इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मनुष्याच्या जीवनात काही चांगल्या तर काही वाईट आठवणी असतात. त्यापैकी चांगल्या आठवणी आपण जतन करून ठेवतो, तर वाईट आठवणी विसरण्याचा प्रयत्न करतो. परंतु एका माणसाने त्याच्या जीवनातील घडलेली वाईट घटना त्याने चक्क आठवण म्हणून फ्रेम करून ठेवली आहे! काय आहे ती नेमकी घटना? त्याचे असे झाले की, एका व्यक्तीने सॅमसंग कंपनीचा फोन विकत घेतला होता परंतु त्या फोन मध्ये अचानक बिघाड झाल्याने त्याने वॉरंटी संपण्याच्या दुरुस्तीसाठी कंपनीकडे पाठवला. परंतु कंपनीने फोन दुरुस्त करुन देण्या ऐवजी चक्क त्यासाठी 25 हजार रुपये खर्च येईल आणि तो कंपनी करणार नसून स्वतः ग्राहकांनी करायचा आहे असे सांगितले त्यामुळे त्या ग्राहकाने त्या फोनची चक्क फ्रेम करून आपल्या घरात लावली.
सॅमसंगचा फोल्डेबल फोन जगभरात लोकप्रिय आहे. प्रत्येकाला तो विकत घ्यायचे आहे परंतु महाग असल्याने ते अनेकांच्या बजेटबाहेर आहे. एका युजरला या सॅमसंग फोल्डेबल फोनचा वाईट अनुभव होता. अलीकडेच या स्मार्टफोनबद्दलचा त्याचा वाईट अनुभव शेअर केला आहे. त्या व्यक्तीने आता कंपनीच्या पत्रासह फोन फ्रेम करून घेतला आहे.
जुहानी लेहतिमाकी नावाच्या वापरकर्त्याने त्याच्या ब्लॉगपोस्टमध्ये म्हटले आहे की, तो पुन्हा कधीही सॅमसंग डिव्हाइस खरेदी करणार नाही. कारण त्याने नवीन फोल्डेबल स्मार्टफोन विकत घेण्याचा निर्णय घेतला. हँडसेटचे पुनरावलोकन केले होते सुरुवातीला, युनिक डिझाइन आणि फॉर्म फॅक्टरमुळे जुहानी या उपकरणावर समाधानी होती. मात्र तीन महिन्यांनंतरच आपत्ती ओढवली.
एके दिवशी, त्याने खिशातून फोन काढला आणि वरच्या डिस्प्लेचा मधला भाग काळा होत असल्याचे त्याने पाहिले. याशिवाय, डिस्प्लेच्या वरच्या अर्ध्या भागाने प्रतिसाद देणे देखील बंद केले. हा काळा भाग देखील वाढू लागला आणि लवकरच संपूर्ण डिस्प्लेने काम करणे बंद केले.
लेहतिमाकी यांचा दावा आहे की, त्यांनी कधीही त्यांचा फोन पडू दिला नाही आणि त्याची खूप काळजी घेतली. त्यामुळे, फोन वॉरंटी अंतर्गत असल्याने त्यांनी तो दुरूस्तीसाठी पाठवला, त्यांना वाटले की ही मोठी समस्या असू शकत नाही. मात्र कंपनीने सांगितले की त्यांच्या Galaxy Z Flip3 हा फोन वॉरंटी अंतर्गत दुरुस्ती केली जाऊ शकत नाही. कारण डिव्हाइसच्या तांत्रिक तपासणी दरम्यान, आढळले की, डिस्प्ले व्यतिरिक्त, फ्रेम देखील तुटलेली आहे आणि नुकसान पडणे, वाकणे किंवा जास्त दाब यामुळे झाले असावे.
या ग्राहकासाठी आणखी वाईट गोष्ट म्हणजे, कंपनीने सांगितले की डिस्प्ले ठीक करण्यासाठी अंदाजे 25 हजार रुपये खर्च येईल. आणि हा खर्च कंपनी करणार नाही, तर ग्राहक जुहानी यांनी करावयाचा आहे, कंपनी ग्राहकाला एक पैसाही देणार नाही, असा निर्णय घेतला. यानंतर जुहानीने ही घटना कायमस्वरूपी लक्षात ठेवण्यासाठी तुटलेल्या फोनची फ्रेम रिजेक्शन मेलसह करण्याचे ठरवले, आणि ती आपल्या घरात लावली.