नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – श्रद्धा हत्याकांडात एक हृदयद्रावक खुलासा समोर आला आहे. आरोपी आफताब पूनावाला याने पुन्हा त्याचा जबाब बदलला आहे. त्याने पोलिसांना सांगितले की, त्याने तब्बल पाच महिन्यांहून अधिक काळ श्रद्धाच्या डोक्यासह शरीराचे अवयव रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले होते. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजवरूनही याची पुष्टी झाली आहे. तिची हत्या करूनच मृतदेहाचे काही तुकडे फेकून दिले. तर श्रद्धाचा मृतदेह दोन दिवस घरात ठेवण्यात आला होता. पूर्ण एक दिवस श्रद्धाचा मृतदेह खोलीत पडून होता. त्याने मृतदेहाजवळ बसूनच जेवण केले होते. त्याने श्रद्धाच्या शरीराचे फक्त १६ तुकडे केले होते. यादरम्यान तो पूर्वीप्रमाणेच हसत राहिला.
हत्येनंतर जेवण केले, चित्रपट पाहिले
दक्षिण जिल्ह्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी आफताब म्हणाला की, रात्री आठ वाजता श्रद्धाची हत्या केली. श्रद्धाचा मृतदेह दिवसभर खोलीत पडून होता. श्रद्धाला मारल्यानंतर बिअर आणली आणि जेवणाची ऑर्डर दिली. त्यानंतर जेवण केले. त्यानंतर रात्रभर नेटफ्लिक्सवर चित्रपट पाहिले. दुसऱ्या दिवशी त्याने श्रद्धाचा मृतदेह बाथरूममध्ये ठेवला होता. दिवसभर मृतदेह बाथरूममध्ये पडून होता. यानंतर त्याने श्रद्धाच्या मृतदेहाचे काही तुकडे पॉलिथिनमध्ये बांधून जंगलात फेकून दिल्याचे आरोपीने चौकशीत सांगितले आहे. श्रद्धाचे डोके, धड, पायाची बोटे फ्रीजमध्ये पॉलिथिनमध्ये पॅक करून ठेवली होती. मृतदेहाचे हे तुकडे फेकण्याची संधी मिळाली नाही, असे आरोपीचे म्हणणे आहे.
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धाची हत्या केल्यानंतर त्याला गुरुग्राममधील कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली. तो रात्री कॉल सेंटरमध्ये काम करायचा. दिवसा त्याची दिल्लीहून महिला मैत्रिण यायची. यामुळे तो मृतदेहाचे तुकडे फेकून देऊ शकला नाही. आरोपींनी ऑक्टोबरच्या सुरुवातीला मृतदेहाचे हे तुकडे जंगलात फेकून दिले होते. ऑक्टोबर महिन्यात आरोपी जंगलात गेल्याचे सीसीटीव्ही फुटेज आढळून आल्याचे विश्वसनीय पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.
आरोपीने चौकशीदरम्यान आधी सांगितले होते की श्रद्धाच्या शरीराचे ३५ तुकडे केले होते. आता तो म्हणतो की, केवळ १६ तुकडे केले.
त्याने प्रत्येक पायाचे तीन तुकडे केले. तसेच दोन्ही हातांचेही प्रत्येकी तीन तुकडे केले. त्यानुसार हात आणि पायांचे एकूण १२ तुकडे झाले. डोक्याचा तुकडा केला. धड वेगळे कापले. तसेच दोन्ही नितंबांचे दोन भाग केले. अशा प्रकारे दोन तुकडे केले, असे त्याने पोलिसांना सांगितले आहे.
दक्षिण जिल्हा पोलिसांनी आरोपीला छतरपूरच्या जंगलात नेले. सुमारे चार तास जंगलात शोध मोहीम राबवण्यात आली. पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, पोलिस जेव्हा जेव्हा आरोपीला जंगलात घेऊन जातात तेव्हा तो त्यांना जंगलातील त्याच ठिकाणी घेऊन जातो. पोलिसांनी आरोपींना आठ ते दहा वेळा जंगलात नेले आहे. त्यानंतरही पोलिसांना फारसे यश मिळालेले नाही. तो जाणीवपूर्वक पोलिसांची दिशाभूल करत आहे.
दक्षिण जिल्हा पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धा खून प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे. प्रत्येक कामासाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकाकडे तपासासाठी वेगवेगळे काम देण्यात आले आहे. दक्षिण जिल्हा डीसीपी चंदन चौधरी आणि अतिरिक्त डीसीपी अंकित चौहान लक्ष ठेवून आहेत.
Shraddha Murder Case Investigation Accused Aftab New Statement
Crime South Delhi