बुधवार, डिसेंबर 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

श्रीदत्त परिक्रमा भाग १८: श्री क्षेत्र भालोद आणि अनसूयातीर्थ यांचे असे आहे महत्व

डिसेंबर 4, 2022 | 5:03 am
in इतर
0
El3Y0k3XgAAVffp

इंडिया दर्पण विशेष लेखमाला
श्रीदत्त परिक्रमा
लेख १८ वा  स्थान २४ वे 
श्री क्षेत्र भालोद आणि अनसूयातीर्थ

श्रीदत्त परिक्रमेत आपण विविध प्रांतातील श्रीदत्त स्थानांचा महिमा जाणून घेतो आहोत. अशा प्रकारची दत्त परिक्रमा लेखमाला मराठीत प्रथमच प्रसिद्ध होत असल्याने श्रीदत्त देवस्थान मधील पुजारी आणि व्यवस्थापक यांचे प्रमाणेच ‘इंडिया दर्पण’च्या असंख्य वाचकांचा अतिशय भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आज आपण गुजरात मधील एकमुखी दत्त मंदिर असलेले श्रीक्षेत्र भालोद आणि श्रीक्षेत्र अनुसूयातीर्थ या दत्त स्थानांचे महात्म्य जाणून घेणार आहोत.

vijay golesar
विजय गोळेसर
मो. ९४२२७६५२२७

||श्री क्षेत्र भालोद||
गुजरात मधील भालोद येथील प्रतापे महाराजांचा मंदिरात चौदाव्या शतका मधील एकमुखी दत्तात्रेयांची मूर्ती आहे. या मूर्तीचे वैशिष्ट्ये म्हणजे अंधारात किंवा उजेडात केंव्हाही पहिलं तरी मूर्तीच्या पोटावर गोमुख दिसते .
श्री क्षेत्र भालोद हे ठिकाण नाशिक ३०० कि. मी., मुंबईपासून ४०० कि. मी.,पुण्यापासून ६६० कि. मी. अंतरावर, गरुडेश्वरपासून ५५ कि. मी., तर नारेश्वरपासून ७५ कि. मी. अशा अंतरावर आहे.

चौदाव्या शतका मधील एकमुखी दत्तात्रेयांची मूर्ती येथे आहे. यामुर्तीची विशेषता अशी आहे की अंधारात पहा की उजेडात मूर्तीच्या पोटावर गोमुख दिसते. नर्मदा परिक्रमेमध्ये श्रीदत्तप्रभूंची मंदिरे अगदी मोजकीच आहेत. जबलपूर, होशंगाबाद, गरुडेश्वर, राजघाट (चिखलदाच्या समोर) आणि भालोद. यातील दक्षिण किनाऱ्यावर राजघाट आणि भालोद हिच दोन दत्तमंदिरे आहेत. प. प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या प्रत्यक्ष हाताने प्रस्थापित झालेले राजघाटचे दत्त मंदिर आहे. यानंतर जर दुसरं म्हणाल तर ते भालोदचे एकमुखी दत्त मंदिर हे आहे. राजघाट येथिल श्रीदत्तमंदिर हे सुद्धा एकमुखी दत्ताचे मंदिर आहे.

स्वामी महाराजांच्या चातुर्मास चिखलदा (म. प्र.) येथे असताना भक्तांच्या आग्रहाखातर महाराजांच्या मार्गदर्शनाखाली राजघाटच्या मंदिराचे कार्य झाले आहे. योगा योगाचं असेल कदाचित! महाराजांच्या स्वप्न दिक्षेनंतर पू. शरदचंद्र प्रतापे महाराजांच्या दोन नर्मदा परिक्रमा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण झाल्या आणि त्यांना भालोद येथे राहण्यासाठीचा आदेश मिळाला. याच दरम्यान बडोदा येथे काशिताई निरखे यांच्याकडे असलेली पुरातन दत्तमुर्ती भालोद येथे अचानक आली आणि येथे दत्त मंदिर स्थापन झाले.

काशिताई निरखे यांच्या आजोबांना रात्री दत्तप्रभूंनी प्रत्यक्ष येऊन मी नर्मदेच्या पाण्यात आहे, मला तू घेऊन जा, असे स्वप्नामध्ये सांगितले. त्याप्रमाणे दत्तप्रभूंची मूर्ती शोधत आली आणि बडोदा येथे त्यांचे मंदिर देखिल बनले. आजोबांनंतर त्यांचा मुलगा आणि मग नातीकडे (काशीकडे) मंदिराचा कारभार आला. त्यांनी ८५ पर्यंत वयाची मजल गाठली. पुढे कार्य होत नव्हते, काय करावे ते कळत नव्हते. पण शेवटी भक्तांची काळजी देवालाच असते ना ! त्यांना रात्री स्वप्न पडले आणि श्रीदत्तप्रभूंनी आदेश दिला कि उद्या नर्मदा किनाऱ्यावरून जो गृहस्थ येईल त्याला तू मला देऊन टाक. अगदी तसेच घडले. पू. प्रतापे महाराज मंदिरात पोहोचले आणि दत्तप्रभू भालोदला आले. नर्मदा किनाऱ्यावरील भालोद येथिल ही मूर्ती एकमुखी आणि शाळीग्रामाची आहे. वक्षस्थळावर गोमुख स्पष्टपणे दिसते ! निरखून बघितल्यावर योगाचे षट्चक्षु पण लक्षात येतात!

मंदिराचा परिसर अत्यंत रमणीय आहे, आश्रमा समोर नर्मदचे विशाल पात्र, सुंदर स्वच्छ पाणी, मोरांचा सदैव आश्रमातला वावर, मनाला भुरळ घातल्याशिवाय राहणार नाही! भालोद या ठिकाणी कन्यापूजन हा विधी केला जातो. तसेच नर्मदामातेची ओटी भरली जाते. येथे हमखास नर्मदा परिक्रमार्थी भेटतात. त्यांचेसाठी सदावर्त आणि राहण्याची व्यसस्था येथे आहे. याठिकाणी श्रीसत्यदत्तपूजा आणि दत्तयाग हे विधी करता येतात. श्रीगुरूचरित्राच्या पारायणासाठी राहता येते. येथून नर्मदा नदीच्या विशाल पात्रातून होडीने श्रीक्षेत्र नारेश्वराला जाता येते. साधारण एक तासाचा प्रवास आहे. नर्मदेच्या विशाल पात्राचे दर्शन आणि दोन्ही तीरावरील मंदिरे पहात जाण्याचा हा अनुभव विलक्षण आहे.
संपर्क: श्रीदत्त मंदिर देवस्थान श्रीक्षेत्र भालोद,ता.जगड़िया जिल्हा भरूच गुजरात
दूरध्वनी (०२६५)२४३६०३ मोबाइल ०७७३८३६०८८०

श्रीदत्त परिक्रमा || श्री क्षेत्र अनसूयातीर्थ ||
अनसुया आणि अनसुया श्रीदत्त तीर्थ क्षेत्र
प्रतापनगर (बडोदे) वेस्टर्न रेल्वेलाईनवरून डभोईमार्गे दहा मैलांवर चांदोद (गुजरात) नावाचे क्षेत्र आहे. त्या ठिकाणी नर्मदा नदीचे विस्तीर्ण पात्र आहे. समोरच पूर्वबाजूस ‘कर्नाळी क्षेत्र’ आहे. कर्नाळी व नर्मदेचे मधून ‘ओर’ नदी वाहते, त्या ठिकाणी ओरसंगम आहे. हा संगम पवित्र असल्याने तेथे मृत माणसांच्या अस्थी विसर्जन करतात.
चांदोद क्षेत्राचे पश्र्चिम दिशेस सुमारे दोन मैलांवर नर्मदा नदीचे तीरावर शिनोर नावाचे गाव आहे. शिनोरपासून ‘अनसूयातीर्थ-क्षेत्र दत्तस्थान’ पाच मैलावर नर्मदेच्या तीरावरच आहे. त्या ठिकाणी महासती साध्वी दत्तात्रेयमाता अनसूया यांचे मंदिर आहे. अशाच प्रकारचे दत्तस्थान महाराष्ट्रातील माहुर गडावर देखील आहे. येथे मंदिरासमोरच श्रीदत्तात्रेय यांचे मंदिर आहे. हे स्थान अत्यंत पवित्र, निसर्गसुंदर व रमणीय आहे.

या दत्त स्थानाचे वैशिष्ट्ये म्हणजे येथील माती औषधी गुण असलेली आहे. अनसूया मंदिराजवळची माती निष्ठापूर्वक लाविली असता अनेक त्वचारोग बरे होतात, असे कित्येक भाविक भक्तांचे अनुभव आहेत. तसेच अनसूया देवी नवसास पावते अशी भाविक लोकांची श्रद्धा आहे! गंगासप्तमीला अनसूयाक्षेत्री मोठा मेळा भरतो. दर रविवार, मंगळवार, शुक्रवार या दिवशी दर्शनासाठी लोकांची अतिशय गर्दी होते.
येथे रक्तपिती लोकांचा प्रसिद्ध दवाखाना आहे. अनेक रोगी येथे बरे होतात. त्यांचेसाठी मोफत औषधोपचार करण्यात येतात!

श्रीदत्त परिक्रमेत आज आपण श्रीक्षेत्र अनसूयातीर्थ आणि श्रीक्षेत्र भालोद यांचे दर्शन घेतले.उद्या आपण श्रीरंगावधुत महाराज यांची लिलाभूमी असलेल्या श्रीक्षेत्र नारेश्वरचा महिमा जाणून घेऊ या!
(संदर्भ सौजन्य www.dattamaharaj.com /श्रीगुरुचरित्र)
संपादन प्रस्तुती: विजय गोळेसर मोबाईल ९४२२७६५२२७
Shree Datta Parikrama Bhalod Anasuyatirtha by Vijay Golesar
Religious Dattatreya Places Temple

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण – विचार पुष्प – त्यांचा काहीच उपयोग नसतो

Next Post

G20 परिषदेमुळे जगभरातील ५०० प्रतिनिधी औरंगाबादला देणार भेट; पर्यटनाला मिळणार चालना

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
DSC6662 1140x570 1

G20 परिषदेमुळे जगभरातील ५०० प्रतिनिधी औरंगाबादला देणार भेट; पर्यटनाला मिळणार चालना

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011