इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सुरांची दुनिया ही प्रत्येकाचीच आवडती. जगभरात सुरांमध्ये रमणारे कमी नाहीत. या सुरांच्या दुनियेत भारताचे स्थान नेहमीच वरचे असते. गायिका अलका याज्ञिक यांनी त्यांच्या कर्तृत्वाने भारताचा सन्मान वाढवला आहे. सलग तिसऱ्या वर्षी अलका याज्ञिक यांनी युट्यूबच्या स्ट्रिम लिस्टमध्ये पहिला क्रमांक मिळवला आहे. यामुळे त्यांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे.
टेलर स्विफ्ट, ड्रेक आणि बेयॉन्से यांसारख्या जगातील सर्वात प्रसिद्ध गायकांना मागे टाकत अलका यांनी युट्यूबवरील स्ट्रिम चार्टमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. २०२२ मध्ये नेटकऱ्यांनी अलका यांची गाणी सर्वाधिक ऐकली आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक त्यांच्या आवाजानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. अलका यांनी अनेक हिट गाणी दिली आहेत. अलका यांची गाणी फक्त भारतातीलच नाही तर जगभरातील प्रेक्षक आवडीनं ऐकतात.
सध्या इंटरनेटचा जमाना आहे. यात युट्युबवर गाणी ऐकण्याचं प्रमाण अधिक असते. गाण्यांचे खूप ऍप असले तरी बहुतांश लोक युट्युबवर गाणी ऐकणे पसंत करतात. यात अलाका यांची गाणी १५.३ बिलियन वेळा स्ट्रीम करण्यात आली आहेत. म्हणजेच, रोज सरासरी ४२ मिलियन वेळा त्यांची गाणी स्ट्रीम करण्यात येतात. गेली दोन वर्ष त्यांचे नाव या रेकॉर्डमध्ये आहे. अलका यांच्यानंतर या यादीत बॅड बन्नीच्या नावाचा समावेश आहेत. त्याला १४.७ बिलियन स्ट्रीम्स मिळाले. तर लिस्टमध्ये उदित नारायण (१०.८ बिलियन), अरिजीत सिंह (१०.७ बिलियन) आणि कुमार सानू (९.०९ बिलियन) यांचा देखील समावेश आहे.
अलका याज्ञिक ही मधुर गळ्याची गायिका ९०च्या दशकापासून प्रसिद्ध आहे. त्यांनी अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. माधुरी दीक्षित, जुही चावला, श्रीदेवी यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्रींसाठी गाणी गायली आहेत. अगर तुम चाहो, परदेसी परदेसी, गजब का है दिन, ताल से ताल मिला, चुरा के दिल मेरा, गजब का है दिन, सूरज हुआ मद्धम, अगर तुम साथ हो आणि एक दिन आप यूं हम को मिल जाएंगे… या अलका यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.
Singer Alka Yagnik First in World Most Stream Artist