मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वसईतील लिव्ह इन पार्टनर श्रद्धा वालकरची करून तिच्या शरीराचे ३५ तुकडे केल्याप्रकरणी आरोपी आफताब पूनावाला दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहे. दिल्ली कोर्टाने मंगळवारी त्याच्या कोठडीत चार दिवसांची वाढ केली. या दरम्यान आफताबत त्याने अनके नवे खुलासे केले आहेत. त्याने हा गुन्हा रागाच्या भरात केल्याचे कोर्टात कबूल केले. मात्र, श्रद्धाने दोन वर्षांपूर्वीच वसई पोलिसांना एक पत्र लिहिल्याची बाब समोर आली आहे. त्यात तिने स्पष्ट केले होते की, आफताब तिच्या शरीराचे तुकडे करु शकतो. आता या प्रकरणाची गंभीर दखल उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. श्रद्धाने लिहिले पत्र मी वाचले असून ते पत्र अतिशय गंभीर असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
फडणवीस म्हणाले की, मी कोणावरही आरोप करत नाही, मात्र वेळीच कारवाई झाली असती तर तिचा जीव वाचला असता, पत्र लिहूनही पोलिसांनी का कारवाई का केली नाही, याची चौकशी करणार आहे. मात्र त्यावेळी पोलिसांनी तात्काळ कारवाई केली असती तर श्रद्धा वाचली असती, अशाप्रकारच्या चर्चा सुरु आहेत. तसेच हा आरोप अप्रत्यक्षरित्या महाविकास आघाडी सरकारमधील गृहखाते तथा पोलीस विभागावर करण्यात आला आहे. कारण तेव्हा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते.
श्रद्धा वालकर आणि आफताब पुनावाला प्रकरणात अत्यंत धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. सन २०१९ मध्ये मुंबईच्या एका कॉल सेंटरमध्ये श्रद्धा आणि आफताबची भेट झाली होती. त्यानंतर त्यांचे एकमेकांवर प्रेम जडले. दोघांनीही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. श्रद्धाच्या घरच्यांनी विरोध करूनही तिने आफताबसोबत राहण्याचा निर्णय घेतला. श्रद्धा आणि आफताब यांचे अनेक विषयांवरून सतत खटके उडायचे. दि. २३ नोव्हेंबर २०२० रोजी श्रद्धाने आफताबच्या त्रासाला कंटाळून पोलिसांत तक्रार दाखल केली होती. आफताब गळा दाबून मारहाण करत असल्याची तक्रार श्रद्धाने नालासोपारा पूर्वेकडील तुळींज पोलीस ठाण्यात दाखल केली होती. मात्र ही तक्रार दि. १९ डिसेंबर २०२० रोजी श्रद्धाने मागे घेतली. तसेच आफताबच्या त्रासाबाबत श्रद्धाने एक पत्रही लिहिले होते. जे पत्र आता समोर येत आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धाने लिहिले पत्र वाचले असून ते पत्र अतिशय गंभीर असल्याचे म्हटले आहे. आफताब श्रद्धाला त्रास देत असल्याचे त्याच्या कुटुंबियांनी ठाऊक होते, असंही श्रद्धाने तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीनही पोलिसांनी कारवाई का नाही केली? असा सवाल आता उपस्थित होत आहे. दरम्यान, काही काळानंतर ते मुंबईतून दिल्लीत गेले. मात्र दोघांमध्ये वाद झाल्यानंतर आफताबने १८ मे २०२२ रोजी श्रद्धाची हत्या केली. हत्येनंतर तिच्या शरीराचे ३५ तुकडे करून ते फ्रीजमध्ये ठेवले.
त्यानंतर श्रद्धाच्या प्रेताचे एक एक तुकडे आफताब जंगलात फेकत होता. श्रद्धाचा खून केल्याची घटना उघडकीस येऊ नये म्हणून आफताबने अत्यंत थंड डोक्याने योजना आखली. तिचे सोशल मीडिया अकाउंटदेखील काही दिवस सुरु ठेवले. मात्र श्रद्धाच्या मित्राला संशय आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.आता आफताब पुनावालाने या घटनेची कबूली दिली असली तरीही ही घटना पुराव्यानिशी सिद्ध करण्यासाठी पोलीसांचा कसून तपास सुरू आहे.
Shraddha Murder Case DYCM Fadanvis Enquiry Order