शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

१९ वर्षांनी जुळून आला हा योग! यंदा श्रावणात किती उपवास करायचे? अशी करा व्रतवैकल्ये

by India Darpan
जुलै 15, 2023 | 1:28 pm
in इतर
0
bijapur mahadev


नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जाणारा चातुर्मास यंदा पाच महिन्यांचा आहे. नियमित कालावधीने येणारा पुरुषोत्तम अर्थात अधिक मास हा चातुर्मासात आला आहे. त्यातल्या त्यात श्रावणात अधिक मास आल्याने दोन श्रावण मास पाळायचे की काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यंदा आलेला हा योग तब्बल १९ वर्षांनी जुळला आहे.

पुरुषोत्तम मास, मल मास, अधिक मास तसेच धोंड्याचा महिना आदी नावांनी ओळखल्या जाणाऱ्या या महिन्याचे अध्यात्मिकदृष्ट्या महत्त्व आहे. यंदा हा महिना श्रावणात आल्याने अधिक श्रावण आणि निज श्रावण असे दोन श्रावण मास आहेत. यातील निज श्रावणात येणारे सोमवार उपवासाचे सोमवार म्हणून पाळावे, असे सांगण्यात येत आहे. चातुर्मास सुरू झाल्यानंतर पहिला श्रावण महिना येतो.

श्रावण महिना महादेवांना समर्पित असल्याचे सांगितले जाते. भगवान शंकराच्या पूजेसाठी श्रावण विशेष मानला जातो. यावर्षीचा श्रावण खूप खास असल्याचे बोलले जात आहे. नियमित श्रावण महिन्यात ४ किंवा ५ श्रावणी सोमवार येतात. मात्र, यंदाचा श्रावण संपूर्ण दोन महिन्यांचा असणार असून, महादेवाचे पूजन, नामस्मरण, आराधना करण्यासाठी भाविकांना चार नव्हे तर आठ श्रावणी सोमवार मिळणार आहेत.

ही कामे टाळा
अधिकमासामध्ये काम्यकर्मे वर्ज्य करत, निष्कामकर्मे करावीत असे शास्त्र सांगते. त्याचप्रमाणे अधिक महिन्यात विवाह, उपनयन, उत्सव, कोणत्याही व्रताचे उद्यापन, गृहप्रवेश, वास्तुशांती, प्रथम तीर्थस्नान, प्रथम देवदर्शन, देवांची प्राणप्रतिष्ठा, नवीन कामास प्रारंभ, नारायण नागबली, त्रिपिंडी श्राद्ध, नवीन कोणतेही पदग्रहण, नवीन वस्त्रे व दागिने धारण करणे यांसारखी कामे वर्ज्य करावीत, असे शास्त्रात सांगितलेले आहे.

असे पाळा श्रावणी सोमवार
अधिक मासानंतर १७ ऑगस्ट २०२३ पासून निज श्रावण सुरू होत असून, तर निज श्रावण महिना शुक्रवार, १५ सप्टेंबर २०२३ रोजी संपत आहे. निज श्रावण महिन्यात श्रावणी सोमवारी केली जाणारी व्रते, उपासना करता येणार आहेत. निज श्रावण महिन्यातील पहिला श्रावणी सोमवार, २१ ऑगस्ट २०२३ रोजी येत आहे. दुसरा श्रावणी सोमवार, २८ ऑगस्ट २०२३ रोजी आहे. तिसरा श्रावणी सोमवार, ०४ सप्टेंबर २०२३ रोजी आहे. तर शेवटचा म्हणजेच चौथा श्रावणी सोमवार, ११ सप्टेंबर २०२३ रोजी आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

खाते पाटप होताच मंत्री आदिती तटकरेंनी सुरू केले काम… याला देणार प्राधान्य

Next Post

यंदा श्रावणात ४ नव्हे तब्बल ८ सोमवार; कसं काय?

Next Post
E8USdmVUcAQa0Jz e1687145180910

यंदा श्रावणात ४ नव्हे तब्बल ८ सोमवार; कसं काय?

ताज्या बातम्या

Picture13FLUO

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थायलंडहून आलेला २५ कोटीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त…

जून 20, 2025
crime1

हरवलेल्या मोबाईलचा वापर करीत भामट्यांनी बँक खात्यावर मारला डल्ला

जून 20, 2025
fir111

बहिणीच्या लग्नासाठी कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने मित्रालाच घातला गंडा…गुन्हा दाखल

जून 20, 2025
Untitled 67

रिलायन्स ज्वेल्सतर्फे संपूर्ण भारतात बिग बँगल फेस्ट… या आहे आकर्षक ऑफर्स…

जून 20, 2025
rain1

राज्यात काही ठिकाणी मध्यम तर या भागात मुसळधार पावसाची शक्यता…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

जून 20, 2025
Untitled 65

गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु…गोदावरी नदीला पूर….

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011