मंगळवार, सप्टेंबर 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

श्री दत्त परिक्रमा भाग २० : हसत खेळत,आनंदाने श्रीदत्त परिक्रमा अशी करा

by Gautam Sancheti
डिसेंबर 6, 2022 | 5:03 am
in इतर
0
shree datta1

इंडिया दर्पण विशेष लेखमाला
श्रीदत्त परिक्रमा
लेख-२०
हसत खेळत,आनंदाने श्री दत्त परिक्रमा कशी करावी?
काही अनुभवी मार्गदर्शक सूचना

ज्या ज्या ठिकाणी श्रीदत्त क्षेत्रे आहेत, त्या त्या ठिकाणी विलक्षण चैतन्यशक्ती वास करत असतात असा अनुभव आहे. श्रीदत्त क्षेत्रांच्या ठिकाणचे वातावरण, तिथला निसर्ग आणि परिसर श्रीदत्त अवतार आणि त्यांच्या शिष्यांच्या तपश्चर्येमुळे, वास्तव्यामुळे आणि लीलांमुळे प्रभावित झालेला आहे. तेथे प्रत्यक्ष गेल्यावर लाखो व्यक्तिंना अशा अनुभूती आलेल्या आहेत.
यावर्षी “इंडिया दर्पण “च्या वाचकांना श्रीदत्त परिक्रमा या विशेष लेखमाले द्वारे आपण प्रथमच मराठीतून श्री दत्त परिक्रमा घडवित आहोत. ‘इंडिया दर्पण’ च्या वाचकांनी या श्रीदत्त परिक्रमा या लेखमाँलेला उदंड प्रतिसाद दिला. या लेखामालेचे वैशिष्ट्ये म्हणजे मराठीतून अशा प्रकारची श्रीदत्त परिक्रमा प्रथमच लेखामालेच्या स्वरूपात सलग प्रसिद्ध झाली आहे.

vijay golesar
विजय गोळेसर
मो. ९४२२७६५२२७

देशातील प्रत्येक श्रीदत्त क्षेत्राला भेट द्यायची भक्तांची इच्छा असते. मात्र तसा योग जमून येणे अवघड असते. संपूर्ण देशात विविध ठिकाणी शेकडो श्रीदत्त क्षेत्रे आहेत आणि गावागावांत एखादे दत्तमंदिर असल्याचे आढळते. मात्र तरीही काही प्रमुख श्रीदत्त क्षेत्रे ही प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरात या चार राज्यांतील अशा २४ दत्त क्षेत्रांना एकत्र गुंफून ही दत्त परिक्रमा करता येते. या दत्त परिक्रमेची सुरुवात सर्वसाधारणपणे पुणे येथून श्रीशंकरमहाराज समाधी मंदिरापासून केली जाते.

या लेखमालेत आपण पुढील दत्त स्थानानाचा महिमा जाणून घेतला.
1. श्रीशंकरमहाराज समाधी मंदिर, पुणे – अक्कलकोट श्रीस्वामी समर्थांचे परमशिष्य महायोगी श्रीशंकर महाराज समाधी.
2. औदुंबर – नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची साधना स्थळ
3. अमरापूर – प्रति काशी, प्राचीन अमरेश्वर मंदिर
4. नृसिंहवाडी – श्री दत्तात्रेयांची राजधानी
5. पैजारवाडी – श्रीचिले महाराज समाधी मंदिर
6. कोल्हापूर – श्री महालक्ष्मी मंदिर
7. कुडुत्री – प. पू. गुळवणी महाराज यांचे जन्मस्थान
8. माणगाव – प. पू. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांचे जन्मस्थान
9. बाळेकुंद्री – प. पू. पंत महाराज बाळेकुंद्रीकर यांचे समाधी मंदिर
10. मुरगोड – प. पू. शिव चिदंबर दीक्षित यांचे मूळपीठ, मूळमहाक्षेत्र संस्थान
11. कुरवपूर – श्रीपाद श्रीवल्लभांचे लीलास्थान
12. मंथनगुडी – गुरुचरित्रामध्ये वर्णन केलेले श्रीपाद श्रीवल्लभ आणि वल्लभेश्वर व्यापारी लीलास्थान
13. पीठापूर : श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्मठिकाण
14. लाड चिंचोळी – प. पू. श्रीधरस्वामी यांचे जन्मस्थान
15. कडगंची – गुरुचरित्र येथे लिहिले गेले…
16. माणिकनगर – प. पू. दत्तावतार माणिकप्रभू यांचे मंदिर
17. बसवकल्याण – दत्तात्रेयांचा कलियुगाच्या प्रारंभीचा प्राचीन अवतार – भुयार आणि शेषदत्त पादुका
18. गाणगापूर – नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे लीलास्थान आणि निर्गुण पादुका
19. अक्कलकोट – श्रीस्वामी समर्थ यांचे समाधी मंदिर
20. लातूर – श्री सदानंद दत्त मठ आणि निर्गुण पादुका
21. माहूर – श्रीदत्तात्रेयांचे जन्मस्थान
22. कारंजा – नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचे जन्मस्थान
23. शेगाव – श्री गजानन महाराज मंदिर
24. अनसुया – अनसुया आणि अनसुया श्रीदत्त तीर्थ क्षेत्र
25. नारेश्वर – प. पू. रंगावधूत महाराज समाधी स्थान
26. तिलकवाडा – प. पू. वासुदेवानंद सरस्वती महाराजांचे चातुर्मास ठिकाण
27. गरुडेश्वर – प. पू. वासुदेवानंद सरस्वती महाराजांचे समाधी मंदिर, नर्मदा नदी

श्रीदत्त परिक्रमेत साधारणपणे 24 स्थानांना भेट दिली जाते ती स्थाने अशी-
१. श्रीशंकरमहाराज समाधी मंदिर, पुणे २. औदुंबर ३. बसवकल्याण ४. नृसिंहवाडी ५. अमरापूर ६. पैजारवाडी ७. कुडुत्री ८. माणगाव ९. बाळेकुंद्री १०. मुरगोड ११. कुरवपूर १२. मंथनगुडी १३. लाडाची चिंचोळी १४. कडगंजी १५. माणिकनगर (हुमनाबाद) १६. गाणगापूर १७. अक्कलकोट १८. लातूर १९. माहूर २०. कारंजा २१. भालोद २२. नारेश्वर २३. तिलकवाडा २४. गरुडेश्वर

दत्त परिक्रमेमध्ये १२ ठिकाणे महाराष्ट्रातील, दोन ठिकाणे आंध्र प्रदेशातील, सहा ठिकाणे कर्नाटकातील आणि चार ठिकाणे गुजरात या राज्यांतील आहेत. एकूण साधारण तीन हजार ६०० कि.मी.चा हा प्रवास असून तो बसने अथवा गाडीने करता येतो. अनेक वाचकांनी दत्त परिक्रमेच्या क्रमा विषयी विचारले आहे. यातील दत्तस्थानांचा क्रम हार्ड आणि फास्ट नाही. आपल्या जवळ असलेल्या दत्त स्थानापासून परिक्रमा सुरु करावी. आपल्याला रुचेल झेपेल अशा प्रकारे आनंदाने परिक्रमा करावी. दत्त गुरुंना आपण माउली म्हणतो. कोणत्याही आईला आपल्या मुलांना त्रास व्हावा असं वाटत नाही. हे लक्षांत ठेवून आनंदाने ही दत्त परिक्रमा करावी.

श्रीदत्त परिक्रमेदरम्यान प्रत्येक तीर्थस्थानी राहण्याची आणि भोजनाची वगैरे सुविधा उपलब्ध आहेत. श्रीदत्त परिक्रमेतील विविध क्षेत्रे श्रीदत्तात्रेयांच्या आणि त्यांच्या अवतारांच्या बरोबर जोडली गेली आहेत. दत्त अवताराचे वेगळेपण हेच आहे की, दत्त अवतारांचे कार्य आणि वारसा विविध सत्पुरुषांच्या माध्यमातून निरंतर प्रवाहित आहे. दत्त परिक्रमेदरम्यान दत्तावतार आणि दत्त कृपांकित संतांचे दर्शन घेता येते.
या विशेष लेख मालेतुन आपल्याला खालील संतांच्या जीवन कार्याची माहिती मिळाली आहे.
१. श्रीपाद श्रीवल्लभ २. श्रीनरसिंह सरस्वती स्वामी महाराज ३. श्रीस्वामी समर्थ महाराज
४. श्रीमाणिकप्रभू महाराज ५. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज ६. पंत महाराज बाळेकुंद्रीकर
७. चिदंबरदीक्षित स्वामी महाराज ८. दीक्षित स्वामी महाराज ९. गुळवणी महाराज
१०. चिले महाराज ११. श्रीधर स्वामी १२. श्री सायंदेव १३. श्री सदानंद दत्त महाराज १४. श्री रंगावधूत महाराज १५. श्रीशंकर महाराज

दत्त परिक्रमेतील ही तीर्थस्थाने विविध राज्यांत विविध प्रदेशांत आहे. मात्र दत्तभक्तीचे सूत्र त्यांच्यामध्ये समान आहे. येथील भाषा, चालीरीती, संस्कृती, खाण्यापिण्याच्या सवयी वेगवेगळ्या आहेत. तेथील भौगोलिक परिसर, जीवन पद्धती, समाजव्यवस्था भिन्न आहे. मात्र एका सूत्ररूपाने ही सर्व क्षेत्रे एकत्र गुंफली गेली आहेत असे लक्षात येते. समाजातील विविध स्तरांतील जनसमुदायांना एकत्र जोडणारी ही दत्त परिक्रमा आहे. या दत्तपरिक्रमेमुले वेगवेगळया प्रांताची वैशिष्ट्ये पाहता अनुभवता येतात. त्याचा आनंद घ्यावा.

‘जे जे भेटिले भूत, ते ते मानिजे भगवंत’ अर्थात प्रत्येक व्यक्तीमध्ये भगवंत आहे, प्रत्येक व्यक्तीमध्ये दत्त आहेत. प्रत्येक व्यक्तीने असे म्हटले पाहिजे की, ‘दत्तोहम!’ याचा अर्थ चांगुलपणाचा, देवत्वाचा, सात्त्विकतेचा अंश प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे. तो फुलवण्याचे काम प्रत्येकाला करायचे आहे. दत्त परिक्रमेमुळे साधकाचे जीवन उजळून निघते, साधक सुवर्णरूपी होतो. याचे मुख्य कारण म्हणजे अनुभूती. प्रत्येक दत्त क्षेत्राच्या ठिकाणी वास करून तेथील अनुभूती भरभरून घेऊन ती व्यक्ती स्वत:मधील शक्तिकेंद्र जागृत करीत असते. समाजाच्या साहाय्याने, विविध लोकांच्या सहकार्याने अनेक व्यक्तींना एकत्र घेऊन, समन्वय साधून एखादे कार्य घडवावे लागते. तीर्थस्थानांना भेटी देऊन मनाला शांतता लाभते आणि प्रसन्नता निर्माण होते.

दत्तात्रेयांचे चोवीस गुरू म्हणजे मानवी शरीरातील २४ शक्तिकेंद्राची प्रतीके आहेत. प्रत्येक मानवी शरीर म्हणजे सर्व विश्वाची एक प्रतिकृती आहे. ‘जे पिण्डी, ते ब्रह्मांडी’ असे म्हटले जाते. साधनेमुळे आणि उपासनेमुळे ही केंद्रे जागृत होत जातात. सृष्टिचक्राशी त्याचा समन्वय होतो, त्याची कार्यक्षमता वाढते, जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन वाढतो. व्यक्ती परिपूर्ण होण्यास सुरुवात होते. श्रीदत्त परिक्रमा हा असाच माणसाची शक्तिकेंद्रे जागृत करण्याचा प्रयास आहे.

नर्मदा परिक्रमा, कर्दळीवन परिक्रमेबरोबरच श्रीदत्त परिक्रमा हे परिक्रमा विश्वाचे एक अनोखे दालन आहे. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे नर्मदा परिक्रमा आणि कर्दळीवन परिक्रमा यामध्ये कठोर परिश्रम याचबरोबर पायी चालणे हा एक मोठा भाग आहे. अर्थात त्यातही खूप मोठा आनंद आहे. श्रीदत्त परिक्रमा ही वाहनाने किंवा बसनेही करता येते. त्यामुळे ही तुलनेने सोपी आहे. शिवाय विविध दत्त क्षेत्रांमध्ये सोयीसुविधा उपलब्ध आहेत.

गुरुचरित्र पारायण कसे करतात?
गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण हा दत्त संप्रदायातील महत्त्वाचा घटक मानला जातो. ७/ १८/ २८/ ३४/ ३७/ ४३/ ५१ दिवस असा ग्रंथाचा पारायण काल सांगितला आहे. दररोज सकाळी अंघोळ, संध्या करून संकल्प करावा. यासाठी कायम एकच आसन वापरावे. पारायण करणा-या व्यक्तीने हलका आणि पोषक आहार घ्यावा. दिवसभर ईशचिंतन करावे. पारायण काळात घोंगडी पसरून जमिनीवर झोपावे. पारायण काळात शरीर, मन आणि बुद्धी यांची शुद्धता पाळावी. पारायण संपले की भोजन आणि दक्षिणा देऊन पारायण संपवावे असे नियम गुरुचरित्राच सांगितले आहेत.सुमारे ५०० वर्षांपूर्वी त्याकाळी हे नियम योग्य होते.पण हल्ली काळ बदलला आहे.जीवन गतिमान झालं आहे. लोकांना वेळ पुरत नाही. एका वाचकाने संक्षिप्त गुरुचरित्र वाचतांना देखील हे नियम पाळवेतच का//? असा प्रश्न विचारला. यावर भाविकाने भक्तीभावाने आनंदपूर्वक गुरुचरित्र वाचावे असे दत्तसंम्प्रदयातील अधिकारी व्यक्तीने सांगितले आहे.

‘इंडिया दर्पण’ च्या वाचकांनी या श्रीदत्त परिक्रमा या लेखमाँलेला उदंड प्रतिसाद दिला. या लेखामालेचे वैशिष्ट्ये म्हणजे मराठीतुन अशा प्रकारची श्रीदत्त परिक्रमा प्रथमच लेखामालेच्या स्वरूपात सलग प्रसिद्ध झाली आहे. दुसरे महत्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे जवळ जवळ प्रत्येक दत्त स्थानांचे दूरध्वनी आणि मोबाईल नंबर व्हेरिफय करुनच दिले आहेत. जे नंबर बंद आहेत किंवा ज्यांचा रिस्पोंस मिळाला नाही ते नंबर दिलेले नाहीत. प्रत्येक दत्त स्थानांतील पुजारी वा व्यवस्थापक यांचेशी बोलून यांना देखील या लेखमालेतील लेख पाठविले आहेत.त्यांचा प्रतिसादही अतिशय उत्साहवर्धक आहे. अनेक भाविक वाचकांना या लेखामालेचे मार्गदर्शन झाले व होत आहे ही’ इंडिया दर्पण’ साठी जमेची बाजू आहे. आणि इंडिया दर्पणच्या वाचकांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे या लेखामालेतील सर्व लेख एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

उद्या दत्त जयंती निमित्त श्रीदत्त परिक्रमेत सर्वांत महत्वाचे श्रीदत्त स्थान प.पू. वासुदेवानंद सरस्वती यांची लिलाभूमी समाधी स्थान श्रीक्षेत्र गरुडेश्वर!!
संदर्भ सौजन्य www.dattamaharaj.com गुरुचरित्र
संकलन संपादन प्रस्तुती: विजय गोळेसर मोबाईल ९४२२७६५२२७
Shree Datta Parikrama How to Do by Vijay Golesar
Religious Temple Dattatreya

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण – विचार पुष्प – …हे उत्तम माध्यम असते

Next Post

अखेर अभिनेत्री सायली संजीवने सोडले मौन; रिलेशनशिपबद्दल केले हे भाष्य

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

IMG 20250916 WA0355 1
स्थानिक बातम्या

नाशिकच्या आधाराश्रमातील कर्णबधिर बालकाला अमेरिकेतील दाम्पत्याने घेतले दत्तक…

सप्टेंबर 16, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात झाली ही वाढ

सप्टेंबर 16, 2025
election11
संमिश्र वार्ता

या विभागातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघाचा पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर…

सप्टेंबर 16, 2025
nsp 1024x305 1
राष्ट्रीय

राष्ट्रीय माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची ही आहे अंतिम तारीख….

सप्टेंबर 16, 2025
crime 1111
क्राईम डायरी

मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले…वेगवेगळया भागातून पाच मोटारसायकल चोरीला

सप्टेंबर 16, 2025
IMG 20250916 WA0298 1
संमिश्र वार्ता

कांदा प्रश्नावर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक…दिले हे निर्देश

सप्टेंबर 16, 2025
SUPRIME COURT 1
महत्त्वाच्या बातम्या

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिले हे निर्देश….आता या तारखेपर्यंत मुदतवाढ

सप्टेंबर 16, 2025
accident 11
क्राईम डायरी

भरधाव दुचाकी घसरल्याने ४४ वर्षीय चालकाचा मृत्यू

सप्टेंबर 16, 2025
Next Post
Sayali Sanjiv e1670247997143

अखेर अभिनेत्री सायली संजीवने सोडले मौन; रिलेशनशिपबद्दल केले हे भाष्य

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011