मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले. गोरेगाव येथील नेस्लो संकुलामध्ये आज उद्धव यांनी मुंबईतील गटप्रमुखांच्या मेळाव्यात मार्गदर्शन केले. दसरा मेळाव्यापूर्वी झालेल्या या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून होते. यावेळी उद्धव यांनी अतिशय आक्रमकपणे भाषण केले.
उद्धव म्हणाले की, गद्दारांबरोबरच भाजप हे शिवसेनेला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांचे प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत. पहिल्यांदाच मुंबई मनपा निवडणुकीत थेट पंतप्रधान सहभागी होणार आहेत. मात्र, सामान्य शिवसैनिक आता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. शिवसेना काही पहिल्यांदाच फुटलेली नाही. जे मोठे झाले ते गेले पण ज्यांनी मोठे केले ते माझ्यासोबत आहेत, असे ते म्हणाले. तसेच, आगामी मुंबई मनपा निवडणुकीसाठी उद्धव यांनी गद्दारांसह भाजपला खुले आव्हान दिले. मुंबईवर गिधाडे घिरट्या घालत आहेत. त्यांना आस्मान दाखविल्याशिवाय यंदा थांबायचे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे यांचे संपूर्ण भाषण बघण्यासाठी खालील व्हिडिओवर क्लिक करा
मुंबईतील गटप्रमुखांचा मेळावा । शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांचे मार्गदर्शन । नेस्को संकुल, गोरेगाव – LIVE#Shivsena https://t.co/rlFrJ15hfJ
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) September 21, 2022
Shivsena Chief Uddhav Thackeray Open Challenge Politics
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/DdXKnEHFlqkD5F8S6etEPD