इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – करोनारुपी राक्षसाने अनेकांचे संसार उद्ध्वस्त केलेत. मोठ्या प्रमाणात जीवहानी झाली. सर्वत्र या विषाणूची अक्षरश: दहशत होती. मात्र, करोनाच्या भीतीने गुरग्राममधील एका महिलेने मुलासह स्वत:ला तीन वर्षे घरात कोंडून घेत नवऱ्याला घराबाहेर ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
मुनमुन मांझी असे या महिलेचे नाव असून तिच्या दहा वर्षीय मुलाला पोलिसांनी आरोग्य व बाल कल्याण विकास अधिकाऱ्यांच्या एक पथकाने सोडवले होते. आई व मुलाला गुरुग्राम येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती समोर आली आहे की, ही महिला करोनामुळे खूपच घाबरली होती आणि जेव्हा २०२० मध्ये पहिल्यांदा लॉकडाउननंतर निर्बंध शिथिल करण्यात आले, तेव्हा या महिलेचा पती सुजान मांझी कामासाठी घराबाहेर पडला होता. मात्र, तेव्हापासून या महिलेने आपल्या पतीलाही घरात प्रवेश दिला नव्हता. त्यामुळे या महिलेच्या पतीने काही काळ आफल्या नातेवाईक, मित्रांकडे राहून काढला. मात्र, आपल्या कुटुंबाच्या संपर्कात राहण्याचे सुजान मांझी यांनी त्याच भागात आणखी घर भाडेतत्त्वार घेतले होते.
व्हिडीओ कॉलद्वारे ते आपल्या पत्नी आणि मुलाच्या संपर्कात राहत होते आणि त्या दोघांच्या सर्व गरजा भागवत होते. या काळात सुजान मांझी यांनी घर भाडे, मुलाच्या शाळेचे शुल्कही नियमित भरले. पत्नी व मुलासाठी किराणा सामान, भाजी इत्यादी वस्तू दरवाज्या बाहेर ठेवून जात असे. एवढच काय तर गॅस सिलिंडर संपल्यानंतर त्या महिलेने गॅस शेगडी वापरणेही बंद केले होते. इंडक्शनचा वापर करून ती महिला जेवण बनवत होती. तर तिचा मुलगा ऑनलाइन शिक्षण घेत होता.
लस नसल्याने ठेवले जवळ
मुनमुन-सुजान यांचा मुलगा दहा वर्षांचा आहे. बारा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी करोना लस उपलब्ध नव्हती. त्या भीतीमुळे त्यांनी मुलाला मोकळे न सोडता स्वत:जवळ ठेवले होते.
Shocking Women locked herself with son for 3 years
Covid Corona Fear