गुरूवार, सप्टेंबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

श्रीदत्त परिक्रमा भाग २१ तिसरा दत्तावतार प.पू.वस्देवानंद सरस्वती यांचे समाधी स्थान श्री क्षेत्र गरुडेश्वर

by Gautam Sancheti
डिसेंबर 7, 2022 | 5:03 am
in इतर
0
Ee3nm87U8AEvv2I

इंडिया दर्पण विशेष लेखमाला
श्रीदत्त परिक्रमा – लेख-२१
श्रीदत्त स्थान महात्म्य २७ वे

तिसरा दत्तावतार प.पू.वस्देवानंद सरस्वती यांचे समाधी स्थान
||श्री क्षेत्र गरुडेश्वर||

श्रीदत्त परिक्रमेच्या अखेरच्या भागांत आपण नर्मदा तीरावरील गरुडेश्वर या दत्तस्थानी आलो आहोत. प.पू.वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबे स्वामी यांचे हे समाधीस्थान. हिन्दू धर्मांत शंकराचार्य यांना किंवा वारकरी संप्रदायात ज्ञानेश्वर माउलींना जे स्थान आहे तेच महत्व दत्त संप्रदायात वासुदेवानंद सरस्वती यांना आहे.

vijay golesar
विजय गोळेसर
मो. ९४२२७६५२२७

वासुदेवानंद सरस्वती म्हणजे दत्त संप्रदायाचे आदीशंकराचार्य. साक्षांत गुरुदत्ताचा तिसरा अवतार. संन्यासधर्माचे आदर्श आचार्य होत. प्रत्यक्ष भगवान श्रीदत्तात्रेयप्रभूच त्यांच्या रूपाने अवतरले व त्यांनी श्रीदत्त संप्रदायाची संपूर्ण घडी नीट बसवली. नृसिंहवाडी, औदुंबर, गाणगापूर या दत्तस्थानांवर आचारसंहिता घालून दिली व चालू असलेल्या उपासनेला योग्य दिशा व अधिष्ठान प्राप्त करून दिले. भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभस्वामींचे जन्मस्थान- पीठापूर व भगवान श्रीनृसिंह सरस्वती स्वामींचे जन्मस्थान-कारंजा, ही दोन्ही शोधून काढून तेथेही उपासना सुरू करून दिली.

श्री टेंबे स्वामी महाराजांची ग्रंथरचना
वासुदेवानंद सरस्वतींची ग्रंथरचना फार मोठी आहे. गुरुचरित्राचे संस्कृत रूपान्तर ‘गुरुसंहिता’, दत्तविषयक पौराणिक सामग्रीचा उपयोग करून आणि आपले विचार त्यांत प्रसंगौचित्याने ग्रंथित करून लिहिलेले संस्कृत ‘दत्तपुराण’, सामान्यजनांसाठी मराठीत लिहिलेले ओवीबद्ध ‘दत्तमाहात्म्य’, जीवनाच्या अवस्थात्रयीचे नियमन करण्यासाठी लिहिलेले ‘शिक्षात्रय’ कुमारशिक्षा, युवाशिक्षा आणि वृद्धशिक्षा, ‘सप्तशती गुरुचरित्र’ (मराठी : ओवीबद्ध), ‘माघमाहात्म्य’ (मराठी : ओवीबद्ध), ‘स्त्री-शिक्षा’ (संस्कृत) इत्यादी ग्रंथ आणि शेकडो संस्कृत व मराठी स्तोत्रे एवढा त्यांच्या रचनेचा व्याप आहे. त्यांची “करुणात्रिपदी” ही अजरामर रचना जवळपास सर्व दत्तभक्त रोजच म्हणतात. त्यांच्या प्रकांड विद्वत्ता आणि विलक्षण बुद्धिमत्तेचे लोभस दर्शन त्यांच्या विविध ग्रंथांमधून आपल्याला होते.

वाङ्मयाचे वेगळेपण -मंत्रगर्भ रचना
टेंब्येस्वामींच्या वाङ्मयाचे फार मोठे वेगळेपण म्हणजे त्यांची मंत्रगर्भ रचना. ते एकाच स्तोत्रात खुबीने अनेक मंत्र गुंफत असत. ‘श्रीदत्तात्रेय अष्टोत्तरशतनाम’ स्तोत्रामध्ये त्यांनी केवळ चोवीस श्लोकांमध्ये चौदा वेगवेगळे मंत्र गुंफलेले आहेत. त्यासाठी त्यांनी स्वत:च श्रीदत्तप्रभूंची नवीन नावे तयार केलेली दिसून येतात, इतकी त्यांची बुद्धिमत्ता प्रगल्भ होती. त्यांनी श्रीदत्तमाहात्म्याच्या शेवटच्या तीन अध्यायांतील ओव्यांमधून मांडुक्य व ईशावास्य ही दोन उपनिषदे देखील गुंफलेली आहेत. अशाप्रकारची अलौकिक व अपूर्व रचना हे श्री. टेंब्येस्वामींच्या वाङ्मयसागराचे वैशिष्ट्यच आहे! सुमारे पाच हजार पृष्ठांचा हा प्रचंड ग्रंथसंभार स्वामींच्या दत्तभक्तीचे, धर्मनिष्ठेचे, प्रगाढ चिंतनशीलतेचे आणि लोकोद्धाराच्या तळमळीचे प्रत्यंतर घडवत आहे.

श्रीदत्तसंप्रदायाला उपासना आणि तत्त्वज्ञान अशा दोन्ही अंगांनी सबळ आधार आणि दैवी अधिष्ठान देण्याचे कार्य प. प. श्री. टेंब्ये स्वामींच्या ग्रंथांनीच केलेले आहे ! पुण्याच्या श्रीवामनराज प्रकाशन संस्थेने “प. प. सद्गुरु श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज अक्षयवाङ्मयमाला” या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत, प. प. श्री. टेंब्ये स्वामींचे जवळपास सर्व वाङ्मय सुलभ मराठी अर्थासह पुन्हा प्रकाशित केलेले आहे. साधक भक्तांसाठी हे सर्व शब्दवैभव सेवा म्हणून ना नफा तत्त्वावर केवळ निर्मितीमूल्यात उपलब्ध करून दिले जाते.

श्रीदत्त संप्रदायाची घडी बसवली
प. प. श्री. टेंब्येस्वामी महाराज म्हणजे संन्यासधर्माचे आदर्श आचार्य होत. प्रत्यक्ष भगवान श्रीदत्तात्रेयप्रभूच त्यांच्या रूपाने अवतरले व त्यांनी श्रीदत्त संप्रदायाची संपूर्ण घडी नीट बसवली. नृसिंहवाडी, औदुंबर, गाणगापूर या दत्तस्थानांवर आचारसंहिता घालून दिली व चालू असलेल्या उपासनेला योग्य दिशा व अधिष्ठान प्राप्त करून दिले. भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभस्वामींचे जन्मस्थान- पीठापूर व भगवान श्रीनृसिंह सरस्वती स्वामींचे जन्मस्थान-कारंजा, ही दोन्ही शोधून काढून तेथेही उपासना सुरू करून दिली.

गुप्तरूपातील भगवान श्रीमद् आद्य शंकराचार्य
श्री. टेंब्येस्वामींनी संपूर्ण भारत देश पायी फिरून सनातन वैदिक धर्माला आलेली ग्लानी दूर करून धर्माची पुनर्स्थापना केली. त्यांचे कार्य इतके अद्भुत आहे की, त्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. श्रृंगेरी पीठाचे तत्कालीन शंकराचार्य श्रीमत् सच्चिदानंद शिवाभिनव भारती महास्वामींनी उपस्थितांना प. प. श्री. टेंब्येस्वामी महाराजांची ओळख “गुप्तरूपातील भगवान श्रीमद् आद्य शंकराचार्य” अशीच करून दिली होती व हीच वस्तुस्थिती आहे. ते साक्षात् भगवान श्रीशंकराचार्यच होते.

श्री टेंबे स्वामीचरित्र
श्री. टेंब्येस्वामींचा जन्म श्रावण कृष्ण पंचमी, दि. १३ ऑगस्ट १८५४ रोजी सावंतवाडी संस्थानातील माणगांव या छोट्याशा खेड्यात श्री. गणेशपंत व सौ. रमाबाई या अत्यंत सत्त्वशील व दत्तभक्त दांपत्याच्या पोटी झाला. सोळाव्या वर्षापासून ते इतरांना वेद, ज्योतिष, आयुर्वेद, मंत्रशास्त्र इ. शास्त्रे शिकवीत असत. नृसिंहवाडी येथे त्यांना भगवान श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी स्वप्नात मंत्रदीक्षा दिली. पुढे श्रीदत्तप्रभूंच्या आज्ञेने त्यांच्या घरी माणगांव येथे त्यांनी दत्तमंदिर बांधून सात वर्षे उपासना चालविली व देवांच्याच आज्ञेने क्षणात ते सगळे वैभव सोडून बाहेरही पडले. पुढे पत्नीच्या निधनानंतर त्यांनी संन्यास घेतला व नंतरची २३ वर्षे श्रीदत्त संप्रदायाच्या संवर्धनाचे अद्भुत कार्य केले.

भारत-भ्रमण
संन्यास ग्रहणानंतर त्यांनी काशीपासून रामेश्वरापर्यंत आणि द्वारकेपासून राजमहेंद्रीपर्यंत भारत-भ्रमण केले आणि शास्त्राचरणाविषयी लोकांच्या मनात श्रद्धा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अनेक ठिकाणी दत्तमूर्तींची स्थापना केली, दत्तोपासनेचा प्रचार केला आणि उपासनेला सदैव प्रेरक ठरेल अशा मौलिक साहित्याची निर्मिती केली. त्यांनी सर्व प्रवास पायी केला. त्यांची ही पदयात्रा केवळ दोन छाट्या, दोन लंगोट्या व एक कमंडलू एवढ्याच साहित्यानिशी चालू असे. उज्जयिनी, ब्रह्मावर्त, बदरीकेदार, गंगोत्री, हरिद्वार, पेटलाद, तिलकवाडा, द्वारका, चिखलदरा, मेहतपूर नरसी, बढवाणी, तंजावर, मुक्ताला, पवनी, हाबनूर, कुरगड्डी, गरुडेश्वर या ठिकाणी त्यांनी संन्यस्त जीवनातील चातुर्मास काढले. श्रीस्वामी महाराजांचा शेवटचा, म्हणजे तेविसावा चातुर्मास श्रीक्षेत्र गरुडेश्वर येथे झाला.
प. प. टेंब्ये स्वामी महाराजांनी वयाच्या साठाव्या वर्षी, गुजराथ राज्यातील नर्मदा काठावरील पवित्र गरुडेश्वर स्थानी, आषाढ शुद्ध प्रतिपदा, दि. २३ जून १९१४ रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास नश्वर देहाचा त्याग केला. त्यांचे पावन समाधी मंदिर तेथे उभारण्यात आलेले आहे. गरुडेश्वराला त्यांच्या पुण्यतिथीचा उत्सव मोठ्या प्रमाणात होत असतो.

प. पू. वासुदेवानंद सरस्वती महाराजांचे समाधी मंदिर
श्री दत्तप्रभूंचे उपासक आणि दत्तात्रेयांवर संस्कृत तसेच मराठी मध्ये विपुल लेखन संपदा करणारे आचरणनिष्ठ दंडी सन्यासी प. प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज शके १८३५ चैत्र वद्य षष्ठी शनिवारी गरूडेश्वर महादेव मंदिराच्या ओटयावर उतरले होते. तेव्हा येथे घनदाट जंगल होते नंतर प. प. स्वामीजी एकांतात नारदेश्वर महादेव मंदिरात ध्यान- जपादि कार्य करण्यास जात असत.
प. प. स्वामीजीचे वास्तव्य गरूडेश्वरी आहे, असे कळल्यावर स्वामीजींचे भक्त मोठया प्रमाणात गरूडेश्वरी येऊ लागले. ते वेदांत, धर्माचरण, ज्योतिषविद्या, आयुर्वेद वगैरे विविध विषयांवर प्रवचने करीत, तसेच भक्तांच्या समस्येवर योग्य मार्गदर्शन देत असत. सध्या समाधी मंदिराच्या जागी स्वामीजींची पर्णकुटी होती. या ठिकाणी योगीराज वासुदेवानंद सरस्वती यांची समाधी आहे. हे स्थान नर्मदा नदीच्या तीरावर आहे. सर्व प्रमुख दत्त स्थानात या स्थानाचा उल्लेख आहे. नर्मदा पुराणात या स्थानाचा स्पष्ट उल्लेख आहे. दत्तसंप्रदायामधे स्वामींचे नाव आदरने घेतले जाते.

परिसरातील दर्शनीय स्थळे :
श्री गरूडेश्वर महादेव मंदिर याशिवाय या परिसरात , श्री करोटेश्वर मंदिर, श्री नारदेश्वर महादेव मंदिर, श्री दत्त मंदिर, श्री समाधी मंदिर, श्री रंग कुटीर, श्री मन:कामनेश्वर महादेव मंदिर, पू. तात्याबाबा समाधी मंदिर, श्री नर्मदा मंदिर, श्री हनुमान (गुफा) मंदिर, श्री गायत्री मंदिर, श्री भाथीजी मंदिर, भादरवा (३ कि.मी.), पू. स्वामीजीनी तिलकवाडा येथे चातुर्मास केला होता, ते स्थळ (१८ कि. मी.), पैराणिक श्री शूलपाणेश्वराचे मंदिर ( ७ कि. मी.), नर्मदा धरण (१३ कि. मी.), श्री दशावतार मंदिर, रामपुरा (१५ कि. मी.) ही स्थाने प्रेक्षणीय आहेत.

या क्षेत्री असे जावे :
रस्ता मार्गाने: गुजरात राज्य परिवहन निगमची बस उपलब्ध, राजपिपळा, भरूच, अंकलेश्वर, वडोदरा, छोटाउदेपूर, बोडेली, लुणावाडा, डेडियापाडा, धरमपूर, शाहदा, नंदूरबार. (बडोद्याहून खासगी व शासकीय अशी व्यवस्था आधिक आहे)
रेल्वे मार्ग :अंकलेश्वर, भरूच, वडोदरा, डभोई, गरूडेश्वर येथे रेल्वे लाईन नसल्यानी उपरोक्त स्टेशनहुन रस्ता मार्गे गरूडेश्वरला जाता येते.
निवास व भोजन व्यवस्था : साधी खोली किंवा विशेष सोईची खोली ३ दिवसांसाठी मिळते. पारायण, अनुष्ठान वगैरे साठी सतत ७ दिवस खोली मिळविण्यासाठी साधकाने संपर्क करावा. नवीन धर्मशाळा बांधल्या जात आहेत. संस्थानतर्फे अतिशय माफक दरात व्यवस्था होते. रोज दुपारी आरती नंतर अत्यंत माफक दरात भोजनशाळेत महाप्रसाद देण्यात येतो. प्रसादासाठी सकाळी ११:०० वाजेपूर्वी पास मिळविणे आवश्यक आहे.
संपर्क: श्री गरुडेश्वर दत्त संस्थान, व्हाया राजपीपडा, गरुडेश्वर, जिल्हा नर्मदा, गुजरात.
मोबाईल: ९४०९४७९८५८ / ९४०९४५६४४३ फोन: ०२६४४- २३७००५

श्रीदत्त परिक्रमेत आज आपण श्रीदत्तात्रयांचे तिसरा अवतार असलेल्या वासुदेवानंद सरस्वती यांच्या समाधीस्थानाचे गरुडेश्वरचे दर्शन घेतले. अशा प्रकारे आपण श्रीदत्त परिक्रमा या मराठीतील पहिल्या लेखमालेच्या माध्यमातून श्रीदत्त परिक्रमा पूर्ण केली. इंडिया दर्पण मध्ये प्रसिद्ध झालेली श्रीदत्त परिक्रमा ही संपूर्ण लेखमाला इंडिया दर्पण ने एकाच ठिकाणी उपलब्ध करुन दिली आहे. दत्त जयंती निमित्त दत्त भक्तांनी आपल्या जास्तीत जास्त परिचितांना ही लेखमाला शेअर करावी ही विनंती.
||श्रीगुरुदेव दत्त समर्पणं अस्तु||
(संदर्भ सौजन्य www.dattamaharaj.com /श्रीगुरुचरित्र)
संपादन प्रस्तुती: विजय गोळेसर मोबाईल ९४२२७६५२२७
Shree Datta Parikrama Garudeshwar by Vijay Golesar

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण – विचार पुष्प – एक क्षण असा येईल जेव्हा….

Next Post

इच्छुकांनो, तत्काळ अर्ज करा आणि मिळवा तब्बल ३० लाख रुपयांचे कर्ज; अशी आहे ही सरकारी योजना

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

HYRYDER LE car 1 1
संमिश्र वार्ता

टोयोटा किर्लोस्‍कर मोटरकडून नवरात्री निमित्त ही ऑफर…१ लाख रूपयांहून अधिक फायदा

सप्टेंबर 11, 2025
ASHTAVINAYAK 2 1024x682 1
राज्य

अष्टविनायक विकास आराखडा….उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले हे निर्देश

सप्टेंबर 11, 2025
crime 88
क्राईम डायरी

नाशिकमध्ये वेगवेगळया भागात चार घरफोड्या…तीन लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

सप्टेंबर 11, 2025
Untitled 11
संमिश्र वार्ता

धक्कादायक….महसूल अधिकाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी रेती माफियांकडून ड्रोनचा वापर

सप्टेंबर 11, 2025
ladki bahin yojana e1722514675247 750x375 1
संमिश्र वार्ता

लाडकी बहिण योजनेतील ऑगस्टचा सन्मान निधी तुमच्या खात्यात जमा झाला का? चेक करा बँक खाते

सप्टेंबर 11, 2025
crime1
क्राईम डायरी

नाशिकच्या महिलेसह तिघांना सव्वा कोटीला गंडा….अशी केली फसवणूक

सप्टेंबर 11, 2025
Untitled 10
संमिश्र वार्ता

यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड…१२ ठिकाणी छापे, ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त

सप्टेंबर 11, 2025
SUPRIME COURT 1
संमिश्र वार्ता

भारत – पाकिस्तान सामना रद्द करण्यासाठी याचिका…सर्वोच्च न्यायालयाने दिला हा निर्णय

सप्टेंबर 11, 2025
Next Post
प्रातिनिधीक फोटो

इच्छुकांनो, तत्काळ अर्ज करा आणि मिळवा तब्बल ३० लाख रुपयांचे कर्ज; अशी आहे ही सरकारी योजना

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011