मुंबई – घाऊक आणि किरकोळ व्यापाऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. कर्जासाठी बँकेच्या चकरा मारण्याची वेळ आता संपली आहे. केंद्र सरकारने या व्यापाऱ्यांला सूक्ष्म आणि लघु उद्योगांच्या कक्षेत आणल्यामुळे
घाऊक आणि किरकोळ व्यापाऱ्यांना आता प्राधान्य क्षेत्रातील कर्ज सहज सहज उपलब्ध होणार आहे. केंद्र सरकारने यापूर्वीच तशी घोषणा केली होती. हा लाभ घेण्यासाठी व्यापाऱ्यांना एंटरप्राइझ पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. त्यासाठी msme.gov.in या वेबसाईटवर जावे लागेल. यानंतर, ऑनलाइन सेवा अंतर्गत एंटरप्राइझ नोंदणी निवडावी लागेल. त्यानंतर नोंदणीची प्रक्रिया सुरू होईल.
ही कागदपत्रे हवीत
संस्थेचा पॅन आणि त्यास अधिकृत स्वाक्षरीकर्ता, जीएसटी क्रमांक, आधार क्रमांक, प्रोप्राईटरशिप फर्म, पार्टनरशिप , सोसायटी, ट्रस्ट आणि त्यांचे अधिकृत स्वाक्षरीकर्ता यांचे तपशील, व्यवसाय पत्ता पुरावा, उद्योजकता आणि ई-मेल पत्ते, वर नमूद केलेल्या लोकांचे मोबाइल नंबर, नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता, बँक तपशील तसेच अन्य माहिती जसे की, व्यवसाय कोड, कर्मचार्यांची संख्या. या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल
हे लक्षात ठेवा
सदर पोर्टलवर नोंदणीसाठी अर्ज करतांना एनआयसी कोड सादर करावा लागेल. घाऊक आणि किरकोळ विक्रीसाठी ४५, ४६ आणि ४७ श्रेणी आहेत. एमएसएमई फॉर्म जमा झाल्यापासून १ ते २ दिवसात देण्यात येईल. एमएसएमई नोंदणी व एमएसएमई प्रमाणपत्र विनामूल्य दिले जाईल.
व्याख्या बदलली
स्वावलंबी भारत अभियानांतर्गत सरकारने एमएसएमईची व्याख्या बदलली आहे. यामध्ये गुंतवणूक आणि उलाढाल दोन्ही तत्त्वावर केली गेली आहे, तर आधी फक्त भांडवली गुंतवणुकीच्या आधारे होते. एमएसएमई झाल्याने व्यापाऱ्यांना बरेच फायदे मिळतील. ते आता प्राधान्य क्षेत्रातील कर्जासाठी पात्र आहेत. या प्रकारामध्ये नियमित कर्जापेक्षा दीड टक्के कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध असते.