इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – फिरकीचा जादूगार अशी ओळख असलेला ऑस्ट्रेलियाचा प्रख्यात फिरकीपटू शेन वॉर्न यांचे आज हृदयविकाराने निधन झाले. वयाच्या ५२ व्या वर्षी त्यांनी थायलंड येथे अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू रॉड मार्श याचे निधन झाल्यानंतर आता शेन वॉर्न यांचे निधन झाले आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेट विश्वात चिंतेचे वातावरण आहे.
एक काळ असा होता की जेव्हा शेन वॉर्न आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांची भर सामन्यात चांगलीच जुगलबंदी रंगायची. शेन वॉर्न यांनी काही काळ ऑस्ट्रेलियन संघाची धुराही सांभाळली. त्यांनी तब्बल १९४ एक दिवसीय सामने खेळले. त्यात २९३ गडी टिपले. तर, १४५ कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी ७०८ गडी बाद केले. याशिवाय ते आयपीएल क्रिकेट सामनेही खेळले. ५५ आयपीएल सामन्यांमध्ये त्यांनी ५७ गडी बाद केले. शेन वॉर्नने २००७ मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. ऑस्ट्रेलियाला विश्वविजेतेपद मिळवून देण्यात तसेच, अनेक मालिका जिंकवून देण्यात वॉर्न यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या निधनाने क्रिकेट विश्वाला मोठा धक्का बसला आहे.
https://twitter.com/FoxCricket/status/1499746033085345796?s=20&t=ajWsEwPFqndNyJRuwo7ZjQ