इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – लग्नानंतर पती पत्नीचे नाते अत्यंत पवित्र मानले जाते. परंतु या पवित्र नात्याला काळीमा फासण्याचा प्रकार एका नवविवाहीत पुरूषाने केला असून त्याने पत्नी वर अनेकदा अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. आग्रामध्ये पती-पत्नीमधील एक प्रकरण समोर आले आहे, यात लग्नाच्या पहिल्या रात्रीपासूनच पतीने पत्नीकडून विचित्र मागण्या करण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर गोवा आणि दिल्लीतील अनेक हॉटेल्समध्ये नेऊन पत्नीशी अनैसर्गिक संबंध प्रस्थापित केले. पत्नीने विरोध केला असता पतीने तिला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. पत्नीच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सासूसह पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडितेने पोलीस अधिकाऱ्यांकडे याबाबत अर्ज दिला होता. त्यांच्या आदेशावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर काही तासांतच पोलिसांनी आरोपी पती वत्सल आहुजाला पकडले. तो त्याच्या बीएमडब्ल्यू कारमध्ये जात होता. यावेळी पोलिसांनी कारही ताब्यात घेतली आहे.
पोलिसांनी सांगितले की, एका बूट निर्यातदार व्यावसायिकाच्या मुलीचे लग्न मागील वर्षी भरतपूर मधील रहिवासी विजय कुमार आहुजा यांचा मुलगा वत्सल आहुजा याच्याशी झाले होते. हनीमूनला पती दारूच्या नशेत आल्याचा आरोप विवाहितेने खटल्यात केला आहे. तसेच जबरदस्तीने अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याचा विरोध केल्यावर तिला जनावरासारखी वागणूक देण्यात आली.
दरम्यान, लग्नानंतर तिला कळले की, पतीचे त्याच्या मित्रासोबत समलैंगिक संबंध आहेत. म्हणूनच त्याला तिच्यासोबत असे अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवायचे आहेत. तसेच पतीने तिच्यासोबत गोव्यातील हॉटेल, दिल्लीतील फ्लॅटसह अनेक ठिकाणी गैरवर्तन केले. तिच्या संमतीशिवाय काही संबंधांचे व्हिडिओ बनवले. पतीने हा व्हिडिओ मित्रांसोबत शेअर केल्याचा तिला संशय आहे. यामध्ये तिच्या पतीसोबत संबंध असलेल्या मित्र- मैत्रिणीचाही समावेश आहे.
वाढदिवसाच्या पार्टीनंतर त्याने दारूच्या नशेत पत्नीला मारहाण केली आणि रात्री तोच गैरप्रकार केला. मागील वर्षी डिसेंबर मध्ये ती पतीसोबत गोव्याला एका नातेवाईकाच्या लग्न समारंभासाठी गेली होती. तिथल्या एका हॉटेलमध्येही रात्री तिच्यासोबत असाच गैरप्रकार केला. दिल्लीत परत येऊनही अशी दुष्कृत्ये केली. त्यानंतर जानेवारीमध्ये पीडितेची प्रकृती बिघडल्याने तिला इमर्जन्सीमध्ये रुणालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पीडितेचे मेडिकल करण्यात आले आहे. विवाहितेचा आरोप खरा असल्याची मेडिकलमध्ये पुष्टी झाली आहे. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले. सुनावणीनंतर आरोपीला कारागृहात पाठवण्यात आले. या दरम्यान पीडितेने आरोप केला आहे की तिने पतीच्या कृत्याबद्दल सासरे विजय आहुजा आणि सासू ललिता आहुजा यांच्याकडे तक्रार केली. तेव्हा त्यांनी तिला गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली. तसेच तिने दिल्लीत पती आणि सासरच्या लोकांविरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.