इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – श्रावण महिना येत्या ४ जुलैपासून सुरू होत आहे. हिंदू पौराणिक मान्यतेनुसार या महिन्याचे विशेष महत्त्व आहे. हा महिना भगवान शिवाला समर्पित आहे. अशा परिस्थितीत IRCTC ने तुमच्यासाठी सावन महिन्यात एक अप्रतिम टूर पॅकेज आणले आहे. त्याविषयीच आपण आता जाणून घेऊया…
या टूर पॅकेज अंतर्गत तुम्हाला ७ ज्योतिर्लिंगांना भेट देण्याची संधी मिळत आहे. या टूर पॅकेज अंतर्गत तुम्हाला भीमाशंकर, ग्रीनेश्वर, महाकालेश्वर, मल्लिकार्जुन, ओंकारेश्वर, परळी वैजनाथ, त्र्यंबकेश्वर या ज्योतिर्लिंगांना भेट देता येणार आहे. IRCTC च्या या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला अनेक उत्तम सुविधा देखील मिळत आहेत.
तुम्हालाही श्रावण महिन्यात सात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ्यायचे असेल. तर, तुम्ही हे टूर पॅकेज चुकवू नका. IRCTC च्या या टूर पॅकेजचे नाव आहे हर हर महादेव! सात ज्योतिर्लिंग दर्शन यात्रा (WZBGI07) आहे. हे IRCTC चे ट्रेन टूर पॅकेज आहे.
हे टूर पॅकेज १३ ऑगस्ट रोजी राजकोट येथून सुरू होत आहे. तुम्ही तुमचे तिकीट स्लीपर, इकॉनॉमी, 3AC-Standard, 3AC-Comfort मध्ये तुमच्या सोयीनुसार बुक करू शकता. हे IRCTC टूर पॅकेज एकूण ९ रात्री आणि १० दिवसांसाठी आहे. या पॅकेज अंतर्गत प्रवास करताना तुम्हाला कशाचीही काळजी करण्याची गरज नाही.
IRCTC खाण्या-पिण्यापासून राहण्याची संपूर्ण व्यवस्था करेल. या टूर पॅकेजशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही https://www.irctctourism.com/pacakage_description?packageCode=WZBGI07 या लिंकला भेट देऊ शकता. किंवा https://www.irctctourism.com/ ला भेट द्यावी