श्रीअरविंद जीवनावर माहितीपट – नया जन्म
भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील अग्रणी, क्रान्तदर्शि आणि महायोगी श्रीअरविंद ह्यांच्या जीवनावर आधारित “नया जन्म” हा हिन्दी माहितीपट दूरदर्शन वरून प्रदर्शित करण्यात आले आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आणि श्रीअरविंद ह्यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त (जन्म १५ ऑगस्ट) हा विशेष माहितीपट तयार करण्यात आला आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त माहितीपट निर्माते व दिग्दर्शक अभिजीत दासगुप्ता यांनी नया जन्म ची निर्मिती केली आहे. याच्या इंग्रजी आवृत्तीचे नाव “The Transformation” असे आहे.
सुमारे तासाभराच्या या माहितीपटात, श्रीअरविंद ह्यांच्या क्रांतीकाळातील स्थानांवर जाऊन चित्रीकरण करण्यात आले आहे. क्रांतिकारक खुदिराम बोस यांनी मुझफ्फरपूर येथे केलेला बॉम्बस्फोट, प्रफुल्ल चाकी च्या बलिदानाची जागा, झारखंडमधील देवघर येथे करण्यात आलेला प्रायोगिक बॉम्बस्फोट, श्रीअरविंद ह्यांना बंदिवासात ठेवण्यात आलेले अलीपूर जेल, उत्तरपाडा, इत्यादी स्थानांचा यांत समावेश आहे. या माहितीपट खालीलप्रमाणे
ShreeArvind Documentary Naya Janma