मंगळवार, ऑक्टोबर 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

आज आहे श्री रामदास नवमी… समर्थ रामदासांचे नाशकातील वास्तव्य… त्यांनी स्थापन केलेल मंदिर… घ्या जाणून सविस्तर..

फेब्रुवारी 15, 2023 | 5:24 am
in इतर
0
samartha ramdas

समर्थ रामदास

आज श्रीरामदास नवमी. समर्थ रामदास स्वामी यांचे नाव घेताच नाशिककरांना समर्थांची टाकळी आठवते.कारण समर्थ इ. स. १६२१ ते १६३३ असे १२ वर्षं टाकळी गावात राहिले होते. येथेच त्यांनी तपश्चर्या व कठोर साधना केली. नंदिनी व गोदावरीच्या संगमात उभे राहून ‘श्रीराम जयराम जयजय राम’ या मंत्राचा तेरा कोटी जप, दररोज १२०० सूर्यनमस्कार करून त्यांनी मानसिक आणि शारीरिक शक्तीचा विकास केला. म्हणूनच टाकळी बलोपसनेचे केंद्र म्हणून ओळखले जाते.

vijay golesar
विजय गोळेसर
मो. ९४२२७६५२२७

समर्थ रामदासांच्या ‘भीमरूपी महारूद्रा वज्र हनुमान मारुती’, या स्तोत्राने व ‘जय जय रघुवीर समर्थ’ या गर्जनेने महाराष्ट्रावर आलेली मरगळ झटकली, तर ‘सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची’ या गणपती आरतीने जगभरातील गणेशभक्तांच्या मनात समर्थांनी स्थान मिळवले. ‘मनाचे श्लोक’ आणि ‘दासबोध’ या समर्थ रचनांनी मानवी जीवनचक्राला शिस्त लावली. समर्थांच्या कठोर तपश्चर्येमुळे सर्वज्ञात झालेल्या टाकळीत अजूनही समर्थ रामदासांच्या अस्तित्वाच्या खुणा आढळतात. ही समर्थांची तपोभूमी असल्याची प्रचिती पावलोपावली येते.

समर्थ रामदास कोण होते?
समर्थ रामदास यांचे जन्म नाव होते, नारायण सूर्याजी ठोसर २४ मार्च १६०८ रोजी त्यांचा जालना जवाळच्या जांब येथे जन्म झाला. समर्थ रामदास हे महाराष्ट्रातील कवी व समर्थ संप्रदायाचे संस्थापक होते. रामाला व हनुमंताला उपास्य मानणाऱ्या समर्थ रामदासांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांच्या प्रसारार्थ महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन केले. ते संत तुकारामांचे समकालीन होते. राजकारण धर्मकारणात जाणीवपूर्वक अंतर्भूत करणारे रामदास हे एकमेव महाराष्ट्रीय संत होते. पर्यावरणावर प्रबोधन आणि लिखाणही त्यांनी केले आहे.

पूर्वाश्रमीचा परिवार
समर्थ रामदास स्वामींच्या वडिलांचे नाव सूर्याजीपंत ठोसर असे होते. ते ऋग्वेदी असून जमदग्नी हे त्यांचे गोत्र होते. ते सूर्योपासक होते. त्यांच्या पत्‍नीचे, म्हणजे गंगाधर-नारायणांच्या आईचे नाव ‘राणूबाई ‘ होते.
बालपण
समर्थ रामदासस्वामी(नारायण) यांचा जन्म श्रीक्षेत्र जांबसमर्थ या गावी (जालना जिल्हा) शके १५३० (सन १६०८) मध्ये रामनवमीच्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध नवमीस, रामजन्माच्याच शुभमुहूर्तावर, म्हणजे माध्याह्नी झाला. ठोसरांचे घराणेच सूर्योपासक होते. नारायण सात वर्षाचा असतांनाच वडील सूर्याजीपंतांचे निधन झाले. घरची सांपत्तिक स्थिती चांगली होती. पण नारायण लहानपणापासूनच विरक्त होता. अतिशय बुद्धिमान, निश्चयी तसेच खोडकर होता.

लहानपणी नारायण साहसी होता. झाडावरून उड्या मारणे, पुरात पोहणे, घोड्यावर रपेट करणे या सगळ्या गोष्टींत तो तरबेज होता. त्याचे आठ मित्र होते. एक मित्र सुताराचा मुलगा होता तर दुसरा गवंड्याचा. एक लोहाराचा तर दुसरा गवळ्याचा. नारायणाने या मित्रांच्या सहवासात बालपणीच त्या-त्या व्यवसायाचे उत्तम ज्ञान प्राप्त करून घेतले होते. निरीक्षणाने आणि अनुभवाने तो सगळ्या गोष्टी शिकला. एकदा नारायण लपून बसला, काही केल्या सापडेना. अखेर एका फडताळात सापडला. “काय करीत होतास” असे विचारल्यावर “आई, चिंता करितो विश्वाची” असे उत्तर त्याने दिले होते.

या मुलाला संसारांत अडकविले, तर तो ताळ्यावर येईल या कल्पनेने त्याचे वयाच्या १२व्या वर्षी लग्न ठरविण्यात आले. लग्न-समारंभात पुरोहितांनी “सावधान” हा शब्द उच्चारताच तो ऐकून, नेसलेले एक व अंगावरील पांघरलेले दुसरे, अशा दोन वस्त्रांनिशी नारायण लग्नमंडपातून पळाले. लोकांनी पाठलाग केला. पण त्यांनी तातडी करून गांवाबाहेरची नदी गाठली आणि नदीच्या खोल डोहात उडी मारली.

तपश्चर्या आणि साधना
पुढे तेथून पायी चालत चालत पंचवटीस येऊन रामदासांनी रामाचे दर्शन घेतले, आणि टाकळीस दीर्घ तपश्चर्या केली.वयाच्या १२ व्या वर्षी नाशिकला आलेले समर्थ १२ वर्षे तपश्चर्या करीत होते. समर्थांनी स्वयंप्रेरणेने स्वतःचा विकास विद्यार्थी दशेत असतानाच करवून घेतला असे मानले जाते.

नाशिकमध्ये आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून त्यांनी (समर्थ) रामदास हे नाव धारण केले. टाकळी येथे ते इ.स. १६२१ ते १६३३ असे १२ वर्षे राहिले. आपल्या या साधनेसाठी त्यांनी टाकळीची निवड करण्यामागे येथील नंदिनी नदीच्या काठावरील उंच टेकाडावरील घळ किंवा गुहा येथे असलेला एकांत हेच कारण असावे. या तपःसाधनेच्या कालावधीमध्ये ते पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठून रोज १२०० सूर्यनमस्कार घालत असत. सूर्योदयापासून माध्याह्नापर्यंत नदीच्या डोहात छातीइतक्या पाण्यात उभे राहून गायत्री मंत्राचे पुरश्चरण करत. दोन तास गायत्री मंत्राचा तर चार तास श्री राम जय राम जय जय राम या त्रयोदशाक्षरी राम मंत्राचा जप करीत.रामदासांनी रामनामाचे १३ कोटी वेळा नामस्मरण करून झाल्यावर कार्याला आरंभ केला.

साक्षात प्रभु श्रीराम हेच त्यांचे सद्‌गुरू झाले असे मानले जाते. समर्थ दुपारी केवळ ५ घरी भिक्षा मागून तिचा श्रीरामाला नैवेद्य दाखवत असत. त्यातील काही भाग पशुपक्ष्यांना ठेवून उरलेला भाग ग्रहण करत असत. समर्थ दुपारी दोन तास मंदिरात श्रवण साधना करीत आणि नंतर दोन तास ग्रंथांचा अभ्यास करीत. याच काळात त्यांनी वेद, उपनिषदे, सर्व प्राचीन ग्रंथ व विविध शास्त्रे यांचा सखोल अभ्यास केला, रामायणाची रचना केली. त्यांच्या या साधकावस्थेमध्ये त्यांनी आर्ततेने श्रीरामाची प्रार्थना केली तीच ‘करुणाष्टके’ होत. व्यायाम, उपासना आणि अध्ययन या तीनही गोष्टींना समर्थांच्या जीवनात महत्त्वाचे स्थान होते. त्यांच्या जीवनातील ही १२ वर्षे अत्यंत कडकडीत उपासनेमध्ये व्यतीत झाली. १२ वर्षाच्या या तीव्र तपश्चर्येनंतर यांना आत्मसाक्षात्कार झाला, असे म्हणतात.त्यावेळी समर्थांचे वय २४ वर्षाचे होते. समर्थांनी नाशिक येथे टाकळीला हनुमंताची मूर्ती स्थापन केली. हनुमान ही शक्तीची आणि बुद्धीची देवता आहे त्यामुळे तिची उपासना केली पाहिजे असा समर्थांचा यामागे विचार होता.

तीर्थयात्रा आणि भारतभ्रमण
समर्थांची तपश्चर्या संपल्यानंतर त्यांनी १२ वर्षे भारतभ्रमण केले, तीर्थयात्रा केल्या. सारा हिंदुस्थान पायाखाली घातला. प्रत्येक ठिकाणच्या लोकस्थितीचे निरीक्षण केले. पुढे, ते फिरत फिरत हिमालयात आले तेव्हा त्यांच्या मनातील मूळचा वैराग्यभाव जागा झाला. त्यांची देहाबद्दलची आसक्ती नष्ट झाली. आपल्याला प्रभू रामचंद्रांचे दर्शन झाले, आत्मसाक्षात्कार झाला.

शिखांचे सहावे धर्मगुरू हरगोविंद आणि समर्थ रामदास
भारत-भ्रमण करीत असता श्रीनगरमध्ये शीखांचे सहावे गुरू हरगोविंद यांची व समर्थांची योगायोगाने भेट झाली. समाजाच्या दुर्धर स्थितीसंबंधी दोघांची चर्चा/बातचीतही झाली होती. समर्थ गुरू हरगोविंद यांच्या बरोबर सुवर्ण मंदिरात आले. तिथे ते दोन महिने राहिले.तेव्हापासून समर्थ शस्त्र बाळगू लागले…. त्याला ते गुप्ती म्हणत. बाहेरून दिसायला कुबडी. जप करतांना या कुबडीवर बगल ठेवून चंद्रनाडी आणि सूर्यनाडी यांचे संचालन करता येत असे. कुबडीच्या दांड्याला आटे असत, त्यात छोटी तलवार असे.समर्थांची अशी तलवार असलेली कुबडी आजही सज्जनगडावर पहायला मिळते. भारत प्रवास करीत असतांना ते आपल्या प्रत्येक शिष्याला सामर्थ्यांचा आणि स्वाभिमानाचा संदेश देत.”समर्थांना हिमालयात प्रभू रामचंद्रांकडून धर्मसंस्थापनेसाठी प्रेरणा मिळाली होती. त्यापाठोपाठ गुरू हरगोविंद यांनीही त्यांना सशस्त्र क्रांतीची प्रेरणा दिली.

समर्थ रामदासांनी स्थापन केलेले मारुती
समर्थांनी ११ मारुतींची स्थापना केली. गावोगाव मारुतीची देवळे बांधली. मारुती ही शक्तीची देवता असल्याने मारुतीच्या मंदिराच्या परिसरात ते तरुणांना संघटित करत आणि त्यांना व्यायामाची प्रेरणा देत. सातारा, चाफळ, सज्जनगड या परिसरात समर्थांचे वास्तव्य अधिक काळ होते. समर्थांनी स्थापलेले राम मंदिर आणि अकरा मारुतींची देवळे याच परिसरात आहेत. ती पुढीलप्रमाणे:
(१) दास मारुती, चाफळ (राम मंदिरासमोर) (२) वीर मारुती, चाफळ (राम मंदिरामागे) (३) खडीचा मारुती, शिंगणवाडी, चाफळ (डोंगरावर) (४) प्रताप मारुती, माजगांव, चाफळ (५) उंब्रज मारुती (ता. कराड) (६) शहापूर मारुती (उंब्रज जवळ) (७) मसूर मारुती (ता. कराड) (८)बहे-बोरगांव (कृष्णामाई) मारुती (जि. सांगली) (९) शिराळा मारुती (बत्तीस शिराळा, जि. सांगली) (१०) मनपाडळे मारुती (जि. कोल्हापूर) (११) पारगांव मारुती (जि.कोल्हापूर).[४] ही ती गावे होत.

समर्थ स्थापित मठ
१. जांब २. चाफळ ३. सज्जनगड ४. डोमगाव ५. शिरगाव ६. कन्हेरी
लेखन
रामदासस्वामींची वाङ्‌मय संपदा अफाट आहे. मानवी जीवन सर्वांगाने समृद्ध व्हावे म्हणून समर्थांनी विविध विषयांवर चिंतनपर रचना केल्या. दासबोध, आत्माराम, मनाचे श्लोक, करुणाष्टके, शेकडो अभंग, स्तोत्रे, स्फुट रचना, रुबाया, सवाया, भारुडे, कविता, अनेक ओवीबद्ध पत्रे तसेच आरत्या त्यांनी रचलेल्या आहेत. समर्थांच्या वाङमयाचे मूल्यमापन भिन्न प्रकारे, अनेक दृष्टिकोनातून, अनेक विचारवंतांनी केले आहे. त्यांच्या एक एक वाङ्‌मय प्रकाराचा ऊहापोह करून त्या प्रकारच्या वाङ्‌मयातून समर्थ काय सांगतात, हे पहातानाही त्यांच्या भक्तीचे, शैलीचे, बुद्धिमत्तेचे कुणालाही कौतुक वाटावे. त्यांचा भाषावैभव स्वयंभू होता. त्यांना शब्दांची कधी वाणच पडली नाही.

समर्थांनी साहित्य, कला, आरोग्य, जीवनशैली, निसर्ग, बांधकाम, उद्योग या विषयांवरही लिहिले आहे. जीवनाचे कोणतेही अंग समर्थांनी सोडलेले नाही. सर्वच क्षेत्रांत उच्च ध्येय गाठण्यासाठी, यश मिळवण्यासाठी काय करावे, याचे तपशीलवार मार्गदर्शन समर्थ करतात. असे अनेक विषय त्यांच्या साहित्यात आहेत. समर्थांची मराठी भाषा ही मोजक्याच पण ठसठशीत शब्दांत सर्व काही सांगणारी भाषा आहे. समृद्ध शब्दरचना, मराठी शब्दांची वैभवशाली उधळण, तर्कशुद्ध विचारांची रेखीव, नेटकी मांडणी आणि माणसाच्या जीवनाचे, अगदी छोट्या-छोट्या व्यवहारांचे सूक्ष्म निरीक्षण (अन्‌ त्याचे प्रकटीकरण) ही समर्थांच्या साहित्याची आणखी काही वैशिष्ट्ये. विशिष्ट लय, गेयता हीदेखील त्यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये होत. समर्थांची काव्यरचना आणि तिचे साहित्यगुण हा स्वतंत्र अभ्यासाचाच विषय आहे. परळी येथे मठस्थापना करताना मठाच्या परिसरात बाग करण्यात येत होती त्या वेळी त्यांनी बागेवरती एक अखंड प्रकरणच लिहिले. तसेच सामानगडावर किल्ले बांधताना लिहिलेल्या ‘कारखाने’ या प्रकरणाच्या पहिल्या समासात विटा कशा कराव्यात, बांधकाम या प्रकरणात मजुरांना कशी, किती कामे द्यावीत यासारखी सर्व माहिती त्यांनी दिली आहे.

रामदासांच्या काही साहित्यरचना :-
1) अस्मानी सुलतानी 2) आत्माराम 3) आनंदवनभुवनी 4) एकवीरा समाधी अर्थात्‌ जुना दासबोध 5) करुणाष्टके 6) छत्रपती शिवाजी महाराजांना लिहिलेले पत्र 7) दासबोध 8) समर्थकृत देवी स्तोत्रे 9) नृसिंहपंचक : हे काव्य लाटानुप्रासाचे उत्तम उदाहरण आहे. 10) ’भीमरूपी महारुद्रा’ सारखे स्तोत्र 11) मनाचे श्लोक- मनाचे श्लोक एकूण २०५ आहेत. 12) मारुति स्तोत्र13) मुसलमानी अष्टक 14)रामदास स्वामींचे अभंग 15) राममंत्राचे श्लोक 16) समर्थांच्या उर्दू पदावल्यांचे पुस्तक 17) सवाई 18) ’सुखकर्ता दुखहर्ता’, ’लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा’, ’सत्राणे उड्डाणे हुंकार वदनीं’, यांसारख्या सुमारे ६१ आरत्या 19)सोलीव सुख , आणि अप्रसिद्ध असलेला हजारो पानी मजकूर

अंतिम पाच दिवसांमध्ये समर्थांनी अन्नपाणी वर्ज्य केले. त्याच काळात सज्जनगडावर तंजावर येथून श्रीराम पंचायतनाच्या मूर्ती आल्या. समर्थांनी स्वहस्ते त्यांचे पूजन केले. पूर्णपणे एकांतवास स्वीकारला. त्यावेळी त्यांच्याजवळ फक्त उद्धव स्वामी व आक्का बाई होते. कल्याण स्वामी डोमगाव येथे होते. अंतिम दिनी समर्थ पद्मासन घालून उत्तराभिमुख बसले. तीन वेळा ‘जय जय रघुवीर समर्थ ‘ हा घोष करून आत्मा पंचत्वात विलीन केला. त्यांच्या पार्थिवाचे अंत्यसंस्कार उद्धव स्वामी यांनी केले. समर्थांनी पूर्वसूचना देऊन माघ वद्य नवमी शके सोळाशे तीन सन १६८१ रोजी देह ठेवला. हीच दासनवमी होय.

समर्थ संप्रदाय
समर्थसंप्रदाय हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा संप्रदाय आहे. समर्थ रामदास स्वामी यांनी तो शिवाजी महाराजांच्या काळात स्थापन केला. संत रामदास स्वामींप्रमाणेच या संप्रदायाच्या कवींनी व कवयित्रींनी विपुल लेखन केले आहे. या संप्रदायाची बहुतेक हस्तलिखिते धुळ्याच्या समर्थ वाग्देवता मंदिरात ठेवली आहेत. त्यांचा शोध घेऊन संग्रह करण्यासाठी समर्थ भक्त शंकरराव देव यांनी अपार परिश्रम केले. त्यामुळे हा मौलिक संग्रह आजवर टिकून राहिला.

शिष्यमंडळ
समर्थांनी त्या काळी ११०० मठ स्थापन केले आणि सुमारे १४०० तरुण मुलांना समर्थ संप्रदायाची दीक्षा दिली. त्यांचे काही शिष्य गृहस्थाश्रमी होते, तर काही शिष्य ब्रम्हचारी होते. कल्याणस्वामी रामदासांचे पट्टशिष्य होते. ज्या वेळी एखाद्या शिष्याची महंतपदी नियुक्ती होत असे त्यावेळी त्या शिष्याची कसून परीक्षा घेतली जाई. समर्थांना शिष्याकडून कठोर साधनेची आणि अभ्यासाची अपेक्षा असे.
1) अनंत कवी 2) अनंतबुवा मेथवडेकर 3) अंबिकाबाई 4) आक्का बाई 5) उद्धव स्वामी 6) कल्याण स्वामी 7) भीम स्वामी 8) केशव स्वामी 9) गिरिधर स्वामी 10) आचार्य गोपालदास 11) दत्तात्रय स्वामी 12) दिनकर स्वामी 13) दिवाकर स्वामी 14) भीमदास स्वामी 15) भोळाराम स्वामी 16) मेरु स्वामी17) रंगनाथ स्वामी 18) रघुनाथ स्वामी 19) रोकडाराम स्वामी 20) वासुदेव स्वामी 21) वेणा बाई 22) हणमंत स्वामी 23) श्री हंसराज स्वामी

संदर्भ : श्रीसमर्थ चरित्र -श्रीसमर्थावतार (बा.सी. बेंद्रे)
श्री समर्थ चरित्र -श्री समर्थ संप्रदाय (शंकरराव देव)
लेखक -विजय गोळेसर मोबाईल९४२२७६५२२७
Shree Ramdas Navami Nashik Temple and Details History

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्हिडिओमुळे विद्या बालन नेटकऱ्यांच्या निशाण्यावर

Next Post

राज्यातील ८४६ शाळांमध्ये राबविली जाणारी पीएम श्री योजना आहे तरी काय?

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

Maha Gov logo 07 1 1024x512 1
मुख्य बातमी

बंपर दिवाळी भेट… एकाचवेळी ४७ महसूल अधिकाऱ्यांना बढती… बघा संपूर्ण यादी…

ऑक्टोबर 20, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा लक्ष्मीपूजनाचा दिवस… जाणून घ्या, मंगळवार, २१ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 20, 2025
rape
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक शहरात महिला विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ… या तीन ठिकाणी गुन्हे दाखल…

ऑक्टोबर 20, 2025
Untitled 79
महत्त्वाच्या बातम्या

आज आहे लक्ष्मीपूजन! असे आहे मुहूर्त… अशी करा पूजा…

ऑक्टोबर 20, 2025
Diwali22
महत्त्वाच्या बातम्या

इंडिया दर्पण – दीपोत्सव विशेष – जगभर अशी साजरी होते दिवाळी! देशोदेशी अशा आहेत विविध प्रथा

ऑक्टोबर 20, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा नरक चतुर्दशीचा दिवस… जाणून घ्या, सोमवार, २० ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 19, 2025
indian army e1750762947859
महत्त्वाच्या बातम्या

सुवर्णसंधी! भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? येथे मिळेल मोफत प्रशिक्षण…

ऑक्टोबर 19, 2025
messi
महत्त्वाच्या बातम्या

स्वप्न सत्यात येणार… फुटबॉल सम्राट मेस्सीसोबत खेळण्याची सुवर्णसंधी… युवा फुटबॉलपटूंनो फक्त हे करा…

ऑक्टोबर 19, 2025
Next Post
प्रातिनिधीक फोटो

राज्यातील ८४६ शाळांमध्ये राबविली जाणारी पीएम श्री योजना आहे तरी काय?

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011