नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान कार्यालयातील (पीएमओ) अधिकारी असल्याचे सांगणाऱ्या तोतयाला अटक करण्यात आली आहे. किरण पटेल असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
गुजरातमधील रहिवाशी असलेल्या किरण पटेल याने पंतप्रधान कार्यालयात अतिरिक्त संचालक असल्याची खोटी माहिती देत मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये काश्मीर खोऱ्याला भेट दिली. तेव्हापासून तो काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी फिरला. अगदी नियंत्रण रेषेच्या (एलओसी) जवळ असलेल्या उरीमधील कमान पोस्ट ते श्रीनगरच्या लाल चौकापर्यंत झेड प्लस सुरक्षा व्यवस्थेसह फिरल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकाराने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
https://twitter.com/AdityaRajKaul/status/1636428234123538432?s=20
श्रीनगरमधील निशात पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, किरण पटेल हा निशात पोलिस ठाण्याच्या हद्दीत आणि काश्मीर खोऱ्यातील इतर काही भागांमध्ये फिरत होता. तो सरकारी पाहुणा म्हणून पंचतारांकित आलिशान हॉटेलमध्ये राहिला. त्याला वैयक्तिक सुरक्षा व्यवस्था देण्यात आली होती. त्यानंतर किरण पटेल यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.
काश्मीर पोलिसांचे मौन!
आरोपी किरण पटेल याला पोलिसांनी अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. गुजरात पोलिसांचे एक पथकही तपासात सामील झाले आहे. या संपूर्ण घटनेबाबत जम्मू-काश्मीर पोलिसांनी आतापर्यंत मौन बाळगले आहे. पण, केंद्रीय तपास यंत्रणांना सुगावा लागण्यापूर्वी सीआयडीने आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
https://twitter.com/AdityaRajKaul/status/1636417375821262848?s=20
Shocking Man Arrested Visit Kashmir Valley Sensitive Places