इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अमेरिकेत एका सहा वर्षीय मुलीवर कुत्र्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये मुलीच्या चेहऱ्याला गंभीर इजा झाली असून एक, दोन नव्हे तर चक्क एक हजार टाके लावण्याची वेळ त्या चिमुकलीवर आली आहे. अमेरिकेतील या प्रकाराने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
पाळीव प्राण्यांमध्ये सर्वांत वरच्या क्रमांकावर कुत्र्याचा क्रमांक लागतो. कुत्रा हा प्रामाणिक पाळीव प्राणी असल्याचे म्हटले जाते. बरेच जण कुत्रा चोरांपासून संरक्षणासाठीदेखील ठेवतात. मनुष्याचा जवळचा मित्र म्हणविला जाणारा हा कुत्रा त्याच्यावर अंगावरदेखील येत असतो. कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याच्या घटना आपण नेहमी ऐकत असतो. असाच एक प्रकार अमेरिकेत घडला आहे.
अमेरिकेत लिली नावाच्या सहा वर्षीय मुलीवर पिट बुल हा जगातील सर्वांत धोकादायक जातीच्या कुत्र्याने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या लिलीला रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून तिच्या चेहऱ्यावर १ हजार टाके लागले आहेत. या घटनेवर बोलताना लिलीची आई डोरोथी नॉर्टन म्हणाली,‘लिलीच्या चेहऱ्यावरील त्वचेला टाके लावण्यात आले असून चेहरा विद्रूप झाला आहे. माझ्या मुलीची ही अवस्था पाहून मी रडू थांबवण्याचा खूप प्रयत्न करत आहे, पण अश्रू ओघळत आहेत.’
अशी घडली घटना
प्राप्त माहितीनुसार, लिली १८ फेब्रुवारीला शेजाऱ्यांच्या घरी तिच्या मित्रासोबत खेळत होती. यावेळी मित्राची आई त्यांच्याकडील कुत्र्यासोबत तिथे उपस्थित होती. कुत्र्याने अचानकपणे लिलीवर हल्ला केला. तिच्या चेहऱ्याचा चावा घेतला. लिली टेबलावर बसलेली असताना कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला. लिलीने स्वतःचे संरक्षण करण्यासाठी तिचे खांदे वर केले. त्यामुळे कुत्रा तिच्या मानेला चावू शकला नाही. ही घटना घउल्या तिच्या मैत्रिणीची आई बाथरुममधून बाहेर आली. तिने कुत्र्याच्या तावडीतून लिलीची सुटका केली.
Shocking Dog Attack on Small Girl 1000 Stitches