नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या केरला स्टोरी चित्रपट चांगलाच गाजत असून या केरला स्टोरीमध्ये हिंदू मुलींना टार्गेट करुन त्यांचे धर्मांतर कसे केले जाते हे दाखवण्यात आले आहे, पण धर्मांतराच्या याच पॅटर्नमध्ये बदल करुन मोबाईल गेम खेळणाऱ्यांना आता टार्गेट केले जात असल्याचे धक्कादारक प्रकरण समोर आले आहे. त्यात उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये तसेच मुंबई, ठाणे नजिकच्या मुंब्र्यातून चक्क ४०० जणांचे धर्मांतर झाले असेल तर ही नक्कीच मोठी चिंतेची बाब आहे.
मुख्य आरोपीचा गौप्यस्फोट
उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये मोबाईलमधील ऑनलाईन गेमिंगद्वारे धर्मातर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून महत्त्वाचे म्हणजे ऑनलाईन गेमच्या सहाय्याने महाराष्ट्रात अनेकांचे धर्मांतर केल्याचा गौप्यस्फोट गाझियाबाद सहाय्यक पोलिस आयुक्तांनी केला आहे. विशेष म्हणजे मुंब्र्यात ४०० जणांचे धर्मांतर करण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ऑनलाईन धर्मांतर करणाऱ्या मुख्य आरोपीनं हा गौप्यस्फोट केल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी दुसरा आरोपी शाहनवाज फरार आहे. गाझियाबाद पोलीस शाहनवाजची आई मुमताजचा जबाब मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्याची शक्यता आहे.
ब्रेन वॉश करुन धर्मांतर
मोबाईल गेमच्या नावाखील धर्मांतर करण्याचे प्रकरण उत्तर प्रदेश पोलिसांनी उघड केली असून यात एक मोठी टोळी ही ऑनलाईन गेम खेळणाऱ्या मुलांना हेरते. सुरुवातीला या खेळात या मुलांना हरवले जातं, मग त्यात फसवले जाते आणि पुढे त्यांचा धर्मांतराच्या उद्देशाने ब्रेन वॉश केला जातो. त्यामुळे ही मुले ऑनलाईन गेमच्या माध्यमातून अशा प्रकारे धर्मांतराचे शिकार होतात. इतकेच नव्हे तर गाझियाबादमध्ये देखील असेच घडले आहे.
ऑनलाईन गेमच्या सहाय्याने चक्क दोन अल्पवयीन मुलांचे धर्मांतर केले गेले आहे. काही मुस्लिम मुलं गैर-मुस्लिम नावाने प्रोफाईल बनवून गेम खेळायची. ही टोळी गेम खेळणाऱ्यांना हरवून त्यांना कुराण पठण करायला लावायची आणि जाणूनबूजून जिंकवायची. म्हणजे काही मुले कुराण वाचायची त्यांना धर्मांतर करणाऱ्या टोळीतील सदस्य प्रोत्साहन देण्यासाठी स्वतः खेळात हरायचे. तसेच इस्लामकडे कल दाखवणाऱ्या मुलांना झाकीर नाईकचे विषारी व्हिडिओ दाखवायचे व इस्लामिक साहित्य पुरवायचे. मोबाईल गेमच्या आडून ब्रेन वॉश करत धर्मांतर करण्यात आल्याची अशीही घटना समोर आली आहे.
Shocking Mobile Game Religious Transformation