शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दक्षिण भारतातील तिरुपती बालाजीला जशी दररोज हजारो भक्तांची गर्दी होते, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यात शिर्डीतील श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देखील अशाच प्रकारे भाविकांच्या रांगा लागत असतात. परंतु गेल्या काही महिन्यांपासून भाविकांना थेट साईबाबांच्या समाधी जवळ जाऊन दर्शन घेता येत नव्हते. मात्र आता या निर्णयांमध्ये पुन्हा एकदा बदल करून भाविक भक्तांसाठी थेट दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
साई भक्तांच्या सोयी साठी साईबाबांच्या समाधी समोर लावण्यात आलेल्या काचा हटवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय साई संस्थानने घेतला आहे. त्यामुळे भाविकांना पूर्वीप्रमाणे समाधीला हस्त स्पर्श करुन समाधीचे दर्शन घेता येणार आहे. कारण अगोदर व्हीआयपींना काचा काढून दर्शन घेता येत होते. सामान्य भाविकांना मात्र दुरून हात जोडूनच दर्शन घ्यावे लागत होते. यामुळे भाविकांना मानसिक समाधान मिळत नव्हते. या मागण्या संदर्भात अनेक ग्रामस्थांचा तसेच भाविकांचाही साईसंस्थानकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता.
शिर्डीकरांच्या मागणीनुसार सामान्य भाविकांना समाधी मंदिरात विविध गोष्टींमध्ये बदल करण्यात आले आहेत. गर्दीच्या वेळी कमी उंचीची काच लावणे, व्दारकामाई मंदिरात आतील बाजुस भाविकांना प्रवेश देणे, सर्वसामान्य भाविकांना साई मंदिरातील समाधीपुढील काच काढून दर्शन देणे, गर्दीच्या वेळी कमी उंचीची काच लावणे, व्दारकामाई मंदिरात आतील बाजूस भाविकांना प्रवेश देणे, ग्रामस्थांसाठी मंदिर परिसर गेटवर येणे-जाणेकरिता मार्ग मोकळा करणे, साईंची आरती सुरु असताना भाविकांना गुरुस्थान मंदिराची परिक्रमा करु देणे, मंदिर परिसरात लावण्यात आलेले जास्तीचे बॅरिगेट काढणे आणि श्री साईसच्चरित ग्रंथ हे काही भाषेमध्ये कमी आहे ते लवकर उपलब्ध करुन देणे आदींबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी
दिली.
शिर्डी ग्रामस्थ आणि भाविकांच्या मागणीची दखल घेऊन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील आणि खासदार सदाशिव लोखंडे यांनी साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बनायात यांना मंदिरातील काचा आणि जाळ्या काढण्याच्या सूचना केल्या होत्या. शिर्डी ग्रामस्थ आणि साईबाबा संस्थान प्रशासन यांच्यात काल बुधवार, दि.९ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या बैठकीत, समाधीसमोरील काचा आणि जाळी हटवण्यासोबतच आणखी काही निर्णय घेण्यात आले आहेत.
यंदा दिवाळीच्या निमित्ताने साईबाबांच्या चरणी लाखो भक्तांनी दर्शन घेतले आणि कोट्यवधींचे दान केले आहे. यावेळी भाविकांनी साईंच्या झोळीत कोट्यवधींचे भरभरून दान दिले आहे. २० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या १५ दिवसांत तब्बल १८ कोटी रुपयांचे दान साई संस्थानला प्राप्त झाले आहे. यात रोख रक्कम, चेक, सोने-चांदी तसेच २९ देशांतील परकीय चलनाचा समावेश आहे.
यामध्ये
दक्षिणा पेटी : ३ कोटी ११ लाख ७९ हजार १८४ रुपये.
देणगी काउंटर : ७ कोटी ५४ लाख ४५ हजार ४०८ रुपये.
ऑनलाइन देणगी : १ कोटी ४५ लाख ४२ हजार ८०८ रुपये.
चेक व डीडी देणगी : ३ कोटी ३ लाख ५५ हजार ९४६ रुपये.
मनीआर्डरद्वारे : ७ लाख २८ हजार ८३३ रुपये.
डेबिट क्रेडिट कार्ड देणगी : १ कोटी ८४ लाख २२ हजार ४२६ रुपये.
सोने : ८६०.४५० ग्रॅम सोने (३९.५३ लाख २९ रुपये).
चांदी : १३३४५. ९७० ग्रॅम (५. ४५ लाख रुपये)
परकीय चलन : २४.८० लाख रुपये (२९ देशांचे चलन)
यांचा समावेश आहे.
Shree Shirdi Sai Baba Temple Darshan Big Decision
Trust Religious