बुधवार, सप्टेंबर 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

इंडिया दर्पण नवरात्रोत्सव विशेष लेखमाला…तुळजापूरची श्री तुळजाभवानी

by Gautam Sancheti
सप्टेंबर 24, 2025 | 6:32 am
in संमिश्र वार्ता
0
tulja bhavani

विजय गोळेसर
देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. ही देवी भगवती (भवानी) म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र क्षात्रतेजाची स्फूर्ती देवता, प्रेरणाशक्ती व स्वराज्य संस्थापक राजे श्री शिवछत्रपती यांची आराध्यदेवता, अशी ही तुळजापूरची भवानीदेवी महाराष्ट्राची कुलस्वामीनी आहे.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देउन हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद दिला.अशी या तुळजाभवानी मातेची ख्याती आहे. तुळजापूर हे शहर बालाघाटच्या एका कड्यावर वसले आहे. मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमाडपंती आहे. इतिहास व पुरातत्त्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकुट अथवा यादवकालीन मानले जाते.

वैशिष्ट्ये
श्री तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन मोठी प्रवेशद्वारे आहेत. एका प्रवेशद्वारास राजे शहाजी महाद्वार तर दुसर्‍या दरवाजाला राजामाता जिजाऊ महाद्वार असे नाव देण्यात आले आहे. देवीच्या मंदिरात जाण्यासाठी दगडी पायर्‍या आहेत.पायर्‍या उतरून खाली गेल्यानंतर गोमुख तीर्थ येथे दर्शनाला जाण्यापूर्वी भाविक येथे स्नान करतात तसेच हातपायही धुतात. समोरच कल्लोळ तीर्थ आहे. देवीच्या स्नानासाठी तीन तीर्थ एकत्र आली असे कल्लोळ तीर्थाच्या बाबतीत सांगितले जाते. मंदिराच्या मुख्य द्वारापाशी उजव्या सोंडेचा सिद्धीविनायक आहे. येथेच आदीशक्ती आदिमाया व अन्नपूर्णा देवीचे मंदिरही लक्षवेधून घेतात.

पुढे गेल्यावर मंदिराचे आवार दर्शनी पडते. या प्रशस्त आवारात भाविकांना बसण्याची सोय करण्यात आली आहे. येथूनच श्री तुळजाभवानी देवी मंदिराचे दर्शन होते. मंदिराच्या मुख्य गाभार्‍याचा दरवाजा चांदीच्या पत्र्याने मढविला असून, त्यावर सुरेख असे नक्षीकाम करण्यात आले आहे. येथेच श्री तुळजाभवानीची प्रसन्न आणि तेजस्वी काळा पाषाणाची मूर्ती दिसून येते. तीन फुट उंचीची ही मूर्ती स्वयंभू आहे. अष्टभुजा महिषासूरमर्दिनी सिंहासनावर उभी असून मस्तकाच्या मुकुटातून केसांच्या बटा बाहेर आलेल्या आहेत. आईया आठ हातात त्रिशूळ, बिचवा, बाण, चक्र, शंख, धनुष्य, पानपात्र आणि राक्षसाची शेंडी आहे. पाठीवर बाणाचा भाता असून देवीच्या मुख्याच्या उजव्या व डाव्या अंगाला चंद्र व सूर्य आहेत. तुळजाभवानीचा उजवा पाय महिषासून राक्षसावर तर डावा पाय जमिनीवर दिसून येतो. दोन पायांच्यामध्ये महिषासूर राक्षसाचे मस्तक आहे.

श्री तुळजाभवानी देवीची मुर्ती चल मुर्ती आहे. येथे उत्सव मूर्तीची मिरवणूक न काढता प्रत्यक्ष श्री तुळजाभवानी देवीच्या मुर्तीची पालखीत बसवून मंदिराभोवती मिरवणूक काढली जाते. वर्षातून एकूण तीन वेळा मुर्ती सिंहासनावरून हलवून गाभार्‍याबाहेर असलेल्या पलंगावर ठेवली जाते. नंतर विजयादशमीच्या दिवशी सिमोल्लंघनाच्या वेळी आईची पालखीतून मिरवणूक काढली जाते. देवीच्या पालखीसोबत श्रीयंत्र, खंडोबा आणि महादेवाची मिरवणूकही निघते.

नवरात्र
नवरात्रीच्या काळात भक्त राज्यभरातून ठिकठिकाणांहून पायी पालख्या घेऊन येतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानी चरणी अर्पण केलेली सोन्याच्या पुतळ्याची माळ आजही देवीच्या मुख्य अलंकारांपैकी एक आहे. श्री तुळजाभवानी ही आदिशक्ती म्हणून सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे.
शारदीय नवरात्र उत्सव
श्री तुळजाभवानी मातेच्या नवरात्र उत्सव हा मोठ्या प्रमणे साजरा केला जातो या नवरात्र काळात नऊदिवस पुजा , घटस्थापना करण्यात येते ,छबिना , श्री देवीस विविध प्रकारच्या अलंकार पुजा करण्यात येतात असे अनेक कार्यक्रम साजरे होतात

दसरा उत्सव
श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिर मधील एक अदभूत असा दसरा उत्सव आहे. श्री तुळजाभवानी मातेची मुर्ती हि मंदिर परिसर मधील पिंपळाच्या पारावर आणून पालखी मध्ये ठेऊन मंदिर प्रद्क्षना करण्यात येते. भाविक हळदी कुंकू यांची उधळण श्री देवीच्या पालखीवर करतात हा उत्सवा मध्ये लाखो भाविक सहभागी होतात.
मातेचा छबिना
छबिना म्हणजे श्री तुळजाभवानी मातेची उत्सव मुर्ती एका चांदीच्या मेघडंबरी मध्ये व श्री देवीच्या अनेक वाहनापैकी एका वाहनावर श्री देवीची चांदीची मुर्ती व पादुका ठेवुन मंदिरा भोवती एक प्रदिक्षणा पूर्ण करतात याला छबिना म्हणतात.
श्री तुळजाभवानी मातेचा छबिना कालावधी प्रत्येक मंगळवार , पौर्णिमेच्या एक दिवस आधी आणि पौर्णिमा या दिवशी आणि त्या नंतर एक दिवस अश्या प्रमाणे करण्यात येतो. छबिना उत्सव पाहण्यासाठी हजारो भाविक येतात.ज्या ज्या ठिकाणी छबिना उभा राहतो त्या ठिकाणी तुळजापूर क्षेत्राच्या बाजुतील सर्व गावांच्या शिवा येता या शिवांवर (हद्द) उभे राहून सर्व जगताच्या रक्षणासाठी व कल्याणासाठी उभी राहते . येते उभी राहून सारे जग पाहते व जगताचे कल्याण करते म्हणून छबिना उत्सव काढण्यात येतो . या छबिन्या मध्ये प्रमुख वाद्य हे संभळ असते गोंधळी बांधव हे विशिष्ट प्रकारे वाजवतात आणि त्या वेळी मंदिर परिसर हा मंगलमय वातवरणात हा छबिना उत्सव संपन्न होतो.
विजय गोळेसर- मो. ९४२२७६५२२७

Navaratri Special Article Tuljapur Tuljabhavani by Vijay Golesar

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींनी प्रकृतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या,बुधवार, २४ सप्टेंबरचे राशिभविष्य

Next Post

राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान….या तीन मराठी चित्रपटांचा गौरव

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

mahavitran
संमिश्र वार्ता

आता वीजभार वाढीच्या ऑनलाइन अर्जांना स्वयंचलित मंजूरी

सप्टेंबर 24, 2025
Untitled 31
संमिश्र वार्ता

शेतकऱ्यांना केवळ ७ हजाराची मदत म्हणजे जखमांवर मीठ चोळण्यासारखे….डॉ.अजित नवले

सप्टेंबर 24, 2025
Election logo nivdnuk aayog e1702627232547
महत्त्वाच्या बातम्या

राज्यातल्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

सप्टेंबर 24, 2025
कबीर खंडारे जिप्सी1 1024x626 1
महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान….या तीन मराठी चित्रपटांचा गौरव

सप्टेंबर 24, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी प्रकृतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या,बुधवार, २४ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 23, 2025
Rumion with Six Airbags 1
संमिश्र वार्ता

टोयोटा रूमियनच्‍या सर्व व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये आता ६ एअरबॅग्‍जस

सप्टेंबर 23, 2025
नाशिक येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत आढावा बैठकीचे आयोजन 2 1024x683 1
राज्य

नाशिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठीच्या जागेवरील वन विभागाचे आरक्षण रद्द व्हावे…मंत्री छगन भुजबळ

सप्टेंबर 23, 2025
Sushma Andhare
संमिश्र वार्ता

फक्त भाजप वगळून इतर सगळ्यांची प्रकरणे हातात कशी काय येतात…सुषमा अंधारे यांचा दमानियांना प्रश्न

सप्टेंबर 23, 2025
Next Post
कबीर खंडारे जिप्सी1 1024x626 1

राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान….या तीन मराठी चित्रपटांचा गौरव

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011