इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ह्रदयविकाराचा झटका कुठेही, कधीही येऊ शकतो. हा मृत्यू कधीही सांगून येत नाही. पण कधी कधी तो अश्या विचित्र प्रसंगांना येतो की त्याची हळहळ मोठ्या प्रमाणात व्यक्त होत असते. अलीकडेच एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यामध्ये अशाचप्रकारे एकाचा मृत्यू होताना दिसत आहे.
लग्नाच्या मांडवात नवरदेवाला हळद लावली जात आहे. मांडवात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. पण नवरदेवाला हळद लावण्यासाठी खाली बसलेली एक व्यक्ती काही क्षणात खाली कोसळले आणि मृत्यूमुखी पडते. या व्यक्तीने हळद लावताच तो अटॅक येऊन खाली पडला. तो कोसळताच सारे लोक धावतात, पण जागीच मृत्यू झाल्यामुळे महिलांचे व मुलांचे रडण्याचे आवाज येऊ लागतात. खरंतर हा व्हिडियो कुणी का शूट केला असेल, असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात आहे. ज्याने हे शुटींग केले आहे त्याने नेमका हाच प्रसंग टिपल्यामुळेही आश्चर्य व्यक्त होत आहे. व्हिडियो व्हायरल झाल्यानंतर त्याला लाखोंमध्ये व्ह्यूज आणि कमेंट्स मिळत आहेत. आणि त्याचवेळी चिंताही व्यक्त होत आहे.
नेत्याचे ट्वीट
समाजवादी पक्षाचे प्रवक्ते मनोज सिंह यांनी हा व्हिडिओ ट्वीट करून चिंता व्यक्त केली आहे. असा अचानक मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. पुजा करताना मृत्यू होणे, नाचताना मृत्यू होणे, जीममध्ये वर्कआऊट करताना मृत्यू होणे, योगा किंवा मॉर्निंग वॉक करताना मृत्यू होणे अत्यंत चिंताजनक आहे. सरकारनेही याची दखल घेऊन उपाययोजना करायला हव्या, असे मनोज सिंह यांनी म्हटले आहे.
https://twitter.com/ManojSinghKAKA/status/1628660963204538368?s=20
बदलती जीवनशैली कारणीभूत
अशाप्रकारे अचानक मृत्यू होण्याला बदलती जीवनशैली कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. दैनंदिन धावपळ, त्यात खाण्या-पिण्याच्या बदलत्या सवयी, खाद्यपदार्थांची निवड या साऱ्या गोष्टींमुळे चालता बोलता मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे, असे मनोज सिंह यांनीही म्हटले आहे.
Shocking Video Viral Haladi Ceremony Person Death