नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिंचन भवन कार्यालयातील सहायक अधीक्षक अभियंत्यास ठेकेदाराने शिवीगाळ करून मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीची तक्रार लघू पाटबंधारे विभागातील फिर्यादी सहायक अधिक्षक अभियंता प्रदीप लोधे यांनी तक्रार दिली असून प्रशांत विश्वास देवरे, प्रशांत धात्रक यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. उंटवाडी येथील कार्यालयात पाच वाजता ही घटना घडली. या दोघांनी जबरदस्तीने लोधे यांच्या कार्यालयात घुसून महिला कार्यालयातील लिपीक माळी व फिर्यादी लोधे यांना शिवीगाळ केली. त्यानंतर दोघांनी लोधे यांच्या कानशीलात मारुन त्यांची गच्ची धरुन खूर्चीवर दाबून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर दोघा संशयितांनी तेथून पळ काढला. याप्रकारणी सरकारवाडा पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.