मथुरा – श्रीकृष्ण जन्मस्थान आणि शाही मशिद ईदगाह वादाचे परीघ वाढतच चालले आहे. मदिरामधील मूळ विग्रह आग्रा किल्ल्यातून आणून श्रीकृष्ण जन्मस्थानात ठेवावे, अशी मागणी अधिवक्त्यांनी वरिष्ठ जिल्हा न्यायालयात केली. आग्रा किल्ल्यामधील दिवाण ए खासच्या छोट्या मशिदीच्या पायऱ्यांखाली मूळ विग्रह दबलेले आहे, असा दावा करण्यात आला आहे. न्यायालयाने त्यावर सुनावणी करण्यासाठी १९ तारीख निश्चित केली आहे.
श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संस्थान आणि ईदगाहमधील करार चुकीचा आहे, असा दावा न्यायालयात करण्यात आला आहे. श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती आंदोलन समितीचे अध्यक्ष अधिवक्ता महेंद्र प्रताप यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दिले.
ठाकूर केशवदेव महाराज कटरा यांचे केशवदेव यांचे भव्य प्राचीन मंदिर उपरोक्त परिसरात होते. परिसराची जागा साधारण १३.३७ एकर होती. मुघल शासक औरंगजेबने मंदिर तोडून त्याच्या काही दगडांनी मंदिराच्या जागेवर ईदगाह मशिदीचा आराखडा बनवला. त्यामध्ये ठाकूर केशवदेव मंदिराच्या हिंदू स्थापत्य कला आणि मांगलिक चिन्हांचे दगडांना उलटवून मशिदीचा ढाचा बनवला. काही जागी दगड तसेच लावण्यात आले आहेत.
