इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – देवाधिदेव गणपती यांची आज संकष्टी चतुर्थी आहे. साधारण तीन प्रकारच्या चतुर्थी गणेश भक्तांकडून पाळल्या जातात. विनायक चतुर्थी, संकष्ट चतुर्थी ,गणेश चतुर्थी यांचा त्यात समावेश आहे.
प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्येनंतर येणाऱ्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात. पौर्णिमेनंतर येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. गणेश चतुर्थी ही फक्त माघ महिन्यामध्ये माघी गणपती उत्सव स्वरूपात साजरी केली जाते. या तिन्ही चतुर्थी दिवशी उपवास तसेच विविध गणेश व्रत करणारे लाखो गणेश भक्त जगभर आहेत.
चतुर्थी दिवशी मुख्यतः गणपती अथर्वशीर्ष सहस्त्रावर्तन त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी गणेश याग केले जातात. गणेश आरती नंतर मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. आज संकष्ट चतुर्थी आहे. यानिमित्त अनेक भाविक श्रीगणेशाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरांमध्ये जातात. तसेच, अनेक भक्त घरीच मनोभावे पुजा करतात.
संकष्ट चतुर्थीचे व्रत कसे करावे, का करावे, त्यामुळे घरात सुख, समृद्धी आणि शांतता कशी मिळते हे आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी बघा हा व्हिडिओ
Shri Ganesh Sankashti Chaturthi Puja Vrat Video
Celebration Festival Tradition Idol