श्री गुरुदेव दत्त यांचे २४ गुरु
श्री गुरुदेव दत्त यांनी आपल्या अवतार कार्यात निसर्गातील विविध २४ घटकांना गुरु केले होते. या सर्वांना त्यांच्या गुण, स्वभाव व कार्य वैशिष्ट्यामुळे आपल्या गुरुस्थानी मानले होते. हे २४ गुरू कोणते ते आज आपण दत्त जयंतीनिमित्त जाणून घेणार आहोत….

व्हॉटसअॅप – 9373913484
पृथ्वी
पृथ्वी ही 24 तास अहोरात्र कार्यरत असते. आपल्यावरील सर्व जीव सजीवांचे पालन-पोषण पृथ्वी करत असते.
वायू
पृथ्वीवर वायू वाहताना सर्वत्र वाहतो. एका ठिकाणी थांबण्याची आसक्ती नसते.
आकाश
भव्यता, व्याप्ती, निर्विकारपणा.
पाणी
पक्षपात न करता सर्व जीव सजीवांची तृष्णा भागवते.
अग्नी
स्वतः तप्त राहून इतरांना उजेड व ऊर्जा देतो.
चंद्र
सोळा कलांमुळे अनेकदा आकार कमी जास्त होतो. तरी स्वतः वर कोणताही परिणाम करून घेत नाही
सूर्य
पृथ्वीवरील सर्व घटकांना समान सूर्यप्रकाश. उष्णता देतो.
कपोत
विषय लालसेची आसक्ती न टाळल्यास आत्मघात होतो
अजगर
अजस्त्र असला तरी प्रारब्धावर विश्वास ठेवून आपल्या शक्तीचा दुरुपयोग करत नाही
समुद्र
भव्यता गुणदोषांसहित समावेशकता
पतंग
मोह वा आसक्ती पासून दूर राहिले नाही तर आत्मघात निश्चित
मधमाशी
सदैव कार्यरत राहण्याचा गुण घ्यावा परंतु अति संग्रह करु नये
गजेंद्र
अजस्त्र ताकद असली तरी तर्क योग्य बुद्धी असावी. विषय सुखास भुलून वाममार्ग पत्करू नये
भ्रमर
मोहात अडकून पडू नये
कस्तुरी मृग
स्वरूपाच्या बंधनात अडकू नये
मासा
मोह, आसक्ती, रुपी गळाला वेळीच ओळखावे
कंकण
स्वतःच्या कमी ज्ञानाचा अती आवाज करू नये
पिंगळा
स्वरूपावर मोहित होऊन अती अपेक्षा टाळाव्यात
टिटवी
मोहरूपी उपाधी झुगारणे, लालसा टाळणे
बालक
मान-अपमान, ओळखपाळख, आपले-परके असे न बघता सर्वांशी हास्य वंदन करणे
कारागीर
नित्य कर्मात एकाग्रचित्त होणे….
अशा 24 निसर्ग घटकांना श्री गुरुदेव दत्त यांनी गुरु केले. त्यांच्या गुणवैशिष्ट्यांचा आदर्श आयुष्यासाठी बोध घेऊन गुरुस्थानी मानले होते….
सर्वांना दत्त जयंतीच्या शुभेच्छा
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त