मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या दिल्लीतील हत्या प्रकरणावरुन संपूर्ण देशभरात खळबळ उडलेली असताना रोज नव नवे खुलासे होत आहेत. त्यातच आता श्रद्धा वालकरची हत्या करुन मृतदेहाचे ३५ तुकडे करणाऱ्या आफताब पूनावालाने पोलिसांकडे आपल्याला गांजाचे व्यसन असल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे आफताबच्या या कबुलीमुळे आता या तपासाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. त्याचवेळी दुसरीकडे महाराष्ट्रात देखील असे प्रकार घडू नयेत म्हणून राज्य सरकार काळजी घेत आहे. आंतरधर्मीय विवाह केलेल्या महिला, मुलींचा सध्याची स्थिती काय? त्या सुखरूप आहेत का? याची माहिती घेण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्याची महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सूचना केली असून या प्रकारामुळे या पथकामुळे अशा गैरप्रकारांना आळा बसेल, असे म्हटले जाते.
श्रद्धा हत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता आफताब पुनावाल्याच्या क्रुरतेचा आणखी एक पुरावा समोर आला आहे. श्रद्धा आणि आफताबच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. त्यांच्यात काही ना काही कारणाने भांडणे होत होती. आफताब हा श्रद्धाला मारहाण करत होता, याचा पुरावा म्हणजे एका फोटोत तिच्या चेहऱ्यावर मारहाणीच्या जखमा दिसत आहेत. लिव्ह इन पार्टनरकडून झालेल्या श्रद्धा वालकर हिच्या क्रूर हत्येच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. आंतरधर्मीय विवाह केलेल्या महिला, मुलींचा सध्याची स्थिती काय आहे, तसेच त्या सुखरूप आहेत का याची माहिती घेण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्याची सूचना महिला आणि बालकल्याणमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राज्य महिला आयोगला दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले की, महिला आयोगाच्या एका कार्यक्रमामध्ये श्रद्धा वालकर प्रकरणाबाबत चर्चा झाली. श्रध्दा वालकरप्रमाणेच इतरही अनेक प्रकरणे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. ज्या मुलींचे आपल्या परिवारासोबत संबंध तुटत आहेत. त्यांच्यासाठी महिला आयोगाने पुढे येऊन अशा मुलींचा शोध घेतला पाहिजे. त्यांची काय स्थिती आहे त्याचा आढावा घेतला पाहिजे. तसेच या मुलींना माहिला आयोग काय मदत करु शकते, याकडे लक्ष दिले पाहिजे, असे आदेश मी दिले आहेत. आंतरधर्मीय विवाह झालेल्यांची सध्याची परिस्थिती काय आहे. संबंधित मुली व महिला सुखरूप आहेत ना याबद्दल माहिती घेण्यासाठी विशेष पथक स्थापण करावे, तसेच अशा प्रकारची अनेक प्रकरणे महाराष्ट्रात असू शकतात त्याचा शोध घ्यावा. संबंधित मुली किंवा महिला अडचणीत असतील तर त्यांना शक्य ती सर्व मदत करणार, असेही लोढा यांनी सांगितले.
एखादी सामाजिक समस्या निर्माण होते, तेव्हा शक्यतो कधी सरकार हस्तक्षेप करत नाही. परंतु एखादी समस्या गंभीर झाली तर त्याबाबत सरकारला निश्चितच विचार करावा लागतो. सध्या देखील आंतरधर्मीय विवाह मुळे अशा प्रकारच्या सामाजिक समस्या निर्माण होत असल्याने याबाबत राज्य सरकारला ठोस पावले उचलणे आवश्यक वाटते. त्यामुळे या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.
Shraddha Valkar Murder Maharashtra Government Decision