कानपूर (उत्तर प्रदेश) – ‘मानव सेवा हीच ईश्वर सेवा’ असे म्हटले जाते, कोरोना काळात जीव वाचविण्याच्या धडपडीत रुग्णांचा श्वास सुरू राहण्यासाठी शीख समाजाने अनोखी सेवा सुरू केली आहे. श्री गुरुसिंग सभा यांनी कानपूर शहरातील सर्व गुरुद्वार आणि शीख समाजातील सर्व धार्मिक व सामाजिक संघटनांच्या सहकार्याने ऑक्सिजन लंगर सेवा सुरू केली.
गुरुद्वारा कीर्तनगडच्या ग्रंथालयाबाहेर कोरोना बाधित रुग्णांसाठी नऊ बेडचे ऑक्सिजन अँकर बसविण्यात आले आहे. ही सुविधा विनामूल्य असून पहिल्या दिवशी, ४५ रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला. श्री गुरूसिंग सभा अशा रुग्णांना ऑक्सिजन प्रदान करीत आहे, खूप प्रयत्न करूनही रूग्णालयात बेड मिळत नाही आणि ऑक्सिजन सिलिंडरसाठी दररोज भटकंती करावी लागत आहे. त्यांच्या कारिता ही सेवा आहे, मात्र कोणालाही घरी ऑक्सिजन सिलिंडर दिले जाणार नाहीत, असे पदाधिकाऱ्यानी सांगितले. गरजू लोक लंगर येथे पोहोचू शकतात आणि सुविधेचा लाभ घेऊ शकतात. येथे त्यांना तीन ते चार तास ऑक्सिजन देण्यात येईल. यानंतर, बेड मिळताच येताच त्यांना रुग्णालयात दाखल करता येईल.
दरम्यान, श्री गुरुसिंग सभेचे अध्यक्ष हरविंदरसिंग लॉर्ड यांनी सांगितले की, दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत मोफत ऑक्सिजन लंगर सेवा चालविली जाईल. ऑक्सिजनचे संकट संपेपर्यंत ही सेवा चालणार आहे. या पवित्र कार्यात त्यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांनी पोलिस अधिकारी, जिल्हा दंडाधिकारी, उद्योगपती यांच्यासह शहरातील शिख सहकार्यांचे आभार मानले.