श्रीविष्णु पुराण
अंश-५ (भाग-9)
रुक्मी आणि नरकासुराचा वध!
कृष्ण पारिजात पृथ्वीवर आणतो
रुक्मिणीला प्रद्युम्नाखेरीज आणखी दहा मुलगे आणि एक मुलगी झाली. त्यांची नावे चारुदेष्ण, सुदेष्ण, वीर्यवान, चारुदेह, सुषेण, चारुगुप्त, भद्रचारु, चारुविन्द, सुचारु, चारू अशी असून मुलीचे नाव चारूमति होते.
रुक्मिणीच्या व्यतिरिक्त कृष्णाच्या १. कालिंदी, २. मित्रविंदा, ३. सत्या, ४. रोहिणी, ५. भद्रा, ६. सत्यभामा आणि ७. लक्ष्मणा अशा राण्या होत्या. शिवाय आणखी १६०० स्त्रिया होत्या. रुक्मीची मुलगी व प्रद्युम्न यांनी परस्परांच्या संमतीने प्रेमविवाह केला. त्या दोघांना अनिरुद्ध नावाचा एक महाबलशाली व अजिंक्य असा पुत्र झाला. पुढे कृष्णाने त्याच्यासाठी रुक्मीची नात पत्नी म्हणून पसंत केली. कृष्णाबद्दल मनातून द्वेष असूनही रुक्मीने तो संबंध मान्य केला.
विवाहासाठी कृष्णासह बलराम व यादवांचे परिवार भोजकट नावाच्या रुक्मीच्या राजधानीत गेले. विवाह सोहळा पूर्ण झाल्यानंतर कालिंग वगैरे राजांनी रुक्मीला सांगितले की, हा बलराम तर जुगार जाणत नाही; मग याला जुगारातच जिंकून का घेऊ नये?
हा सल्ला रुक्मी;e मानवला!
त्याप्रमाणे दोघांमध्ये खेळ चालू झाला. पहिल्याच डावात डाव चालू झाला. त्या डावात बलराम दहा हजार निष्क हरला खो हसत कालिंग रुपमी चेष्टेने म्हणाले की, जुगार खेळता ये नसलेल्या या बलरामावर मी आज विजय मिळवला आहे. हा विनाकारण आम्हाला हसत होता. त्या प्रसंगी बलराम रागाने लाल झाला.
आणि रागाच्या भरात तावातावाने त्याने एक कोटी निकांचा पर लावला, तेव्हा रुक्मीने मुकाट्याने फासे उचलून फेकले, तो डाव मात्र बलरामाने जिंकला आणि गर्जना केली “शेवटी मीच जिंकली “
तेव्ही रुक्मी ओरडून बोलला – “बलरामा! खोटे बोलू नकोस, डाव मीच जिंकला आहे. मी खेळ तर सुरू केला पण डाव मान्य आहे असे बोललो नव्हतो, मग हा डाव दोघांचाही सारखाच आहे.”
त्या प्रसंगी आकाशवाणी झाली की “हा डाव बलरामानेच जिंकला आहे. रुक्मी खोटे बोलत आहे. बोलून मान्यता जरी दाखवली नसली तरी ज्या अर्थी फास उचलले व फेकले त्या अर्थी रुक्मीची मान्यता होती असे सिद्ध झाले आहे.”
तेव्हा बलराम रागाने ताडकन उठला आणि हातात फासे घेतले व रुक्मीच्या डोक्यावर प्रहार करून त्याला ठार केला.
कालिंगाला लाथाबुक्क्यांनी तुडवून त्याचे दात पाडले; मग एक भलाथोरला खांब उपटून घेतला आणि सगळ्या राजांना यथेच्छ झोडपून काढले. तेव्हा सर्वत्र पळापळ सुरू झाली. जो तो बाट फुटेल तिकडे पळाला.
तो सर्व समाचार श्रीकृष्णाला समजला तरीसुद्धा रुक्मिणीवरील प्रेमापोटी व बलरामाच्या रागाच्या भयाने तो मोठ्या मुत्सद्देगिरीने गप्प बसला.
नंतर सर्व वऱ्हाड द्वारकेत परतले.
नरकासुराचा अंत
एक वेळेस ऐरावतारूढ होऊन इंद्र श्रीकृष्णाला भेटण्यासाठी द्वारकेत आला. तेव्हा त्याने नरकासुराने केलेले अत्याचार सांगितले, प्राग्ज्योतिषपुर नगरात तो असतो. सर्व प्राण्यांना तो छळतो, देव, सिद्ध, असुर, मानव राजे अशा सर्वांच्या मुली पळवून त्याने कैदेत ठेवल्या आहेत,
त्याने वरुणाचे छत्र व मंदार पर्वताचे मणी नावाचे शिखर काढून नेले आहे. देवमाता अदिती हिची कुंडले त्याने काढून घेतली व आता ऐरावत मागतो आहे.
देवा! तू भक्तांचा कैवार घेऊन अरिष्ट, धेनुक, केशी वगैरे राक्षस मारलेस. कंस, कुवलयापीड हत्ती, पूतना अशा दुष्टांचा नायनाट केलास. तरी आता या नरकासुराचा कायमचा बंदोबस्त कर,
इंद्राची विनंती ऐकल्यावर कृष्ण हसला आणि त्याला निरोप दिला; मग सत्यभामेला सोबत घेऊन गरुडावर बसला व प्राग्ज्योतिषपुराकडे निघाला. त्या नगरीच्या सभोवार शंभर योजनांपर्यंत सर्वत्र मुर नावाच्या दैत्याने तीक्ष्ण धारेचे फास घातलेले होते.
कृष्णाने सुदर्शन चक्राने ते सर्व पाश छिन्नभिन्न करून टाकले. तेव्हा चवताळलेला मुरदैत्य, हयग्रीव, पंचजन अशा दैत्यांना घेऊन आपल्या सातहजार पुत्रांसह धावून आला. कृष्णाने सुदर्शन चक्राने त्या सर्वांचा संहार केला नंतर त्याचे नरकासुराशी युद्ध झाले व त्यात हजारो दैत्य सैनिकांसह नरकासुर मारला गेला.
तेव्हा अदितीची कुंडले घेऊन पृथ्वी येऊन हजर झाली व तिने सांगितले की, वराह अवतारात तिला त्याच्यापासून हा पुत्र झाला होता. त्यामुळे त्याचा जन्मदाता व मृत्युदाता कृष्णच आहे. तरी कृष्णाने त्या कुंडलांचा स्वीकार करून नरकासुराच्या वंशाचे रक्षण करावे. त्याच्या अपराधांची क्षमा करावी; कारण जे घडले ते त्याच्या भल्यासाठीच घडले आहे.
त्यावर कृष्ण ‘तथास्तु’ असे बोलला!
नंतर कृष्णाने नरकासुराच्या जामदारखान्यात बहुमोल अभी पाहिली. त्याचप्रमाणे बंदिवासात ठेवलेल्या सोळा हजार पाहिल्या तसेच चार दांतवाले सहा हजार हत्ती आणि एक्लीय लक्ष घोडे पाहिले, कृष्णाने नरकासुराच्या सेवकांकडून त्या सर्व वस्तू कि पोहोचल्या केल्या.
एवढे झाल्यावर त्याने मणि पर्वत आणि बरुणाचे छत्र घेतले व सत्यभामेला घेऊन गरुडावर बसून तो स्वर्गलोकात गेला,
कृष्ण पारिजात पृथ्वीवर आणतो
कृष्ण सत्यभामेसह वरुणाचे छत्र, मणि पर्वत घेऊन गरुडावर बसून स्वर्गात पोहोचला तेव्हा त्याने शंख फुंकला. तो आवाज ऐकताच देव तिथे आले व त्यांनी कृष्णाचे पूजन करून स्वागत केले.
कृष्ण लगेच तिथून उठला आणि देवांची जननी अदितीपाशी गेला, तिला नम्रपणे नमस्कार करून त्याने नरकासुराच्या वधाचा वृत्तान्त सांगितला आणि तिची कुंडले तिला परत केली,
तेव्हा आनंदित झालेली अदिती म्हणाली
“हे कमलनयना! भक्तपालका, सनातना, सर्व भूतव्यापका तुला माझा नमस्कार, मन, बुद्धी व इंद्रिये यांचा तू निर्माता असून गुणातीत तसाच गुणमय आहेस. एकमेवाद्वितीय अशा शुद्धसत्वरूपा! तू कल्पना, विकार व अवस्थांहून वेगळा आहेस. तरीही रात्र-दिवस, संध्या, पंचमहाभूतांसह अष्टधा प्रकृती तूच आहेस.
उत्पत्ती, पालन आणि लय या गोष्टी तीन देवांकडून तूच करवितोस. किटकांपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्व सजीव सृष्टी, चारी खाणींसहीत चार वाचा हा खरोखर तुझाच विस्तार आहे.
हे देवा! तुझी योगमाया तर अत्यंत विलक्षण आहे. ती भरकटायला लावते. सर्व प्रहह्मांडाला तिनेच व्यापून टाकले आहे. मुक्तिदायक अशा तुझी आराधना करून साधक तुझ्यापाशी सांसरिक गोष्टी मागतात. मी सुद्धा त्यांच्यासारखीच आहे. तेव्हा हे प्रभू कृपा कर आणि माझे अज्ञान न कर. मी तुला शरण आले आहे.”
त्यावर कृष्ण बोलला की, ती देवांची माता आहे म्हणून तिनेच त्याला शुभाशीर्वाद याचा, त्याप्रमाणे त्याने सत्यभामेसह जोडीने नमस्कार केला. तेव्हा तिला अदितीने चिरतारुण्याचे वरदान दिले नंतर अदितीच्या सांगण्यावरून इंद्राने कृष्णाची पूजा केली पण कल्पवृक्षाची फुले मात्र सत्यभामेला दिली नाहीत.
नंतर नंदनवनाची शोभा पाहत फिरत असताना श्रेष्ठ असा पारिजात वृक्ष त्यांना दिसला, तेव्हा सत्यभामा कृष्णाकडे हट्ट धरून बसली की, तो पारिजात द्वारकेत घेऊन चला. तुम्ही नेहमी सांगत असता की, माझ्यावर तुमचे सर्वात जास्त प्रेम आहे, तर एवढा माझा हट्ट पुरवा.
तेव्हा कृष्ण हसला व त्याने पारिजात उपटला आणि गरुडाच्या पाठीवर ठेवला, तेव्हा बागेच्या राखणदारांनी विनंती केली की, इंद्रपत्नी शची हिचा तो वृक्ष आहे. तरी तो नेऊ नये. नाहीतर मोठा बिकट प्रसंग उभा राहील. तुम्हाला सुखरूप परत जाता येणार नाही. इंद्र तर अवश्य युद्धाला तयार होईल,
त्यावर रागाने फणफणत सत्यभामा म्हणाली की, “हा वृक्ष समुद्रमंथनातून निघाला असल्यामुळे तो काही इंद्राची वैयक्तिक मालमत्ता नव्हे. इतरांनाही तो वापरण्याचा हक्क आहे. अरे माळ्यांनो! तुम्ही जाऊन शचीदेवीला सांगा की, जर तिच्या पतीची हिंमत असेल तर माझ्या पतीला अडव आणि पुढे काय होते ते बघ.”
तो निरोप बागेच्या राखणदारांनी सांगितला तेव्हा शचीने इंद्राला कृष्णाचा प्रतिकार करण्यासाठी बिनविले.
मग इंद्र संपूर्ण देवसैन्य घेऊन लढाईसाठी निघाला. सर्व होऊन नंदनवनापाशी जाऊन पोहोचले. लगेच लढाईला आरंभ झाला. कृष्णाने कोट्यवधी बाण सोडून अंतराळ झाकून टाकले आणि शंखाच्या अत्यंत कर्कश आवाजाने सर्व दिशा भरून टाकल्या.
गरुडाने वरुणाचा पाश छिन्नविच्छिन्न करून त्याचे तुकडे केले. त्यांन यमाचा दंड तोडून मोडून पृथ्वीवर पाडला, कुबेराचे विमान केले. सूर्यावर तर केवळ एक नजर टाकून त्याचे तेज खेचून घेतले अग्नीची उष्णता खेचून घेतली.
सर्व बसू तर मागच्या मागे पळून गेले. स्टुराणांचे त्रिशूल बोयर केले. कृष्णाने सोडलेले असंख्य बाण सहन न झाल्यामुळे साध्यदेवविश्वेदेव, मरुद्रण, गंधर्व वगैरे सावरीच्या कापसाप्रमाणे कुठच्या कुठे उडून गेले,
शेवटी देवराज इंद्र व श्रीकृष्ण या उभयतांचे युद्ध सुरू झाले, तेव्हा गरुड आणि इंद्राचा ऐरावत यांच्यातही युद्ध जुंपले, ते युद्ध चालले असताना कुणीच कुणाला आटोपेना; मग इंद्राने बज्र हातात घेतले. ते पाहताच कृष्णाने सुदर्शन चक्र उचलले. त्यावेळी ती विश्वसंहारक शस्त्रे पाहून त्रैलोक्यात हाहाकार माजला. इंद्राने वज्र फेकताच कृष्णाने ते सहजगत्या एका हाताने पकडले आणि सुदर्शन चक्र न सोडता, पळून चाललेल्या इंद्राला तो म्हणाला –
“अरे! जरा उभा राहा.” सत्यभामा बोलली, “अशा तऱ्हेने युद्धात पाठ दाखवून पळणे हे तुला शोभत नाही. तू थोडासा थांब, तुझे अभिनंदन करावे म्हणून एवढ्यात शची स्वतःच इथे येईल. असो. हे पारिजातकाचे झाड मी तुला देते ते घेऊन जा. तिने तुझ्या पराक्रमाच्या गर्वापोटी माझा अपमान केला होता म्हणून एवढे सर्व घडले. नाहीतर मी काही कठोर नाही. माझ्या पतीचे शौर्य दाखवावे मी असा हट्ट केला, शचीला जर पतीचा अभिमान वाटत असेल तर आम्हाला का वाटू नये?”
श्रीविष्णु पुराण अंश-५ (कृष्णकथा भाग-9) क्रमश:
संकलन व सादरकर्ते : विजय गोळेसर
मोबाईल- ९४२२७६५२२७
Shree Vishnu Puran Parijat Krishna Earth by Vijay Golesar
Rukmi Narkasur