शनिवार, ऑक्टोबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

श्रीदत्त परिक्रमा : दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वतींची बोटे उमटलेले श्रीक्षेत्र शिरोळ

डिसेंबर 1, 2022 | 5:03 am
in इतर
0
EvwnVE7XcAQRZO9

इंडिया दर्पण विशेष लेखमाला
श्रीदत्त परिक्रमा
भाग १४  स्थान ५ वे महिमा
श्री दत्तगुरू भोजनलय मंदिर, शिरोळ

श्रीदत्त परिक्रमेत आज आपण कोल्हापूर जिल्हातील शिरोळ या दत्त स्थानाचा महिमा पाहणार आहोत. निष्कामी सेवा करणाऱ्या भक्तांना श्रीदत्तमहाराज दर्शन देतात. एका भाविकस्त्रीच्या घरी भोजन वाढण्यासाठी पात्र नसल्या मुळे स्वामी महाराजांनी अंगणातील एका पाषाणावर अतिप्रेमाने मिटक्या मारून कण्या खाल्या व त्या पाषाणावर आपल्या हाताची शंक, चक्र, पद्य चिन्हानी युक्त अशी पाच बोटे उमटविली.आजही श्रीनृसिंहसरस्वतींची बोटे उमटलेली ती भोजनपात्ररुपी शिळा कोल्हापूर जिल्हातील शिरोळ या तालुक्याच्या गावी त्या ब्राम्हणांच्या वंशजाकडे आहे.

vijay golesar
विजय गोळेसर
मो. ९४२२७६५२२७

||शिरोळचे भोजन पात्र मंदिर||
कोल्हापूर जिल्हातील शिरोळ या तालुक्याच्या गावी श्री सद्गुरू दत्तात्रयांचा द्वितीय अवतार श्री नृहसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचे भोजन पात्र मंदिर आहे. या भोजन पात्राची निर्मिती कशी झाली याविषयी एक प्रसंग घडला तो गुरुचरित्रांत लिहिलेला आहे.
कृष्णा नदीच्या उत्तरेस कोल्हापूर संस्थानात शिरोळ नांवाचे गांव आहे. दत्तावतारी श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज तेथे भिक्षेसाठी गेले. तेथे एक दत्तभक्तीपारायण परंतु अतिशय गरीब ब्राम्हण राहात असे. त्याची पत्नी दत्तभक्त होती. त्यांच्या उद्धारासाठी श्री नृसिंह सरस्वती महाराज भिक्षेच्या हेतूने तेथे गेले. उजव्या हातात ब्रह्म, धेनू, नाग, शंख, आणि परशु मुद्रा या पांच मुद्रा बांधलेला दंड व डाव्या हातात भिक्षापात्र घेऊन, हळुहळू शांतपणे ब्राम्हणाच्या घरी गेले. संन्याशाच्या नियमानुसार ॐ३ऱ्हीं असा उच्चार केला. तो शब्द ऐकल्यावर ब्राम्हणी बाहेर आली. आणि म्हणाली.

“आपण ‘यावे ! यावे ! आपले स्वागत असों’. ह्या दर्भासनावर बसावे. हे पवित्रपाणी पाय धुण्यासाठी… याचा स्वीकार व्हावा !.” यति महाराजांनी पाय धुतले. पवित्र पाण्यानी कमंडलू भरले. यथा विधी आचमन केले व दर्भासनावर बसले. त्या सतीने श्रींचेचरणतीर्थ घेतले. त्यांची पूजा केली. आपल्या अंगावर तीर्थ शिंपडून व प्राशन करून ती कृतार्थ झाली. त्या ब्राम्हणीने श्रीगुरुंचे त्रैलोक्य सुंदर स्वरूप तटस्थतेने बराच वेळ निरखून पाहिले. तरीसुद्धां तिचे समाधान झाले नाही.
ती बोलू लागली… “साधुंच्या आगमनाने आमच्या सारख्या पामरांचे कल्याण होते. आपणासारखे साधू घरदाररुपी अंधकुपात गुरफटलेल्या आम्हांवर अनुग्रह करीत असतात. गृहस्थाश्रमीच्या घरी सदा संतुष्ट असलेल्या साधूंचे अगदी थॊडावेळचे वास्तव्यही आश्रमांस पवित्र करणारे असते. शिजविलेल्या अन्नाची भिक्षा मागणाऱ्यामध्यें ब्रम्हचारी व संन्यासी मुख्य समजावेत. त्यांना अगदी थोडी भिक्षा वाढली तरी अधिक पुण्यकारक असते. ब्रम्हचारी व यति या दोघाना भिक्षा दिली नाहीतर गृहस्थाश्रमी माणसाला पाप लागते, हे सर्व माहित असून सुद्धा मज मंदबुद्धीची आपणास अशी विनंती आहे की….पतिराजांचे कांही कारणास्तव बाहेर जाणे झाले आहे अतिथींचे ते पूर्ण भक्त आहेत. ते लवकरच परत येतील ते परत येईपर्यंत कृपाळू महाराजांनी येथे थांबावे. यति आल्याबरोबर भिक्षा घालणे योग्य तथापि माझी विनंती आहे की…. आपणाकडे पाहिल्यावर माधुकरी हेच साधन आपले असेल असे वाटत नाही. म्हणून मी आपणांस थांबण्याची विनंती केली. यातून आपली इच्छा असेल तसे सांगावे ते (पति) घरी येण्यापूर्वी भिक्षा घाल अशी आज्ञा झाल्यास तसे मी करीन.”

श्री नी या प्रमाणे प्रेमळ व उदार असे साध्वीचे बोलणे ऐकून व हिच्या पतीला माझ्या दर्शनाची योग्यता अजून आलेली नाही असा विचार करून लोकांच्या हृदयांत वास करणारे प्रत्यक्ष श्री हरिरूप व भगवान दत्तमहाराज त्या पतिव्रतेला पुढीलप्रमाणे म्हणाले –
दुपारच्या वेळेला भुकेची व्याधी आम्हांसही उपद्रव देते. त्याच्या वैद्य म्हणजे गृहस्थाश्रमाचे घर आहे. म्हणून दैवाने मिळालेली भिक्षा हेच याचे औषध आहे. हे साध्वी, शरीर हे व्रणासारखे आहे. भिक्षान्न हाच त्याचा लेप आहे. मी रसना जिंकली असल्याने अन्नविषयी हे नीरस, हे मिष्ट, हे थोडे इ. विचार ही मी करीत नसतो मी भुकेलेला आहे. तुझ्या घरात कांहीतरी स्वयंपाक तयार आहे. म्हणून तूं मला लवकर भिक्षा घाल आम्ही शिजवलेल्या (पक्वान्न) अन्नाचे अधिकारी आहोत. असंतोषी यतिने एखाद्या गृहिणीने वाढलेले अन्न अगर इतर कोणताही पदार्थ जर टाकला तर तो यति, संन्यासीधर्माचे उल्लंघन करणारे होते, व त्यामुळे तो अधोगतीला जातो.

साध्वी श्री गुरूना म्हणाली दोष घालविण्यासाठी वैश्वदेव केला पाहिजे. पण तो झाला नाही तथापि वैश्वदेवाकरितां वेगळे अन्न काढून आपणास भिक्षा वाढते. मी जोंधळ्याच्या (ज्वारीच्या) कण्या शिजविल्या आहेत पण घरात पत्रावळ सुद्धां नाही आपण क्षणभर थांबावे. मी लवकर पत्रावळी घेऊन येते ते साध्वीचे शब्द ऐकताच, श्री महाराजांनी अंगणातून एक मोठी शिळा घरात आणली, पाण्यानी धुवून स्वच्छ करून ठेवली, त्याखाली चौकोनी मंडळ करवून घेतले. त्या मंडळावर प्रोक्षण केलेली शिळा ठेवली. तिच्यामध्ये ॐकार युक्त आठ पाकळ्यांचे कमळ काढले व ब्राम्हणीला म्हणाले….

“ह्या पवित्र पात्रात भिक्षा वाढा” सतीने त्यांची आज्ञा ऐकून शिळापात्रात जोंधळ्याच्या कण्या वाढल्या. अपोशन घेऊन संन्यासीरूपात आलेल्या साक्षात भगवान श्री दत्तात्रेयानी पात्रात वाढलेल्या कण्या खाण्यास प्रारंभ केला. श्रीहरी भिक्षा भक्षण करून तृप्त झाले. त्यांनी हात-पाय धुतले. आचमन केले व तेथेच ते अंतर्धात पावले.
नंतर त्या साध्वीचे पति (गृहेश:) घरी आले, त्यांनी सर्व वृत्तांत ऐकला. भगवान दत्तप्रभुंची बोटे उमटलेले ते महाशिळापात्र पाहतांच प्रत्यक्ष श्रीदत्तच आपल्या घरी येऊन भिक्षा घेऊन गेले याचा त्यांना हर्ष झाला तरीपण त्यांच्या दर्शनाचा लाभ झाला नाही म्हणून “मी करंटा आहे माझा धिक्कार असो” असे म्हणू लागले. इतके असून माझ्या पत्नीवर ईश्वराची कृपा झाली. मला जरी ईश्वर दर्शन घडले नाही तरी माझ्या पत्नीला भगवान दत्तप्रभूंचे दर्शन झाल्यामुळे मी सुद्धा तिच्या योगाने धन्य झालो.असे ते ब्राम्हण म्हणाले. त्यानंतर त्या ब्राम्हणानी दररोज आपल्या घरी त्या भोजनपात्राची पूजा केली व कृतकृत्य झाले.

श्री दत्त भगवान- शिरोळ भोजन पात्र
आजही श्रीनृसिंहसरस्वतींची बोटे उमटलेली ती भोजनपात्ररुपी शिळा त्या ब्राम्हणांच्या वंशजाकडे आहे. तेव्हापासून त्या ब्राम्हणाच्या वंशावर श्रीलक्ष्मीची कृपा आहे. निष्कामी सेवा करणाऱ्या भक्तांना श्रीदत्तमहाराज दर्शन देत आहेत. घरी पात्र नसल्यामुळे स्वामी महाराजांनी त्यांच्या अंगणातील एका पाषाणावर अतिप्रेमाने मिटक्या मारून त्या कण्या खाल्या व त्या पाषाणावर आपल्या हाताची शंक, चक्र, पद्य चिन्हानी युक्त अशी पाच बोटे उमटविली ती आजही पाषाणावर दुध घातल्यावर पूर्णपणे दिसतात. स्वामी महाराजांनी त्या साध्वी स्त्रीस या पाषाणाची नित्य त्रिकाळ पूजा अर्चा करण्यास सांगितले. हा काळ शके १३६४ ते १३७६ चा तेव्हा पासून आजतागायत ही पूजा अर्चा सुरू आहे. याकाणी श्री नृहसिंह सरस्वती स्वामींनी माध्यांन काळी भोजन केले. म्हणून या मंदिरास भोजन पात्र मंदिर म्हणतात. त्यामुळेच इथला दत्त जन्मकाळ माध्यांन काळी करण्याची प्रथा आहे.

प.प. वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबे स्वामी महाराजांच्या कृपेने शिरोळ गावातील भिक्षापात्राचे महत्त्व “कुमारशिक्षा” या ग्रंथात त्याच प्रमाने गुरुचरित्रांत देखील याप्रसंगाचे वर्णन सविस्तरपणे आलेले आहे.
आपणही ६०० वर्षानंतरही प्रत्यक्ष श्री दत्तमहाराजांची बोटे उमटलेले भिक्षापात्राचे दर्शन घेऊन धन्य होऊया कृतकृत्य होऊ शकतो.
नुकतेच शिरोळच्या भोजनपात्र मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण झालेला आहे. नृसिंहवाडी प्रमाणेच मंदिराच्या भिंतीस रौप्य पत्र्यावर भिक्षा घालणाऱ्या ब्राह्मणीची प्रतिमा व श्रीगुरु भिक्षा घेत असताना दिसत आहेत. या ठिकाणी श्री गुरु तृप्त होउन आशिर्वाद देउन गेले त्यामुळे येथे मागितलेली कोठलीही संसारीक, भौतिक, अध्यात्मिक भिक्षा श्री गुरु देतातच अशी दत्तभक्तांची ठाम श्रद्धा आहे.
कसे जावे?
सांगलीमार्गे श्री क्षेत्र नृहसिंहवाडी या दत्त क्षेत्रास जातांना रस्त्यात शिरोळ हे क्षेत्र लागते. नृहसिंहवाडीपासून हे क्षेत्र ६ किमी अंतरावर आहे.
संपर्क क्रमांक – अजित कुलकर्णी यांचा मोबाइल क्रमांक ०८४८३९५५२२००

श्रीदत्त परिक्रमेत आज आपण श्रीदत्तात्रयांचे दूसरा अवतार असलेल्या श्रीनृसिंहसरस्वतींची बोटे उमटलेल्या श्रीक्षेत्र शिरोळ येथील भोजनपात्ररुपी शिळा चे दर्शन घेतले. उद्या आपण जिथे साक्षांत दत्त जन्मले त्या माहुर गडावर जावू या!
(संदर्भ सौजन्य www.dattamaharaj.com /श्रीगुरुचरित्र ; छायाचित्र सौजन्य विकिपीडिया)
संपादन प्रस्तुती: विजय गोळेसर मोबाईल ९४२२७६५२२७

Shree Datta Parikrama Shirol Temple by Vijay Golesar
Kolhapur District Dattraya Religious

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण – विचार पुष्प – याची जाणीव करून घ्या

Next Post

भर बैठकीत कामगारमंत्र्यांना जेव्हा बांधकाम कामगाराचा मोबाईलवर मेसेज येतो….

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
girish mahajan
महत्त्वाच्या बातम्या

खऱ्या अर्थाने संकटमोचक… हा निर्णय घेणारे गिरीश महाजन राज्यातील पहिलेच मंत्री… अन्य मंत्रीही आदर्श घेणार?

ऑक्टोबर 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या ९ ऑक्टोबरचे राशिभविष्य

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
IMG 20221130 WA0020

भर बैठकीत कामगारमंत्र्यांना जेव्हा बांधकाम कामगाराचा मोबाईलवर मेसेज येतो....

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011