मुंबई – कोरोना संकटामुळे यावर्षी सर्व धर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. संपूर्ण राज्यात श्रीरामनवमी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. राज्यात सुरु असलेला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्रालय, मुंबई यांच्या 13 एप्रिलच्या आदेशातील तरतुदींच्या अधिन राहून यावर्षी 21 एप्रिल रोजी येणारा श्रीरामनवमी उत्सव साधेपणाने साजरा करणे आवश्यक आहे.
त्या अनुषंगाने गृहविभागामार्फत खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत.
श्रीरामनवमी लोक मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन साजरी करतात. परंतू यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोकांनी एकत्र न येता साधेपणाने आपआपल्या घरी श्रीरामनवमी उत्सव साजरा करावा.









