सूरत (गुजरात) – दिवाळीपूर्वीच फटाके फोडणाऱ्या लहान मुलांवर काय परिस्थितीला तोंड द्यावे लागले याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. येथील एका सोसायटीतील लहान मुले फटाके फोडण्यासाठी एकत्र जमले. भुयारी गटारीच्या ढाप्यावर त्यांनी फटाका पेटविण्यासाठी त्यांनी तयारी केली. त्यांनी फटाक्याला आग लावली आणि तोच आगीचा मोठा भडका उडाल्याचे पहायला मिळाले. भूयारी गटारीतून येत असलेल्या गॅसमुळे आगीने पेट घेतला. या दुर्घटनेत पाचही मुले जखमी झाली आहेत. हा व्हिडिओ खुपच व्हायरल झाला आहे. बघा नेमके काय झाले
https://twitter.com/Shayarcasm/status/1453697729104732206