मला फक्त यातून बाहेर पडायचंय, ठीक व्हायचंय, असं मी त्यांना निक्षून सांगितलं. या सगळ्यातून बाहेर पडायला मला जवळपास ५ वर्ष लागली.
बरं झाल्यानंतर मला म्युझिकवर काम करायचं होतं. पण माझ्यामध्ये आत्मविश्वास नव्हता. मी आईला म्हणालो, “मी काहीच करू शकत नाहीये असं मला वाटतंय.” तिने मला धीर दिला, आणि वेगळं काही ट्राय करायला सांगितलं. त्याप्रमाणे मी बीट्स लिहायला सुरुवात केली. मी लिहायला सुरुवात केली, गाणी हिट झाली पण मी कमबॅक करत असताना बरंच अपयश आलं. माझं वजन वाढलं होतं. लोकांनी माझा लूक नाकारला. गाणी हिट होत होती पण लोक मला स्वीकारायला तयार नव्हते.”
हनी सिंग ‘ब्राउन रंग’, अचको मचको’, ‘ब्लू आइज’, ‘देसी कलाकर’ या गाण्यासाठी ओळखला जातो. पंजाबी म्यूझिक इंडस्ट्रीसह हनीने बॉलिवूडमध्येही चांगलंच नाव कमावलं आहे. ‘कॉकटेल’, ‘सन ऑफ सरदार’, ‘रेस २’, ‘चेन्नई एक्सप्रेस’, ‘भूतनाथ रिटर्न्स’, ‘सिंघम रिटर्न्स’, ‘की अँड का’, ‘पागलपंती’ आणि ‘भूल भुलैया २’ यांसारख्या चित्रपटांसाठी हीट गाणी दिली आहेत.
https://twitter.com/asliyoyo/status/1595917567834456065?s=20&t=3HjKvlKdkJU_eNQHKNMCHQ
Singer Honey Singh Serious Disease Battle Details