नाशिक- ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात आज रामनवमी उत्सव साजरा होतो आहे..दर वर्षी हजारो भाविक हा जन्म सोहळा याची देखी अनुभवतात, मात्र यंदा देखील मंदिर बंद असल्याने भाविकांशिवाय रामजन्म सोहळा पार पडणार आहे. मंदिराच्या स्थापनेपासून यंदा सलग दुसऱ्यांदा मंदिर रामनवमीला बंद असणार आहे.
दरम्यान आज भाविक नसले तरी मंदिरातील निवडक पुजाऱ्यांच्या वतीने पहाटेपासूनच महा अभिषेक पूजन आणि इतर धार्मिक कार्यक्रमाना सुरुवात झाली आहे.. मंदिरातील गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे, तर श्रीराम, लक्ष्मण, सीता यांच्या मूर्तींना देखील साजशृंगार करण्यात आला आहे..
दुपारी १२ वाजता यंदाचे मानकरी विलास बुवा पुजारी यांच्या हस्ते श्रीराम जन्म होणार असून यंदा सलग दुसऱ्या वर्षी हजारो नाशिककरांना घरी बसूनच ऑनलाईन हा जन्म सोहळा पाहावा लागणार आहे..
https://www.facebook.com/watch/?v=296650035149405