कोची – केरळमध्ये पुराने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. अतिवृष्टीमुळे नद्या-नाल्यांना महापुरच आला आहे. त्यामुळे अक्षरशः होत्याचे नव्हते बघण्याची वेळ अनेकांवर आली आहे. कोट्टायम जिल्ह्यातील मुंडाकायम येथे पुराच्या पाण्याचा वेग एवढा जबरदस्त होता की, एका गावातील अख्खा बंगलाच पुराने गिळल्याची धक्कादायक बाब कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्यामुळेच हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियात प्रचंड व्हायरल झाला आहे. बघा हा अतिशय थरारक व्हिडिओ
https://twitter.com/ANI/status/1449912631007973380