इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या काही ना काही कारणांनी नेहमीच चर्चेत असतात. अलीकडे त्या आपल्या गाण्यांमुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच त्यांचं ‘मूड बना लिया’ हे गाणं प्रदर्शित झालं. आता त्या पाठोपाठ प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून अमृता यांचं एक देशभक्तीपर गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
अमृता फडणवीस सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. सामाजिक विषयांवरचे मत त्या परखडपणे मांडतात. त्या एक उत्तम गायिकाही आहेत. त्यांची सगळीच गाणी चर्चेत येतात. प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून एक देशभक्तीपर गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आणलं आहे. याची माहिती त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दिली.
अमृता फडणवीस सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत त्या त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी त्यांच्या चाहत्यांना सांगत असतात. आता त्यांनी नुकतीच या गाण्याची एक छोटीशी झलक सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना हे सरप्राईज दिलं. आगामी ‘भारतीयन्स’ या चित्रपटातील देशभक्तीपर गाण्याला अमृता फडणवीस यांनी आपला आवाज दिला आहे. ‘सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा’ असे त्या गाण्याचे बोल आहेत. प्रजासत्ताक दिनी हे गाणे रिलीज करण्यात आले आहे. अमृता यांचे हे गाणे चाहत्यांच्या पसंतीस पडले असून लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.
गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात बॉलिवूड चित्रपट निर्माते-दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ‘भारतीयन्स’ चित्रपटाचा टिझर लाँच केला होता. ‘भारतीयन्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शन दीन राज यांनी केले आहेत. या चित्रपटाद्वारे ते बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. ‘भारतीयन्स’ची कथा भारतातील विविध प्रदेशांतील सहा तरुणांच्या एका ग्रुपभोवती फिरते.
अमृता फडणवीस यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ त्यांच्या नव्या गाण्याचा ट्रेलर आहे. या गाण्यात त्या पारंपारिक वेशभूषेत आहेत. हे गाणं शेअर करत अमृता फडणवीस यांनी लिहिलं, “तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या खूप शुभेच्छा! आगामी ‘भारतीयन्स’ या बहुभाषिक चित्रपटासाठी ‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा’ हे देशभक्तीपर गाणे गाणं हा मोठा सन्मान होता. श्री सत्य कश्यप यांचं अंगावर शहारा आणणारं हे संगीत सर्वांनी ऐकायलाच हवं.” असंही त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
काही दिवसांपूर्वीच अमृता फडणवीस ‘मूड बना लिया’ या गाण्यामध्ये झळकल्या होत्या. या गाण्यात त्यांचा हटके अंदाज दिसून आला. त्यापाठोपाठ आता लगेचच त्यांचं हे ‘सारे जहाँसे अच्छा’ हे गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्याला देखील भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ६ जानेवारी रोजी हे गाणे रिलीज झाले. रिलीज होताच गाण्याला २.३ कोटी व्ह्यूज मिळाले होते.
Singer Amruta Fadnavis Release Patriotic Song Release