मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस एखाद्या महिन्यात चर्चेत नसतील, असं कधीच होत नाही. अलीकडेच त्यांना कटघऱ्यात उभं करून काही सवाल-जवाब करण्यात आले. त्यात त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. यात उत्तर देता देता त्यांनी ‘आधुनिक भारताचे राष्ट्रपिता नरेंद्र मोदी आहेत’ असे विधान केले होते. त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया आल्या. आता त्या चर्चेत आहेत ते त्यांच्या गाण्यामुळे.
अमृता फडणवीस यांचं एखादं गाणं येणार म्हटल्यावर तशीच चर्चा होते. आणि या गाण्याचे बोल तर ‘तेरे नाल ही नचणा वे’ असे आहेत. त्यामुळे अमृता फडणवीस नेमकं कुणाला उद्देशून हे म्हणत आहेत, यावर आता सोशल मिडियात चर्चा रंगायला लागली आहे. मुळात अमृता यांचं हे नवं गाणं आहे आणि ते ६ जानेवारीला आऊट होणार आहे. त्याबद्दलची पोस्ट त्यांनी सोशल मिडियावर शेअर केली आहे. आणि या गाण्याचे बोल आहेत… ‘अज मैं मुड बणा लेया ए ए ए…तेरे नाल ही नचणा वे’. आता असं काही वाचल्यावर किंवा ऐकल्यावर त्यांचे चाहते आणि विरोधक या दोघांच्या मनात एकच प्रश्न येणार तो… अमृता असं कुणाला उद्देशून म्हणत आहेत. मुळात यापूर्वीच्या अनेक गाण्यांप्रमाणेच हेही गाणं आहे आणि तेही चांगलच गाजणार आहे, असं अमृता यांच्या लुककडे बघून वाटतय. कारण अमृता यांनी सोशल मिडियाला जी पोस्ट टाकली आहे, त्यात डावीकडे एकदम मॉडर्न आणि उजवीकडे एकदम मराठमोळा लुक बघायला मिळतोय. पण नेटकऱ्यांना मराठमोळ्या लुकवर चर्चा करण्यात काहीच इंटरेस्ट नाही, ते डावीकडचा मॉडर्न लुकच बघणार. आणि तसेच सध्या सुरू आहे.
टी-सिरीजचं हे गाणं पूर्णपणे बॅचलर्ससाठी आहे, हे स्वतः अमृता यांनीच पोस्टमध्ये शेअर केलं आहे. पण चर्चा गाण्यापेक्षा त्यांच्या हटके लुकचीच आहे. कारण दिवाळीच्या निमित्ताने त्यांनी अत्यंत धार्मिक गाणं रिलीज केलं होतं. त्याशिवाय यापूर्वी हटके लुकमध्ये त्यांची काही गाणी येऊन गेली आहेत. त्यावर सोशल मिडियामध्ये बराच वादंग उठला आहे. त्यावरच्या प्रश्नांना स्वतः देवेंद्र फडणवीस यांनाही सामोरे जावे लागले आहे. पण आता या गाण्यामधील लुकसाठी आणि गाण्यासाठी अमृता आणि देवेंद्र या दोघांनाही विविध प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे, असे सध्यातरी सोशल मिडियातील परिस्थितीवरून वाटत आहे.
https://twitter.com/fadnavis_amruta/status/1609811864904663040?t=_BilObLpu_AiOHNxdMxAGw&s=03
Singer Amruta Fadnavis New Look Viral
Tseries New Song Punjabi Devendra Fadnavis