नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय संस्कृतीत सणवार आणि उपवास, वृतवैकल्यांना महत्त्वाचे स्थान आहे, विशेषतः नवरात्रात बहुतांश जण उपवास करतात. या उपवासात अनेक जण केवळ फळे आणि फराळावरच दिवसभर राहतात, त्यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मात्र आरोग्याची काळजी घेऊन कोणते पदार्थ घ्यावेत हे समजून घेणे आवश्यक आहे.
नवरात्रीत उपवास करण्याची मोठी परंपरा आहे. काही जण आपल्या आरोग्य आणि सुविधेनुसार केवळ फलाहार करतात. तर काही जण दिवसभर उपवास करून संध्याकाळच्या वेळेस अन्नग्रहण करतात. काही जण यावेळी सैंधव मीठ खातात. व्रतमध्ये खाण्यापिण्यावर विशेष लक्ष देणे गरजेचे असते. व्रतामध्ये स्वत:चे आरोग्यही जपणे तितकेच महत्त्वाचे असते. यामुळे उपवासही होतो आणि आरोग्यावरही लक्ष ठेवले जाते.
अनेक जण दिवसभर काहीही खात नाहीत आणि काहींना उपवासात फलाहार घेणे आवडते. भारतात, उपवासाला खूप मान्यता आहे आणि श्रावणात बरेच वार उपवास ठेतात, उपवासाच्या दिवशी आहारात अशा काही पदार्थांचा वापर केला जाऊ शकतो ज्यामुळे दिवसभर ऊर्जा मिळेल. उपवासाला चालणारे त्याचबरोबर उर्जा प्रदान करणारे कोणते पदार्थ आहेत समजून घ्यावे.
सकाळी नऊ वाजेपर्यंत पुजा-पाठ करून नाश्ता करा. नाश्त्यामध्ये असे पदार्थ खा ज्यामुळे पोट जास्त काळापर्यंत भरलेले राहील. जसेच साबुदाणा खीर अथवा अशी फळे ज्यामुळे अॅसिडिटी अथवा गॅस होणार नाही. यासोबतच ड्रायफ्रुटसही खाऊ शकता. यात ५ बदाम आणि २ अक्रोड खा. यामुळे पोट खूप वेळेपर्यंत भरलेले राहील. ड्राय फ्रुट्स जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने इत्यादींनी समृद्ध असतात, ज्यामुळे ते एक परिपूर्ण आहारात समाविष्ट होतात.ज्या रुग्णांना दिवसभर मर्यादित प्रमाणात साखर घ्यावी लागते त्यांच्यासाठी देखील हा चांगला पर्याय आहे. यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह भरपूर प्रमाणात असते. ड्रायफ्रुट्स खाताना काजू, बदाम, पिस्ता, बेदाणे इत्यादी समप्रमाणात खा.
संध्याकाळच्या वेळेस तुम्ही चहा पिऊ शकता. हवे तर ग्रीन टीही घेऊ शकता. यासोबतच तुम्ही शिंगाड्याचे पीठ आणि बटाट्यानी बनवलेली ग्रिल्ड अथवा शॅलो फ्राय टिक्की खाऊ शकता. शिंगाड्याच्या पिठात कार्बोहायड्रेटसोबत झिंक, फॉस्फरस, कॅल्शियम आणि आर्यनही असते. ज्यामुळे एनर्जी मिळते. जर रात्री फलाहार करणार असाल तर उकडलेले रताळे आणि दही खाऊ शकता.
उपवास किती काटेकोरपणे पाळू शकता हे त्या व्यक्तीच्या विश्वासावर तसेच त्याच्या आरोग्यावर अवलंबून असते. काही जण दिवसभर उपाशी राहतात आणि फक्त संध्याकाळी हलकी फळे खातात, तर काही लोक उपवासात सामान्य अन्न खाण्याऐवजी फळे, दूध आणि इतर उपवासाचे पदार्थ खातात, तर काही जण दिवसभर उपाशी राहतात. मात्र आपल्या आरोग्याचा विचार करून उपवासाची पद्धत निवडावी.
उपवासासाठीच्या साबुदाण्यांमध्ये स्टार्चचे प्रमाण जास्त असल्याने ते ऊर्जा देतात. 100 ग्रॅम साबुदाणामध्ये सुमारे 94 ग्रॅम कार्बोहायड्रेट असते. एवढ्या जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट खाल्ल्यानंतर अधिक ऊर्जा मिळते आणि उपवासाला साबुदाणा खाल्ल्यास पोट अधिक भरलेले वाटते. साबुदाण्याचे पदार्थ कसेही बनवले तरी त्यात तेलाचा वापर कमी करायचा हे ध्यानात ठेवले पाहिजे.
उपवासाला वापरात येणाऱ्या शिंगाड्याच्या पीठात फायबरचे प्रमाण जास्त असते जे शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करते आणि त्याच वेळी ते प्रथिने आणि बी-कॉम्प्लेक्स जीवनसत्त्व देखील भरपूर असते ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. एका संशोधनात असे म्हटले आहे की ज्यांच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी होत जाते त्यांनी आहारात शिंगाडा घेणे चांगले आहे.
आहारात प्रथिनांची आवश्यकता असल्यास त्यांनी राजगिऱ्याचे सेवन करावे. राजगिरा फुलांच्या प्रकारातून उगम पावला असला तरी अलीकडच्या संशोधनामुळे त्याला तृणधान्यांच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. याला सुपर-ग्रेन म्हणतात ज्यामध्ये कार्बोहायड्रेट आणि फायबर भरपूर असतात. राजगिराच्या एका कपामध्ये 46 ग्रॅम कर्बोदके आणि 5 ग्रॅम फायबर असतात. यासोबतच त्यात कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, लोह, फोलेट यांसारखी खनिजे असतात.
विशेष म्हणजे फराळ म्हणून दिवसातून चार वेळा खाता येईल, अशी एखादी वस्तू हवी असेल तर मखाना सर्वोत्तम ठरेल. हा एक अतिशय हलका नाश्ता आहे आणि संशोधनानुसार ते रक्तातील साखरेची पातळी सुधारण्यास मदत करू शकते. माखाना पौष्टिकतेने भरलेला असतो तसेच त्यात कर्बोदक पदार्थ असतात जे ऊर्जा देतात. मखन्यामध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि लोह भरपूर असते जे तुम्हाला ऊर्जा देऊ शकते.
Shravan Upvas Food Items Health Nutrition Full Day Fast