नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोरोनामुळे अनेक उद्योग क्षेत्रातील व्यवसायांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. पहिल्या लाटेतून कसेबसे सावरल्यानंतर दुसऱ्या लाटेने देशातील व्यवसायिक क्षेत्राला आणखी तोट्याच्या गर्देत ढकलले.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेक लहान व्यवसायांना व्यवसाय बंद करण्याच्या उंबरठ्यावर आणले होते. विशेषत: कमी-उत्पन्न गटाच्या वर्गाच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली होती. या स्थितीचा नाशिक येथील आशा मच्छिंद्र लक्ष्मण चव्हाण यांना देखील फटका बसला. कोरोनापुर्वी त्या एका जनरल स्टोरच्या मालकीण होत्या.
मात्र कोरोनाने त्यांचा व्यवसाय उध्वस्त केल्यामुळे उत्पन्नावर मोठा परिणाम झाला. व्यवसायास अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने अनेकांना त्यांचे जनरल स्टोअर या काळात बंद कारावे लागले. त्यांना जनरल स्टोअर बंद करणे भाग पडले.व्यवसाय बंद झाल्याने चव्हाण यांच्याकडे असलेल्या अल्प बचतीतून त्यांना दैनंदिन खर्चाचे, मुलांच्या शिकवणी फी भरण्याचे व्यवस्थापन करावे लागले. मात्र त्यातून येणारे पैसे कमी असल्याने पैशांची जुळाजुळव करण्यासाठी त्यांना धडपड करावी लागत होती. जेव्हा कोरोनाची परिस्थिती सामान्य झाली तेव्हा चव्हाण यांना कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी व्यवसाय पुन्हा सुरू करायचा होता. पुन्हा व्यवसाय उभारण्यासाठी त्या आर्थिक मदत शोधत होत्या.
व्यवसायाच्या माध्यमातून चव्हाण यांनी आर्थिक स्थिती सुधारण्याचा आणि स्थिर जीवन जगण्याचा निर्धार केला. व्यवसायासाठी भांडवल शोधत असताना त्यांची ओळख त्यांच्या एका मैत्रिणीने मुथूट मायक्रोफिनशी करून दिली. मुथूट मायक्रोफिनचे उद्दिष्ट सेवा नसलेल्या महिलांना पाररर्शक व मुक्त कर्ज देऊन त्यांना आर्थिक संधी उपलब्ध करून देणे हा आहे. चव्हाण यांनी कर्ज अधिकाऱ्याकडून आवश्यक माहिती गोळा केली. त्यानुसार त्या २० हजार रुपयांचे पहिल्या टप्प्यातील कर्ज मिळण्यास पात्र झाल्या. या सर्व रकमेचा वापर त्यांनी त्यांचे ग्राहक पुन्हा जोडले जावेत इतर प्राथमिक बाबींसाठी केला. एका आठवड्यात त्यांनी गमावलेला व्यवसाय परत मिळवला आणि दहा दिवसांनंतर त्यांच्या दैनंदिन नफा ५०० रुपयांवर पोहोचला. चव्हाण यांच्या धैर्याने आणि आव्हानात्मक काळात टिकून राहण्याचा दृढनिश्चयाने त्यांना सुधारित राहणीमानासह गमावलेला व्यवसाय टिकवून ठेवण्यास प्रवृत्त केले. त्यांच्या या यशाचे श्रेय त्यांनी अडचणीच्या काळात कर्ज रुपाने मदत करणाऱ्या मुथूट मायक्रोफिनला दिले.
कृतज्ञता व्यक्त करताना आशा चव्हाण म्हणाल्या की, मी मुथूट मायक्रोफिनची आभारी आहे. त्यांनी माझ्या व्यवसायाच्या पुनर्बांधणीसाठी आवश्यक असलेले काँलेट्रोल मुक्त कर्ज देऊन माझ्या आयुष्याचा संपूर्ण मार्ग बदलला. कोविड-१९ च्या आव्हानात्मक काळात ही संस्था माझ्या पाठीशी उभी राहिली. मुथूट मायक्रोफिनने दिलेल्या आर्थिक साक्षरतेच्या प्रशिक्षणातून मला प्रचंड पाठिंबा मिळाला. बजेट तयार करणे आणि नफा मोजणे यासारख्या अनेक व्यावसायिक बाबी मी त्यांच्याकडून शिकले. मुथूट मायक्रोफिनचा हा पाठिंबा मी माझ्या आयुष्यात कधीही विसरणार नाही.