गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

श्रीदत्त परिक्रमेत असे आहे श्रीक्षेत्र मंथनगड (मंथनगुडी)चे महत्त्व

by India Darpan
नोव्हेंबर 22, 2022 | 5:03 am
in इतर
0
shree datta2

 

श्रीदत्त परिक्रमा
भाग – १२
असे आहे श्रीक्षेत्र मंथनगड (मंथनगुडी)चे महत्त्व

श्रीदत्त परिक्रमेतील प्रत्येक स्थानाचे काही ना काही महत्व आहे. आज आपण आंध्रप्रदेशातील ज्या मंथनगड किंवा मंथन गुडी नावाच्या क्षेत्राला भेट देणार आहोत त्याचा उल्लेख गुरुचरित्रातील १० व्या अध्यायात आलेला आहे. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी यांचा प्रिय शिष्य वल्लभेश हा कुरवपूरला नवस फेडण्यासाठी जात असता मंथनगड या ठिकाणी चोरांनी त्यास अडवून त्याची हत्या केली. त्यामुळे श्रीपाद वल्लभ स्वामींनी अवतार संपल्यानंतर सुध्दा आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी येथे प्रकट होऊन आपल्या प्रिय शिष्यास परत जिवंत केले. अशी कथा गुरुचरित्रातील दहाव्या अध्यायात सांगितली आहे. आज आपण श्री क्षेत्र मंथनगड या स्थानाचे महात्म्य पाहणार आहोत.

vijay golesar
विजय गोळेसर
मो. ९४२२७६५२२७

||मंथनगडचा महिमा||
आपली श्रद्धा व भक्ती असेल तर स्वामी त्यास प्रचिती देतातच या संदर्भातील एक कथा गुरुचरित्रातील दहाव्या अध्यायात सांगितली आहे ती अशी; कश्यप गोत्रातील श्री वल्लभेश नावाचा एक भाविक श्रीपाद श्रीवल्लभांचा एकनिष्ठ भक्त होता. तो नित्यनेमाने कुरवपुरी येत असे . श्री पादुकांची सेवा करीत असे. पूजा अर्चा करीत असे आणि श्रीक्षेत्री मोठ्या प्रमाणात अन्नदानही करीत असे.
एकदा त्याने आपली मनोकामना श्री चरणी प्रकट केली व नवस केला की जर माझी इच्छा पूर्ण झालीतर मी श्री चरणी मोठी सेवा करेन व सहस्त्र ब्राह्मणास भोजन अर्पण करीन. श्रीपाद श्रीवल्लभांचे कृपेने त्यास शतगुणा फायदा झाला. तो अत्यंत आनंदी झाला व श्रीगुरुस्थानी नवस फेडण्यास व श्री गुरुचरणी कृतज्ञतेने नवस फेडण्यास द्रव्य व साधनसामुग्री घेऊन कुरावपूरकडे निघाला.
वाटेत काही तस्करांनी कपटाने त्याचा विश्वास संपादन केला व आपणही दरवर्षीच्या नियमानुसार श्री क्षेत्रीच जात असल्याचा निर्वाळा दिला. वल्लभेशने त्यांच्याबरोबरच प्रवास सुरु केला. आणि त्याचा विश्वास संपादन करुन एके दिवशी त्या तस्करांनी त्याला विश्वासघाताने झोपेतच ठार केले.
श्रीपाद श्रीवल्लभ सर्वच जाणतात ते त्यांच्या एकनिष्ठ सेवकासाठी धावून आले. त्यांनी आपल्या त्रिशूळानी तिघां तस्करांना ठार मारले. एक तस्कर श्रीचरणी नतमस्तक झाला. त्याने त्यांची क्षमा मागितली व म्हणाला,” स्वामी आपण सर्वज्ञानी आहात, आपणास माहिती आहे मी निर्दोष आहे तर आपण मला जीवदान द्या.”

भक्तवत्सल श्रीपादांचे मनात दया आली. त्यांनी त्याच्या हातात विभूती दिली व वल्लभेश ब्राम्हणाच्या गळ्यास लावून मस्तक धडास जोडण्यास सांगितले. आणि काय आश्चर्य! वल्लभेश उठून बसला. त्यास आश्चर्य वाटले की हे सहप्रवासी भक्त यांना कोणी बरे मारले? तेव्हा त्या तस्करांने सर्व हकीकत वल्लभेश यांस सांगितली.तो म्हणाला , “अरे ते संन्यासी कोठे गेले? आत्ता तर येथे होते.” वल्लभेश जे समजायचे ते समजला. श्री गुरुकृपा होय ज्यासी, कालिकाळाचे भय नाही. त्यांनी श्री गुरु क्षेत्र कुरवपूर येथे जाऊन पूजा व सहस्तरब्रह्मण भोजन समारंभ मोठ्या आनंदाने पार पडला.
ज्याठिकाणी श्रीपादश्रीवल्लभ प्रकट झाले ते स्थान म्हणजे मंथनगड. मतकल मार्गे श्री क्षेत्र कुरवपुरला जाता येतांना हे ठिकाण लागते. या घटनेच्या स्मृती प्रित्यर्थ येथे गुरु मंदिर बांधण्यात आलेलें आहे.

कसे जावे
श्री क्षेत्र मंथनगड हे ठिकाण हैद्राबाद रायचूर बस मार्गावर मतकल पासून १० कि. मी. अंतरावर आहे. मतकल या गावापासून येथे जाण्यासाठी रिक्षा अगर बस मिळतात. मतकल-नरवा आणि मतकल-उजेकोट या बसेस मंथन गड येथून जातात. श्री क्षेत्र कुरवपुरला मतकल मार्गे जातांनाअगर येतांना दत्त उपासकाने या क्षेत्री जाऊन श्रीपादश्रीवल्लभांचे दर्शन घ्यावे असे मानतात.
संपर्क: श्रीक्षेत्र मंथनगोड पुजारी श्री टेकराज जोशी मोबा.०९५७३७३८०६३
श्रीदत्त परिक्रमेत आज आपण गुरुचरित्रातील १० व्या अध्यायात उल्लेख आलेल्या आंध्रप्रदेशातील मंथनगड किंवा मंथन गुडी नावाच्या क्षेत्राचे दर्शन घेतले. उद्या आपण श्रीपाद वल्लभांचे जन्मस्थान असलेल्या पिठापुर येथे जाणार आहोत.

(संदर्भ सौजन्य www.dattamaharaj.com श्री गुरुचरित्र अध्याय १० वा)
संपादन प्रस्तुती: विजय गोळेसर मोबाईल ९४२२७६५२२७
shree datta parikrama Manthangad importance by Vijay Golesar

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण – विचार पुष्प – असेच सारखे होत जाईल

Next Post

कोपरगांव व शिर्डी परिसरात वृक्ष चळवळ निर्माण करणारा अवलिया…! तब्बल ५० हजार वृक्षांना पालकत्व

India Darpan

Next Post
IMG 20221121 WA0007

कोपरगांव व शिर्डी परिसरात वृक्ष चळवळ निर्माण करणारा अवलिया...! तब्बल ५० हजार वृक्षांना पालकत्व

ताज्या बातम्या

Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
bjp11

नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का….या पदाधिका-यांचा भाजपमध्ये प्रवेश

जुलै 3, 2025
Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011