गुरूवार, सप्टेंबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

आफताबच्या पॉलीग्राफ चाचणीत काय झालं? पोलिसांना काही पुरावा मिळाला का?

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 28, 2022 | 3:45 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Shraddha Murder

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडाने देशाला हादरवले. या घटनेतील आरोपी आफताब पुनावाला याची पोलिस कसून चौकशी करत आहेत. याचाच एक भाग म्हणून आफताबची पॉलीग्राफ चाचणी करण्यात आली असून, त्यात त्याने पोलिसांना चकवा दिला आहे. आज, २८ नोव्हेंबरला त्याची पुन्हा पॉलीग्राफ चाचणी होणार आहे. ज्यात उर्वरित प्रश्न विचारले जातील. आतापर्यंत विचारण्यात आलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरं न देता त्यानं पोलिसांना गोंधळात टाकलं आहे. त्यामुळे आता याप्रकरणाचं गुढ उकलण्यासाठी नार्को चाचणीवरच पोलिसांची मदार असणार आहे.

खून करुन सहा महिने मोकाट फिरणारा आफताब आता तुरुंगात असून, त्याला दिल्लीच्या तिहार तुरुंगात ठेवण्यात आलं आहे. संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या या खून प्रकरणातील आरोपी आफताबची गेल्या तीन दिवसांपासून पॉलीग्राफ चाचणी घेतली जात आहे. मात्र तो पोलिसांना चकमा देत आहे. FSSLचे सहाय्यक निर्देशक आणि पीआरओ संजीव गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार आज फॉरेन्सिंक सायन्स लॅबमध्ये आफताबची पॉलीग्राफ चाचणी होणार आहे. पॉलीग्राफमध्ये अनेक सेशन असतात. यातील जे उर्वरित सेशन होते ते आज पूर्ण केले जाणार आहेत. याआधीचं सेशन जेव्हा केलं गेले तेव्हा आरोपीच्या आरोग्या संदर्भात काही अडचणी होत्या त्यामुळे काही गोष्टी बाकी राहिल्या आहेत. तसंच नार्को चाचणीसाठी आमची लॅब आणि आम्ही पूर्णपणे तयार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

आफताबला कोर्टासमोर दोषी ठरवण्यासाठी पोलिसांना महत्त्वाचे पुरावे हाती लागणं गरजेचं आहे. कारण पुराव्यांच्याच मदतीनं आफताबवरील आरोप सिद्ध होऊन त्याला कठोर शिक्षा होऊ शकते. यामुळेच पोलीस शक्य होईल तितक्या पद्धतीनं कसून याप्रकरणाची चौकशी करत आहेत. पण ज्या ठोस पुराव्यांमुळे आफताबला शिक्षा ठोठावण्यास मदत मिळू शकते असा एकही ठोस पुरावा पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलिस सध्या श्रद्धाचं शीर, शरीराचे सर्व तुकडे आणि डीएनए रिपोर्ट, हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेलं हत्यार, श्रद्धाचे कपडे जे तिची हत्या झाली त्यावेळी तिनं परिधान केले होते आणि तिचा मोबाइल या पाच पुराव्यांच्या शोधात आहे.

या पाच महत्त्वाच्या पुराव्यांपैकी सर्वात महत्वाचा पुरावा म्हणजे श्रद्धाचा मोबाइल आता पोलिसांच्या हाती लागणं जवळपास अशक्य झालं आहे. कारण मुंबईच्या ज्या भाईंदरच्या खाडीत श्रद्धाचा मोबाइल शोधण्याचं काम पोलीस करत होते ते काम आता थांबवण्यात आलं आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार श्रद्धाचा मोबाइल ज्या ठिकाणी फेकण्यात आला होता तो आता तिथं असणं निव्वळ अशक्य आहे. त्यामुळे पोलिसांनी तपास थांबवला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार ५ डिसेंबर रोजी आफताबची नार्को चाचणी करण्यात येणार आहे.

तसेच, श्रद्धाच्या हत्येनंतरही आफताब एका डेटिंग अॅपचा वापर करत होता. त्यामाध्यमातून त्याने अनेक मुलींशी मैत्री केली होती. याच माध्यमातून संपर्कात आलेल्या एका मुलीला त्याने आपल्या घरी बोलावलं होतं. पोलिसांनी याच मुलीचा शोध घेतला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही मुलगी व्यवसायानं मानसोपचारतज्त्र आहे. पोलिसांनी तिची चौकशी केली आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार तिच्याकडून आफताबबाबत काही महत्वाचे धागेदोरेही पोलिसांच्या हाती लागले आहेत.

सुरक्षेची घेतली जात आहे काळजी
आफताबची सुरक्षा अतिशय महत्वाची असून तिहारमध्ये त्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे तुरुंग प्रशासनानं आवश्यक सर्व व्यवस्था केली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आफताबला वेगळ्या सेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्याच्या सेलमध्ये आफताबसोबत इतर कोणताही कैदी नाही. तसंच सेलच्या बाहेर २४ तास एक पोलीस हवालदार तैनात असतो. जो त्याच्यावर नजर ठेवून आहे. आफताबला ठेवण्यात आलेला सेल असा आहे की ज्यातून कैद्याला लवकर बाहेर काढता येत नाही. सीसीटीव्ही कॅमेराची देखील आफताबवर नजर आहे. आफताबला जेवण देण्याआधी जेवणाचीही तपासणी केली जाते.

नुकसानकारक गोष्टींपासून ठेवा दूर..
आफताब स्वत:ला नुकसान पोहोचवेल अशा कोणत्याही गोष्टी त्याच्याजवळ ठेवू नका अशा सूचना जेलमधील कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. आफताब जेल क्रमांक ४ मध्ये बंदिस्त आहे. त्याचा विक्षिप्त स्वभाव लक्षात जेल प्रशासनाने हे पाऊल उचललं आहे. पोलीस कोठडीत आफताब अत्यंत शांत असल्याने पोलिसांना आश्चर्यही वाटत आहे. आफताबच्या कोठडीत दोन कैद्यांना ठेवण्यात आलं असून, त्यांनाही त्याच्यावर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आलं आहे.

Shraddha Murder Case Polygraph Test Police Evidence
Crime Delhii

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

न्यूझीलंड दौऱ्यानंतर भारतीय संघात होणार हे मोठे बदल; या खेळाडूंना मिळणार सक्तीची विश्रांती

Next Post

आमदार नितीन पवार यांच्या मुलाचा आज शाही विवाह सोहळा; ही आहे त्यांची सून

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

ladki bahin yojana e1722514675247 750x375 1
संमिश्र वार्ता

लाडकी बहिण योजनेतील ऑगस्टचा सन्मान निधी तुमच्या खात्यात जमा झाला का? चेक करा बँक खाते

सप्टेंबर 11, 2025
crime1
क्राईम डायरी

नाशिकच्या महिलेसह तिघांना सव्वा कोटीला गंडा….अशी केली फसवणूक

सप्टेंबर 11, 2025
Untitled 10
संमिश्र वार्ता

यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड…१२ ठिकाणी छापे, ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त

सप्टेंबर 11, 2025
SUPRIME COURT 1
संमिश्र वार्ता

भारत – पाकिस्तान सामना रद्द करण्यासाठी याचिका…सर्वोच्च न्यायालयाने दिला हा निर्णय

सप्टेंबर 11, 2025
01 Sanay Raut Saheb New scaled e1659327045274
महत्त्वाच्या बातम्या

सिंदूर के सन्मान मै, शिवसेना मैदान मै…भारत – पाकिस्तान सामन्याच्या दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन

सप्टेंबर 11, 2025
reliance retail
संमिश्र वार्ता

पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी रिलायन्स फाउंडेशन, वनतारा, रिलायन्स रिटेल आणि जिओकडून मदतीचा हात

सप्टेंबर 11, 2025
VIRENDRA DHURI
संमिश्र वार्ता

‘ओबीसी’ महामंडळांना निधी वाटपात भेदभाव होणार नाही – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे 

सप्टेंबर 11, 2025
sushila kargi
महत्त्वाच्या बातम्या

नेपाळच्या पंतप्रधानपदी पहिल्या मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की? अंतरिम सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरु

सप्टेंबर 11, 2025
Next Post
IMG 20221128 WA0014

आमदार नितीन पवार यांच्या मुलाचा आज शाही विवाह सोहळा; ही आहे त्यांची सून

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011