श्रीविष्णु पुराण
अंश-५ (कृष्णकथा भाग-१२)
कृष्णावताराची अखेर
पराशर पुढे सांगू लागले
“श्रीकृष्ण आणि बलराम या उभयतांनी मिळून अनेक जुलुमी राजे व दैत्य यांचा वध करून पृथ्वीचा भार हलका केला. शेवटी अर्जुनाकडून अठरा अक्षौहिणी सैन्याचा संहार करविला; मग ब्राह्मणांचा शाप है निमित्त करून सर्व यादव कुळाचा संहार घडविला नंतर शेवटी आपल्या गोतावळ्यासह आपला मानव देह सोडून तो निजधामास जाता झाला, ती संपूर्ण हकीकत अशी आहे.
एकदा यादवांपैकी काही तरुण फिरत जात असताना त्यांना पिंडारक तीर्थक्षेत्रात नारद, विश्वामित्र, कण्व असे मुनी दिसले, तेव्हा तारुण्याच्या धुंदीत असलेल्या त्यांनी जांबवतीचा पुत्र सांब याला स्त्रीवेश दिला आणिमूनींसमोर जाऊन त्यांना विचारले की, या स्त्रीला पुत्र हवा आहे तरी काय होईल ते सांगावे.
ती थट्टा ओळखून रागाने ते मुनी बोलले, अरे याच्या पोटातून एक मुसळ उत्पन्न होईल आणि तेच तुमचा वंश नष्ट करील,
तेव्हा भिऊन त्या तरुणांनी ही हकीकत उग्रसेनाच्या कानी घातली; मग त्याने त्या मुसळाचे तुकडे तुकडे करून ते समुद्रात फेकून दिले. पुढे त्यांच्यापासून तिथे लव्हाळी निर्माण झाली.
त्यातला एक लोखंडाचा अणकुचीदार तुकडा एका मासोळीने गिळला. ती मासोळी कोळ्यांच्या जाळ्यात सापडली व चिरताना तो तुकडा मिळाला. तो तिथेच आलेल्या जरा नावाच्या शिकाऱ्याने घेतला. या सर्व घटना जाणत असूनही कृष्ण गप्पच होता; कारण त्याला विधिलिखित माहीत होते.
अशावेळी सर्व देवांनी मिळून वायूदेवाला कृष्णापाशी पाठविला. त्याने कृष्णाची एकांतात भेट घेतली व म्हणाला, “मी देवांचा निरोप घेऊन आलो आहे. तो निरोप असा आहे की, तुला पृथ्वीचा भार कमी करण्यासाठी अवतार घेतलेल्याला शंभर वर्षांहून अधिक काळ लोटून गेला आहे. तुझे कार्यही संपले आहे.
तेव्हा तुझी इच्छा असली तर स्वर्गलोकात परत ये नाहीतर अजून काही काळ इथेच रहा. मी फक्त तुला निरोप पोहोचवण्याचे काम केले आहे.”
कृष्ण बोलला- “तू सांगितलेस ते माझ्यासुद्धा ध्यानात आहेच. म्हणूनच मी यादव कुळाचा नाश व्हावा यासाठी सुरुवात केली आहे. तेवढे कार्य संपले की माझे भूमीभार उतरण्याचे काम पुरे होईल.
आता मी आधी सात रात्रींमध्ये यांचा नाश करणार आहे. नंतरसमुद्राकडून उसनी घेतलेली जमीन त्याला परत करून मी स्वर्गात येईन,पृथ्वीवरचे जे जुलुमी राजे होते त्या सर्वांना मी मारले आहेच परंतु हे सर्व यादवही काही कमी नाहीत. तेव्हा एवढे झाले की मी लगेच परत येतो ही खातरी बाळगा.”
मग कृष्णाला प्रणाम करून वायू निघून गेला.
त्यानंतर द्वारकेत वारंवार अपशकून होऊ लागले. ते पाहिल्यावर कृष्ण यादवांना घेऊन प्रभास नावाच्या तीर्थक्षेत्री आला. कृष्णाच्या चाललेल्या निरवानिरवीच्या योजना ओळखून परमभक्त उद्धवाने त्याला विचारले की,
“मला असे वाटते आहे की, तू लवकरच यादव कुळाचा नाश करण्याचे ठरविले असावेस. तरी आता माझी व्यवस्था कुठे व कशी करणार आहेस?”
कृष्णाने उत्तर दिले की “आता तू माझ्या कृपेने नरनारायण रहातात त्या गंधमादन नावाच्या पर्वतावर जाऊन राहा. ते सर्वांत पवित्र क्षेत्र आहे. तिथे तू माझे ध्यान करीत जा.
आता मी या सर्वांचा नाश करून हे शरीर सोडणार आहे. त्यानंतर समुद्र संपूर्ण द्वारका बुडवून टाकील. मात्र माझा महाल तेवढा जतन करून ठेवील.”
असे ऐकल्यावर उद्धवाने हात जोडून प्रणाम केला आणि तो निघून गंधमादन पर्वताच्या दिशेने गेला.
नंतर सर्व यादव आणि बलराम यांना घेऊन कृष्ण प्रभासतीर्थावर गेला. तिथे एकदा जेवणाचे वेळी त्या सर्वांनी भरपूर मदिरा पिऊन घेतली व ते जेवावयास बसले. त्या प्रसंगी स्वाभाविक चेष्टामस्करी सुरू झाली. थोडक्यात लवकरच मस्करीचे पर्यवसान बादाबादीत झाले व ते सगळे परस्परांवर दात-ओठ खात तुटून पडले.
त्यात जेव्हा शस्त्रे कमी पडली तेव्हा त्यांनी जवळच असलेली लव्हाळी उपटून घेतली आणि लढू लागले. त्या मारामारीत प्रद्युम्न, सांबासहित कृष्णाचे पुत्र, कृथवर्मा, सात्यकी, अनिरुद्ध वगैरे बीरांसहीत पृथु, विपृथु, चारुवर्मा, चारूक, आरणि अक्रूर वगैरे त्वेषाने लढत होते.
जेव्हा कृष्ण त्यांना आवर घालण्यासाठी पुढे सरसावला तेव्हा त्याला न जुमानता ते लढतच राहिले; मग मात्र कृष्णाने काही लव्हाळे उपटून घेतले आणि तो यादवांना झोडपीत सुटला. कृष्णाचा स्पर्श होताच ते लव्हाळे जसे काही वज्र असावे तसे कडक बनले. बराच वेळपर्यंत तो प्रकार चालला होता.
शेवटी एकदा ती रणधुमाळी संपली व तिथे कृष्ण व त्याचा सारथी दारुक या दोघांशिवाय कुणीही जिवंत राहिला नव्हता; मग दारुकाने जैत्र नावाचा रथ जोडला आणि तो रथ समुद्रावरून दौडत गेला.
त्या पाठोपाठ पांचजन्य शंख, सुदर्शन चक्र, सारंग धनुष्य, कौमादकी गदा वगैरे शस्त्रे अत्यंत वेगात आकाशमार्गाने सूर्यलोकांत निघून गेली. त्या वेळी तिथे कृष्ण व दारूक असे दोघेच उरले. तेव्हा ते फिरत असता त्यांना असे दृश्य दिसले की
एका वृक्षाखाली बलराम विश्रांती घेत असताना त्याच्या मुखातून एक प्रचंड नाग बाहेर निघाला. तो सिद्ध व नागाच्या समुदायासह समुद्राच्या तीरावर गेला. तिथे समुद्राने त्याचा सत्कार करून स्वागत केले आणि बघता बघता तो नाग समुद्रात शिरून दिसेनासा झाला.
तेव्हा बलरामाची अवतारसमाप्ती झाली असे जाणून कृष्णाने दारुकाला सांगितले की, त्याने परत मथुरेला जावे आणि इथे जे जे घडले ते सर्व इत्थंभूत वर्णन उग्रसेन आणि वसुदेव यांच्या कानी घालावे. मीसुद्धा आता हा देह सोडून जाणार आहे.
आणखी असेही सांगावे की, आता द्वारका नगरी सागरात बुडणार आहे. तरी त्यांनी अर्जुनाच्या येण्याची वाट पाहात थांबावे आणि त्याच्याबरोबर द्वारका सोडून जावे. कुणीही मागे राहू नये. तसेच तू अर्जुनाला माझ्या वतीने सांग की
त्याने माझ्या सर्व परिवाराचा सांभाळ करावा. तेव्हा तूसुद्धा अर्जुनासह जा! एवढे सांगून झाल्यावर दारूक निघून गेला नंतर कृष्ण एका मोठ्या वृक्षातळी जाऊन वृक्षाला टेकून रेलून बसला.
त्याने एक पाय गुडघ्यात वाकवून त्यावर दुसरा पाय ठेवला आणि डोळे मिटून आत्मचिंतन करू लागला. त्यावेळी असा योगायोग घडून आला की ‘जरा’ या नावाचा शिकारी फिरता फिरता या भागात आला. त्याने दुरून जेव्हा नजर टाकली तेव्हा कृष्णाचे आसन पाहून त्याला एखादे हरीण बसले असावे असा भास झाला.
तेव्हा त्याने भात्यातून एक बाण काढला. त्या बाणाचे टोक त्याला पूर्वी समुद्रातून जो लोखंडाचा तुकडा मिळाला होता त्याचे बनविलेले होते. त्या शिकाऱ्याने धनुष्याला जोडून लक्ष्य साधून तो बाण सोडला. तो बाण वेगाने सणसणत आला व त्याने कृष्णाच्या पायाचा अचूक वेध घेतला.
व्याधाने पुढे येऊन पाहताच त्याला कृष्ण दिसला. तेव्हा तो लोटांगण घालून क्षमा मागू लागला पण कृष्णाने त्याला अभय दिले व त्याच क्षणी एका दिव्य अशा विमानात बसवून स्वर्गात धाडून दिला. नंतर कृष्णाने डोळे मिटून घेतले आणि एका क्षणात देह सोडून तो निजधामास गेला.’
अंतिम काळच्या काही घटना
जेव्हा अर्जुन तिथे आला तेव्हा त्याने बलराम, कृष्ण आणि इतर यादववीरांचे मृतदेह शोधून गोळा केले; मग त्या सर्वांचे विधिपूर्वक अंत्यसंस्कार केले. त्यावेळी मुख्य राणी रुक्मिणीसहित आठ पट्टराण्या कृष्णाच्या चितेवर बसून सती गेल्या. रेवतीने बलरामाच्या चितेवर अग्निप्रवेश केला.
ते वृत्त समजले तेव्हा उग्रसेन, बसुदेव-देवकी व रोहिणी यांनीही अग्निप्रवेश केला नंतर अर्जुनाने सर्वांचे विधिनुसार अंत्यसंस्कार पार पाडले आणि तो बज्र व इतर परिवाराला घेऊन द्वारकेतून बाहेर पडला, त्याच्यासोबत कृष्णाच्या सोळा-सहस्र व शंभर स्त्रिया तसेच असंख्य प्रजानन होते.
श्रीकृष्णाची सुधर्म नावाची राजसभा व पारिजातक वृक्ष उडून स्वर्गात निघून गेले. कृष्णाच्या निधनानंतर द्वापारयुग संपले आणि कलियुगाचा अंमल चालू झाला.
अशाप्रकारे उजाड झालेली द्वारका समुद्राने एका क्षणात गिळली पण कृष्णाचा महाल मात्र आजदेखील शाबूत आहे; कारण तिथे कृष्णाची चैतन्यशक्ती नित्य जागृत आहे. ते स्थान अत्यंत पवित्र असून पापनाशक आहे. त्याचे केवळ दर्शन घेतले तरी मनुष्याची पातके दूर होतात.
नंतर अर्जुनाने विचार करून द्वारकेच्या प्रजाननांना धनधान्याची विपुलता असलेल्या पंचनद (सध्या पंजाब) प्रांतात बसविण्यासाठी घेऊन गेला. त्या वेळी त्याच्यासोबत असलेल्या हजारो निराधार स्त्रिया पाहून वाटमाऱ्या करणाऱ्या चोरांच्या तोंडाला पाणी सुटले. तेव्हा त्यांनी आपसांत संगनमत करून लूट करण्याचे ठरविले.
ते म्हणाले, ” हा अर्जुन आमच्यादेखत या सर्व स्त्रियांना एकटाच घेऊन निघाला आहे तर मग आमच्या शौर्याचा उपयोग तरी काय? याने भीष्म, द्रोण, जयद्रथ व कर्ण वगैरे वीरांना मारले हे जरी खरे असले तरी आम्हा खेडूतांचा इंगा याने अजून पाहिलेला नाही. तेव्हा याला धडा शिकवलाच पाहिजे.”
मग ते सगळेजण मिळून लाठ्या, काठ्या व कुन्हऱ्हाडी घेऊन धावले व त्यांच्यावर तुटून पडले. तेव्हा अर्जुनाने त्यांना दरडावले. परंतु चोरांनी तिकडे ध्यान न देता आपला उद्योग चालूच ठेवला व सामानसुमानासह स्त्रियांना हिसकावून घेतल्या.
अर्जुनाने लगेच आपले प्रसिद्ध गांडीव धनुष्य उचलले पण त्याचा भार त्याला सहन होईनासा झाला, तरी त्याने कसेबसे धनुष्य ताणले पण त्याला एकसुद्धा अस्त्र आठवेनासे झाले; मग तो नुसतेच बाण सोडीत चालला पण अस्त्रमंत्र नसलेल्या त्या बाणांनी चोरांचे काहीच नुकसान झाले नाही. उलट त्याच्याजवळचे सर्व बाण मात्र संपून गेले. तो निःशस्त्र झाला.
एवढे झाले तेव्हा त्याच्या डोक्यात प्रकाश पहला की, त्याचे आज सर्व पराक्रम हे श्रीकृष्णाचेच खरे सामर्थ्य होते. तोपर्यंत सर्व चोर अर्जुवाची या करीत लुटालूट करून चालते झाले.
तेव्हा तो त्रैलोक्य विजयी अर्जुन खाली मान करून दुःखाने विचार करीत चालू लागला.
तो मनात म्हणाला “आज मला दुर्दैवानेच पराभूत केले आहे. नाहीतर माझ्यापाशी तेच धनुष्य आहे. तीच शखाले आहेत, तोच स्थ आणि घोडेसुद्धा तेच आहेत पण अनाठायी दिलेल्या दानासारखे आज ते निरुपयोगी ठरले. खरोखर दैवच बलवान आहे. आज कृष्ण नसल्यामुळे दैवाने या क्षुद्र दरोडेखोरांना विजय मिळवून दिला.
माझे तेच बाहू, तीच मूठ, तेच कुरुक्षेत्र आणि तोच मी अर्जुन आहे. तरीही कृष्णाविना आज सगळे काही निःसत्व ठरले. माझा व भीमाचा जो पराक्रम होता तो कृष्णामुळेच होता. नाहीतर या सामान्य मिल्लांची माझ्यासारख्या महारथी बीरावर मात करण्याची बिशाद नव्हती.
अशा तऱ्हेच्या विचारांत गढलेला अर्जुन एकदाचा इंद्रप्रस्थ नगरात येऊन पोहोचला. तिथे त्याने कृष्णाचा पुत्र ‘वज्र’ याला राज्याभिषेक केला आणि नंतर तो वनात व्यासमहषींना जाऊन भेटला पण तो मुनींना बंदन करून काही ना न बोलता मान खाली करून बसला.
तेव्हा व्यासमहाराज त्याला समजावू लागले
अर्जुना! अरे तुझे दुःख अनाठायी आहे. तू ही खिलता सोडून दें. हा सर्वव्यापक काळाचा महिमा आहे हे जाणून थे, उनती काय किंवा अधोगती काय? दोन्हींना कारण काळ हाच आहे, नद्या, सागर, पर्वत, पृथ्वी एवढेच नव्हे तर यच्चयावत वस्तू यांची उत्पत्ती आणि अंतकाळ करतो म्हणून सर्वकाही कालाधीन आहे, असा विचार करून शांत हो.
तू जो कृष्णाचा महिमा सांगितलास तो खरा आहे. कृष्ण हाय महाकाल असून पृथ्वीचा भार उतरावा म्हणून तो मृत्युलोकात अवतरला होता. शिवाय त्याने तसे बचन पृथ्वीला दिले होते. आता ते कार्य आटोपले असून आणखी करण्यासारखे काही उरलेले नाही. तेव्हा तो स्वेच्छेने चालता झाला.
तेव्हा पार्था! पराभव झाला म्हणून वाईट वाटून घेऊ नकोस. तुझे पूर्वीच पराक्रम किंवा आताचा हा पराभव ही त्या काळापुरुषाची अर्थात विष्णूची योजना आहे. तोच हे सर्व करवून घेत असतो.
तुझ्या भाग्योदयाच्या वेळी तो तुझ्या पाठीशी उभा राहिला. आज तो त्या चोरांच्या पाठीशी उभा आहे. अरे पार्था! तू एकटाच भीष्मांसहित सगळ्या कौरवांना ठार करशील हे त्या वेळी कुणाला खरे वाटले असते काय? आणि त्याच तुला आज सामान्य गुंडांनी पळवून लावले हे कुणाला सांगून पटेल काय? तर खरी गोष्ट अशी आहे की,
तू जे एकट्याने कौरवांना मारलेस आणि स्वतः चोरांकडून पराभूत झालास, हा त्या सर्वात्मा ईश्वराचा खेळ आहे.
आता तुला त्या पळवून नेलेल्या स्त्रियांसाठी दुःख वाटते म्हणून मी तुला त्यांचे पूर्ववृत्त सांगतो म्हणजे तुला त्यामागचे रहस्य कळेल.
एके काळी अष्टावक्र नावाचे तपस्वी गळ्याएवढ्या पाण्यात उभे राहून तपश्चर्या करीत होते. अशी कितीतरी वर्षे उलटून गेली नंतर दैत्यांवर विजय मिळाला या आनंदात देवांनी सुमेरू पर्वतावर महोत्सव मांडला होता. त्यात भाग घेण्याकरीता हजारोंच्या संख्येत अप्सरा त्याच रस्त्याने निघाल्या होत्या. तेव्हा तिथे पाण्यात मुनींचे मस्तक पाहून त्या थांबल्या व त्यांची स्तुती करू लागल्या.
अशी बराच वेळपर्यंत स्तुती केल्यानंतर ते अष्टावक्र मुनी समाधीतून देहभानावर आले आणि म्हणाले – “हे भाग्यवती स्त्रियांनो! मी तुमच्यावर प्रसन्न आहे. तुमची जी मनोकामना असेल ती मागून घ्या. मी ती पुरी करीन.” त्यावर रंभा व तिलोत्तमा या दोघीजणी म्हणाल्या की, तुम्ही प्रसन्न झाला आहोत यातच आम्हांला सर्व मिळाले; मग इतर सख्या म्हणाल्या की, आम्हांला साक्षात श्रीहरि पुरुषोत्तम पतिरूपाने लाभावा ही इच्छा आहे.
तेव्हा, “बरे तर! तसेच घडून येईल” असे म्हणून मुनी पाण्यातून बाहेर आले. त्यांचे शरीर आठ जागी कुबड असल्यामुळे वाकडेतिकडे होते, ते पाहून त्या अप्सरांना हसू न आवरल्यामुळे त्या हसत सुटल्या, तेव्हा मुनींना राग आला व ते बोलले –
“तुम्ही माझ्या कुरूप देहाची हसून थट्टा केलीत म्हणून जरी माझ्या आशीर्वादाने तुम्हाला पुरुषोत्तम हा पती लाभला, तरीही तुम्हाला चोरव डाकू पळवून नेतील.”
त्यावर घाबरून जाऊन त्या अप्सरांनी पुन्हापुन्हा विनंती केल्यावर मुनी म्हणाले की, शेवटी त्या स्वर्गात परतून येतील.”
व्यास पुढे सांगू लागले, “अर्जुना। तुला मारून चोरांनी नेल्या त्या याच अप्सरा बरे का? तेव्हा आता बाईट वाटून घेऊ नको, सर्व घडवून आणणारा एकमेव श्रीहरिच आहे. त्यानेच तुला सामान्य पुरुष बनवून ठेवला आहे. जे जे काही उत्पन्न होते ते लयाला जाणारच असते. उन्नतीच्या पाठोपाठ अधोगती आहे. संयोगाच्या नंतर वियोग आहे आणि संग्रहाचा परिपाक नाश हाच आहे.
ही वस्तुस्थिती ध्यानी घेऊन जे महापुरुष स्थितप्रज्ञ होतात त्यांचे अनुकरण इतरांनीही करावे. तर आता तुम्ही राज्यकारभाराचा व्याप सोडून द्यावा आणि पाचही बंधूंनी वनात जाऊन कालक्रमणा करीत रहावे असे मला वाटते.”
मग अर्जुन परतून गेला व सर्वांना व्यासांचा निरोप दिला व त्याप्रमाणे ते सर्वजण परीक्षितला राज्यावर बसवून बनात निघून गेले.
शेवटी पराशर म्हणतात की, असे हे श्रीकृष्णाचे पावन चरित्र नित्य श्रवण आणि मनन केल्याने माणूस दोषरहित होतो आणि बैकुंठालोकी जातो.
पराशर मुनीविरचित श्रीविष्णुपुराणाचा पाचवा अंश संपूर्ण.
श्रीविष्णु पुराण अंश-५ (कृष्णकथा भाग-१२) क्रमश:
संकलन व सादरकर्ते : विजय गोळेसर
मोबाईल- ९४२२७६५२२७
Shree Vishnu Puran Krishna Last Stage by Vijay Golesar