इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – फेसबुक वापरकर्त्यांसाठी अतिशय चिंताजनक बातमी आहे. कारण, फेसबुक लॉग इन करताच अनेकांचे बँक खाते चक्क रिकामे होत आहे. पैसे चोरण्यासाठी हॅकर्सने आता हा नवा फंडा शोधून काढला आहे. त्यामुळे फेसबुक युझर्समध्ये चिंतेचे वातावरण आहे.
सायबर तज्ज्ञांनी सांगितले आहे की, जगभरात ५ दशलक्षाहून अधिक फेसबुक वापरकर्त्यांना लक्ष्य करण्याची मोठी मोहिम हॅकर्सद्वारे चालवली जात आहे. मोबाईलवर फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून त्याचा झपाट्याने प्रसार होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे याच्या फिशिंग हल्ल्याची माहिती आता मिळाली असली तरी गेल्या एक वर्षापासून हा सर्व प्रकार सुरू आहे.
अँटी-फिशिंग ब्राउझर एक्स्टेंशन PIXM चे निक एस्कोली यांनी या हल्ल्याचा पर्दाफाश केला आहे. त्यांच्या संशोधन टीमला असे आढळून आले की, फेसबुक लॉगिन पेजेस सारख्या अनेक वेबसाइट्स आहेत. मोठ्या संख्येने वापरकर्ते त्यांचे लॉगिन तपशील एंटर करतात ते खरे Facebook आहे. या वेबसाइट्सच्या लिंक्स मॅसेंजरवर वाढत्या प्रमाणात पसरत आहेत.
अशाप्रकारे हॅकर्स प्रचंड पैसा कमवत असल्याचे अहवालात म्हटले आहे. समजा एकदा वापरकर्त्याने बनावट वेबसाइटवर त्यांचे Facebook तपशील प्रविष्ट केले, तर त्यांना एक जाहिरात दिसते. या बनावट लॉगिन पेजवर हॅकर्स एका पीडित व्यक्तीकडून महिन्याला शेकडो डॉलर्स देखील कमवू शकतात.
ही खबरदारी घ्या
– तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, संशयास्पद ऑनलाइन घोटाळ्याचा संदेश दिसल्यास कोणत्याही लिंक किंवा अटॅचमेंटवर क्लिक करू नका.
– जर तुम्हाला वाटत असेल की संदेश किंवा वेबसाइटमध्ये काहीतरी चुकीचे आहे, तर सावधगिरीने पुढे जा.
– अनोळखी वेबसाइटवर फेसबुक कधीही लॉग इन करू नका.
– जर तुम्हाला अशी बनावट वेबसाईट आढळली तर तुम्ही त्याची त्वरित सायबर क्राईम सेलला तक्रार करा
shocking after login facebook bank account empty cyber crime hacking spam username password