इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – प्रेमात सगळे काही माफ असते असे म्हणतात, इतकेच नव्हे तर प्रेम आंधळे असते, असं म्हणतात. परंतु प्रेमामध्ये काही वेळा अगदी मूर्खपणा देखील घडतो असे म्हटले जाते याचा प्रत्यय यावा अशी घटना आसाम मध्ये घडली, अर्थात असे अनेक प्रकार आपण हल्ली सोशल मीडियावर पाहतो. या मंडळींसाठी नेटकऱ्यांनी तर खास निब्बा – निब्बी संघटना म्हणून पेज सुद्धा सुरु केले आहेत. यांचे रील्स बघण्यापर्यंत तर ठीक होते, पण आता आसाम मधून एक असा धक्कादायक प्रकार समोर येत आहे ज्यावर विश्वास बसणंच कठीण आहे.
आसाम मधील एका मुलीने आपल्या प्रेमाची साक्ष पटवून देण्यासाठी आपल्या एचआयव्ही पॉझिटिव्ह बॉयफ्रेंडचे रक्त स्वतःच्या शरीरात चढवून घेतल्याचे समजत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ही मुलगी अवघ्या १५ वर्षाची आहे. आसाम मधील सुआलकुची जिल्ह्यातील ही घटना सध्या अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. या मुलीची फेसबुक द्वारे हाजो येथील सातडोला येथे राहणाऱ्या एका मुलाशी ओळख झाली होती. तीन वर्षांपासून त्यांचे रिलेशन सुरु होते.
दरम्यान, पोलिसांनी या एचआयव्ही ग्रस्त तरुणाला अटक केली आहे तर मुलीला रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. तरुणाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, हा प्रसंग घडत असताना त्याने अनेकदा या मुलीला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र मला माझ्या जीवाची पर्वा नाही असे म्हणत तिने इंजेक्शन टोचून घेतले. सदर प्रकरणानंतर या मुलीने दोन वेळा एचआयव्ही चाचणी करून घेतली मात्र पहिल्यावेळी ती रिपोर्ट आणण्यासाठी गेलीच नाही आणि दुसऱ्या वेळी तिचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे समजत आहे.
Shocking Love Girl Friend HIV Positive Blood Injection
Assam Boy Friend