नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – श्रद्धा वालकर खून प्रकरणातील मुख्य आरोपी आफताब पूनावाला याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. याच चौकशीचा भाग म्हणून अलीकडेच नार्को आणि ‘पॉलीग्राफ लाय डिटेक्टर’ चाचणी करण्यात आली. या चाचणीनंतर आफताबला तिहार कारागृहात ठेवण्यात आलं आहे. दरम्यान, आफताब दररोज नवनवीन खुलासे करत आहे. श्रद्धाचा खून आपण रागाच्या भरात केल्याची कबुली आफताबने दिली आहे.
मृत श्रद्धा अन्य एका तरुणासोबत ‘डेटवर’ गेली होती. त्यामुळे आफताब श्रद्धावर संतापला. तसेच तिने त्याला सोडून देण्याची धमकी दिली होती. त्यानंतर हा वाद वाढत गेल्यानंतर आफताबने श्रद्धाचा खून केला. याबाबत ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, आफताब पोलिसांना सांगितलं आहे की, श्रद्धा वालकर डेटिंग अॅप ‘बंबल’वर भेटलेल्या एका तरुणासोबत डेटवर गेली होती. १७ मे रोजी संध्याकाळी श्रद्धा डेटवर गेली होती. ती १८ मे रोजी दुपारी मेहरोली येथील फ्लॅटवर परतली. श्रद्धा घरी परत आल्यानंतर दोघांचं कडाक्याचं भांडण झालं. या वादानंतर आफताबने श्रद्धाचा गळा दाबून खून केला. यानंतर त्याने तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले.
तसेच ‘अमर उजाला’नेही याबाबत वृत्त दिले आहे. त्या वृत्तानुसार, आफताबने दिल्ली पोलीस आणि तपास यंत्रणांना हत्येसाठी वापरण्यात आलेलं हत्यार आणि श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे शोधण्याचे आव्हान दिले आहे. त्याने श्रद्धाच्या मृतदेहाच्या तुकड्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावल्याबाबत विश्वास व्यक्त केला आहे. खुनाची कबुली देताना आफताब पुढे म्हणाला की, “होय, मी श्रद्धा वालकरचा खून केला आहे. तिच्या मृतदेहाचे तुकडे आणि खून करण्यासाठी वापरलेलं हत्यार शोधून दाखवा, असं आव्हान तुम्हाला देतो.” यापूर्वी आफताबने त्याच्या गुरुग्राम कार्यालयाजवळील झाडीत खुनासाठी वापरलेलं हत्यार फेकल्याचे सांगितलं होतं.
Shraddha Murder Case Accused Aftab Challenge to Police
Crime Delhi Rape