इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची स्वतंत्र एक ओळख आहे. त्यांना गायनाची विशेष आवड आहे. वेळात वेळ काढून आपली ही आवड त्या जोपासताना दिसतात. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने त्यांनी एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आणि नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच ट्रोल केले आहे.
सोशल मीडियावर त्या नेहमीच सक्रिय असतात. सोशल मीडिया अकाऊंटद्वारे त्या विविध पोस्ट शेअर करताना दिसतात. सोशल मिडीयावर याआधीही त्यांची अनेक गाणी प्रदर्शित झाली आहेत. काही दिवसांपूर्वीच अमृता फडणवीस यांच्या आवाजातील ‘मूड बना लिया’ गाणं प्रदर्शित झालं. व्हॅलेंटाईन डेनिमित्त अमृता फडणवीस यांनी त्यांच्या चाहत्यांना शुभेच्छा देताना ‘मूड बना लिया’ गाण्याचा एक व्हिडीओही शेअर केला आहे. अमृता यांच्या या गाण्याला युट्यूबवर ५० मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्यांनी पुन्हा एकदा या गाण्याचा व्हिडीओ शेअर करत हे गाणं ऐका असं म्हटलं आहे.
अमृता फडणवीस म्हणाल्या, “व्हॅलेंटाईन डेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हे या दिवसासाठी अगदी परफेक्ट गाणं आहे. हे गाणं ऐका आणि बघा”. अमृता यांचा हटके अंदाज या गाण्यामध्ये दिसतो. अमृता यांनी यात गाण्याबरोबरच डान्सही केला आहे. नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहून अमृता यांना ट्रोल केलं आहे. ‘हे गाणं ऐकल्यावर कानाचे पडदे चेक करा, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’, ‘महाराष्ट्रामध्ये असलं काही चालणार नाही’, ‘देवेंद्र फडणवीस तुमच्यासाठी वाईट वाटतं’ अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. अमृता यांनी याआधीही गाण्यांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. ‘वो तेरे प्यार का गम’, ‘शिव तांडव स्रोतम’, ‘तेरी मेरी फिर से’, ‘बेटिया’ या त्यांच्या गाण्यांना लोकप्रियता मिळाली होती.
https://twitter.com/fadnavis_amruta/status/1625414037604548609?s=20&t=zA2qz7d77GI58zzUVJcfFg
Singer Amruta Fadnavis Valentine Day Video Post Troll