इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – रिमिक्सच्या नावाखाली अनेक जुनी गाणी नव्या अवतारात आणली जातात. यावरून नुकताच फाल्गुनी पथक आणि नेहा कक्कर यांच्यात वाद रंगला होता. तो अजूनही शमण्याचे नाव घेताना दिसत नाही. ९० च्या दशकातील फाल्गुनीचे प्रसिद्ध गाणे ‘मैने पायल है छनकाई’च्या रिमेकनंतर नेहा सतत चर्चेत आहे.
या रिमेकनंतर नेहा कक्करला सोशल मीडियावर सारखं ट्रोल केलं जात आहे. गाण्याची मूळ गायिका फाल्गुनी पाठक हिनेही या नव्या व्हर्जनवर टीका केली आहे. यामुळेच यावरील वाद पेटला आहे. आता मात्र फाल्गुनीने आपल्या म्हणण्यात थोडा बदल करत रिमिक्स करण्याबाबत आपला काही आक्षेप नसल्याचे म्हटले आहे. मात्र, यातही तिची एक अट आहे.
लोकांना या गाण्याचं नवीन व्हर्जन आवडलेलं नाही. त्यावरून हा वाद रंगला आहे. फाल्गुनी पाठक हिने नेहाने कक्करने हे गाणे बनवल्याबद्दल तिचे मत व्यक्त केले आहे. ‘मिरची प्लस’ला दिलेल्या एका मुलाखतीत फाल्गुनीने याबद्दल आपले मत व्यक्त केले. नेहा कक्करचे नाव न घेता फाल्गुनी म्हणाली की, एखाद्या गाण्याचं नवीन व्हर्जन करायला काहीच हरकत नाही. पण ते करताना चांगल्या पद्धतीने करा. रिमिक्सही चांगले असावे. आहे ते गाणे खराब का करता, असा सवालही तिने उपस्थित केला आहे. या सगळ्यात तिने कुठेही नेहा कक्करचा उल्लेख केला नाही.
फाल्गुनीचे ‘मैंने पायल है छनकाई’ हे गाणे अजूनही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. आजही मी जेव्हा ते गाणे गाते तेव्हा मला प्रेक्षकांकडून तितकेच प्रेम मिळते, असे फाल्गुनी सांगते. प्रेक्षक या गाण्याचे नवीन व्हर्जन तयार करू शकतात. पण त्यांनी ते चांगल्या प्रतीचे केले पाहिजे. मूळ गाण्याची सुंदरता आणि त्याचा साधेपणा याला कुठेही धक्का लागता कामा नये, अशी इच्छाही फाल्गुनी यांनी व्यक्त केली.
नेहा कक्करचे ‘ओ सजना’ हे नवीन गाणे रिलीज झाले आहे. हे गाणे ‘मैंने पायल है छनकाई’चा रिमेक आहे. नेहासह क्रिकेटर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा आणि अभिनेता प्रियांक शर्मा हे देखील यात आहेत. रिमिक्ससाठी प्रसिद्ध असलेल्या तनिष्क बागचीने हे नवीन व्हर्जन संगीतबद्ध केलं आहे. मात्र, हे गाणे प्रसिद्ध झाल्यापासून नेहा कक्करला प्रचंड ट्रोल केले जात आहे. तिचं हे गाणं कोणालाच आवडलेलं नाही. त्यावरून फाल्गुनी पाठक हिने नेहावर आक्षेप घेतला होता.
https://www.instagram.com/reel/CipWFZeAmDY/?utm_source=ig_embed&ig_rid=f4b49a8b-1e18-4f99-aae9-80b0d3454660
Singer Falguni Pathak U turn Remix Song
Entertainment Songs Neha Kakkar