गुरूवार, ऑक्टोबर 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

श्रीदत्त परिक्रमा – श्रीक्षेत्र मुरगोड आणि श्रीक्षेत्र कुरवपूरचा अगाध महिमा

नोव्हेंबर 21, 2022 | 5:12 am
in इतर
0
EOLo9FtUcAEu761 e1668956755553

इंडिया दर्पण विशेष लेखमाला
श्री दत्त परिक्रमा
श्रीक्षेत्र मुरगोड आणि श्रीक्षेत्र कुरवपूरचा अगाध महिमा

श्रीदत्त परिक्रमा ही लेखमाला प्रथमच मराठीमध्ये प्रसिद्ध होत आहे. त्यामुळेच त्यास उदंड प्रतिसाद मिळत आहे. अनेक वाचकांचे मेसेज आणि फोन येत आहेत. यावरुनच हे लक्षात येते की ती असंख्य वाचकांपर्यंत पोहचते आहे. खासकरुन विदेशातील दत्त भक्तांकडूनही या मालिकेचे स्वागत होत आहे. आतापर्यंत आपण एकूण ९ ठिकाणांची माहिती जाणून घेतली. आज आपण  श्रीक्षेत्र मुरगोड आणि श्रीक्षेत्र कुरवपूरचा अगाध महिमा जाणून घेणार आहोत….

vijay golesar
विजय गोळेसर
मो. ९४२२७६५२२७

१०) श्रीक्षेत्र मुरगोड – प. पू. शिव चिदंबर दीक्षित यांचे मूळपीठ
श्रीक्षेत्र मुरगोड कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्य़ातील सौंदत्ती तालुक्यामधील मुरगोड गावापासून उत्तरेला दोन फर्लाग अंतरावर आहे. बेळगावपासून ५० कि.मी. अंतरावर हे स्थान आहे. हे क्षेत्र चिदंबर क्षेत्र म्हणून ओळखले जाते. अत्यंत सुंदर अशा या क्षेत्राला अमरकल्याण असे आणखी एक नाव आहे. आजूबाजूला डोंगर आहेत. त्या डोंगरातील पाणी वाहून एकीकडे साठते. त्या साठलेल्या पाण्याचे एक तळे निर्माण झाले आहे. अक्कलकोटच्या श्रीस्वामी समर्थाच्या बखरीमध्ये त्यांनी मुरगोड येथे एका मोठय़ा यज्ञ समारंभामध्ये तूप वाढण्याची सेवा केली होती, असा उल्लेख आहे.

या क्षेत्राच्या महाद्वारातून आत आल्यानंतर एक विलक्षण आनंद व समाधान मिळते. समोर सभा मंडप दिसतो. त्याला लागूनच एक कट्टा आहे. चिदंबर महास्वामींचे पिता प्रकांडपंडित मार्तंड दीक्षित यांनी तपश्चर्या केलेली जागा ही आहे. येथे परम पवित्र असा औदुंबर वृक्ष आहे. या औदुंबर वृक्षाचे दर्शन घेऊन प्रदक्षिणा घालणाऱ्यांची मनोरथे पूर्ण होतात अशी भक्तांची श्रद्धा आहे. याच वृक्षातून श्रीचिदंबर महास्वामींनी सुवर्ण नाण्यांची वृष्टी केली होती. त्याच्या दक्षिण दिशेस मातोश्री लक्ष्मी माता मंदिर आहे. औदुंबर कट्टय़ाच्या उत्तरेस श्रीचिदंबर महास्वामींचे मंदिर आहे.
चिदंबर महास्वामींच्या मंदिरासमोर एक मोठा अश्वत्थ वृक्ष आहे. येथे श्रीदत्त पादुका आहेत. श्रीचिदंबर महास्वामींचे पिता श्रीमार्तंड दीक्षित यांनी शके १६८५ साली आपल्या तपोनुष्ठानाकरिता या श्रीदत्त पादुका स्थापन केल्या. या मंदिराला पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर असे दोन दरवाजे आहेत. मुरगोड येथे श्रीचिदंबर महास्वामींना रोज वैदिक पद्धतीने पूजा-अर्चा, रुद्राभिषेक, षोड्शोपचार पूजा, आरती, शेजारती इ. होते. दर सोमवारी संध्याकाळी शिबीकोत्सव (पालखी सेवा)असते. श्रीचिदंबर महास्वामींनी प्रारंभ केलेले अन्नसंतर्पण आजपर्यंत चालू आहे. येथे राहण्याची आणि भोजन प्रसादाची व्यवस्था आहे.
संपर्क : श्रीक्षेत्र केंगेरी मुरगोड, ता. सौंदत्ती जिल्हा बेळगाव
फोन (०८३३७)२६५६७४ केंगेरी ऑफिस मुरगोड मोबाईल ०९४८२८४२०८८

११) निर्जन बेटावरील अद्वितीय श्रीक्षेत्र कुरवपूर – श्रीपाद श्रीवल्लभांचे लीलास्थान
श्रीक्षेत्र कुरवपूर हे एक प्राचीन दत्तक्षेत्र आहे. श्रीपाद श्रीवल्लभ हा दत्तात्रेयांचा प्रथम अवतार असे मानले जाते. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशामध्ये पीठापूर येथे झाला. वयाची सोळा वर्षे झाल्यानंतर ते पीठापूर येथून निघाले. संपूर्ण भारतभर भ्रमण करून ते कुरवपूर या ठिकाणी आले. ही त्यांची कर्मभूमी. श्रीवासुदेवानंद सरस्वती महाराजांनी या ठिकाणाचा शोध लावला. येथे श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादुका असून टेंबेस्वामींची गुहा आहे. या गुहेमध्ये श्रीधर स्वामींनीदेखील वास्तव्य केले होते. कुरवपूर याच ठिकाणी टेंबेस्वामींनी घोरकष्टोद्धरण स्तोत्राची रचना केली आहे.

कुरवपूर (जि. रायचूर) कर्नाटक, हे क्षेत्र कृष्णा नदीमध्ये असलेल्या एका बेटावरआहे. या क्षेत्राच्या चोहोबाजूनी पाणी आहे. याक्षेत्री श्रीपाद वल्लभांनी १४ वर्षे वास्तव्य केले. श्री दत्त अवतारी योगीराज श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबेस्वामी) यांना याच ठिकाणी ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या अठराअक्षरी मंत्राचा साक्षात्कार झाला. याच ठिकाणी वासुदेवानंद सरस्वती यांच्या वास्तव्याने पावन झालेली गुहा आहे. याच ठिकाणी पाचलेगावकर महाराजांना श्रीपाद वल्लभांचा साक्षात्कार झाला.

मुंबई, बंगलोर (व्हाया गुलबर्गा) या रेल्वेमार्गावर रायचूर हे रेल्वे स्टेशन लागते. तिथे उतरून रायचूर बसस्थानकावरून बस मार्गाने ३० कि. मी. अंतरावर अतकूर हे गाव लागते.तिथे जवळ्च कृष्णा नदीचा तीर लागतो. होडिने १ कि. मी. प्रवास करून मंदिरापर्यंत जाता येते. दुसरा मार्ग रायचुर-हैद्राबादया बसमार्गावर मतकल नावाचे गाव लागते. तिथे उतरून रिक्षाने किंवा बसने १६ कि. मी. अंतरावर असलेल्या पंचदेव पहाड या कृष्णा नदीच्या तिरावर असलेल्या गावास जावे लागते. नंतर होडीने प्रवासकरून १ कि. मी. अंतरावर मंदिरापर्यंत पोहोचता येते. हा मार्ग अधिक सोयीचा आहे.

पंचदेव पहाड या गावाजवळ दत्त उपासक विठ्ठल बाबांनी वल्ल्भपूरम नावाचा आश्रम स्थापन केला आहे. या आश्रमात निवासाची व भोजनाची व्यवस्था आहे. स्वत:च्या गाडीने कुरवपूरला जाणा~यांसाठी या आश्रमात गाडी पार्किंगची व्यवस्था आहे. वल्लभपूरम या आश्रमात श्री श्रीपाद वल्लभ स्वामींचा दरबार आहे. याच ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी सूर्यनमस्कार घालण्यासाठी येत असत. याच्या खुणा आजही पाहावयास मिळतात. कुरवपूरला राहण्यासाठी ३-४ खोल्या आहेत व पुजा~यांना भोजनासाठी आधी सांगावे लागते. तिथे काहीही सहज उपलब्ध होत नसते. साधारण पणे महाराजांच्या नियमीत पूजेसाठी लागणारे साहित्य, जसे की तेल, तूप, वाती, गंध, धूप, उदबत्ती, कापूर, फुले इ. सुद्धा शहरातून आणाव्या लागतात.

मंदिर अतिशय पवित्र व जागृत स्थान असल्याने, गाभार्यात पुजारी मंडळी शिवाय कोणीच जात नसते. ज्यांना दर्शन घ्यायचे आहे त्या पुरूषांना सोवळे वा लुंगी नेसावीच लागते. मंदिरात काही लोकांनी दान दिलेल्या लुंगी पायरीवर ठेवलेल्या असतात त्या, तात्पुरत्या वापरता येतात. तिथे प्रसादाचे जेवण घ्यायचे असेल तर गुरूजींना आधी सांगण्याची पद्धत आहे, साधारण पणे रू पन्नास प्रमाणे वा अधिक अशा स्वरूपात भाविक अन्नदान प्रसाद दक्षिणा देतात.
संपर्क : श्री क्षेत्र कुरवपूर, जि. रायचूर श्री मंजुनाथ के. पुजारी मोबा ०९७४०३१३८२८
श्री वासुदेव भट्ट मोबाईल: ०९४८५६८१४८३, ०९७३१८२७५४६, फोन: (०८५३२) २८०५७०
श्री रवी भट्ट एस. पुजारी फोन: (०८५३२) २८००८८
श्री राजेंद्र भट्ट पुजारी मोबाईल: ०९९७२५५९८१८ / ०९३४२७११६४०
होडीसाठी संपर्क श्री अप्पी मोबा.०९९५१५६५९०५

श्रीदत्त परिक्रमेत आज आपण प. पू. शिव चिदंबर दीक्षित यांचे मूळपीठ श्रीक्षेत्र मुरगोड आणि श्रीपाद श्रीवल्लभांचे दुर्गम लीलास्थान श्रीक्षेत्र कुरवपुर या दत्त स्थानांचे दर्शन घेतले.उद्या आपण मंथनगुडी येथे जावू या!
(संदर्भ सौजन्य www.dattamaharaj.com /श्रीगुरुचरित्र)
संपादन प्रस्तुती: विजय गोळेसर मोबाईल ९४२२७६५२२७
Shree Datta Parikrama Mugod Kuravpur by Vijay Golesar

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जिममध्ये वर्कआऊट ही काळजी घ्या, अन्यथा….; अभिनेता सुनील शेट्टींनी दिला हा इशारा

Next Post

स्वप्नील जोशी सोबतच्या त्या इंटिमेट सीनबाबत अभिनेत्री शिल्पा तुळसकर म्हणाली….. (व्हिडिओ)

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
girish mahajan
महत्त्वाच्या बातम्या

खऱ्या अर्थाने संकटमोचक… हा निर्णय घेणारे गिरीश महाजन राज्यातील पहिलेच मंत्री… अन्य मंत्रीही आदर्श घेणार?

ऑक्टोबर 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या ९ ऑक्टोबरचे राशिभविष्य

ऑक्टोबर 9, 2025
IMG 20251008 WA0370
स्थानिक बातम्या

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्वीकारला पदभार….

ऑक्टोबर 9, 2025
महत्त्वाच्या बातम्या

केंद्राचे गिफ्ट! महाराष्ट्रात होणार हे दोन रेल्वेमार्ग

ऑक्टोबर 8, 2025
Next Post
Capture 17

स्वप्नील जोशी सोबतच्या त्या इंटिमेट सीनबाबत अभिनेत्री शिल्पा तुळसकर म्हणाली..... (व्हिडिओ)

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011