नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अवघ्या ८ महिन्यांच्या बाळाने नेकलटर गिळले. बाळ सतत रडत असल्याने आई-वडिलांना बाळाला तातडीने दवाखान्यात नेले. त्यानंतर डॉक्टरांनी तपासणी केली असता बाळाने नेलकटर गिळल्याचे स्पष्ट झाले. अखेर शस्त्रक्रिया करुन हे नेलकटर काढण्यात आले आहे. त्यामुळे आता बाळ सुखरुप आहे.
पालकांनो, आपल्या घरात जर लहान बाळ असेल तर तुम्हाला अलर्ट करणारे हे वृत्त आहे. कारण, लहान बाळ कधी कोणती वस्तू तोंडात टाकेल हे सांगता येत नाही. असाच एक प्रकार नाशिकरोडच्या के जे मेहता शाळा परिसरात घडला आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास आठ महिन्यांच्या एका बाळाला मेडिकल कॉलेजमध्ये उपचारार्थ आणण्यात आले. हे बाळ सातत्याने रडत असल्याने कुटुंबिय प्रचंड चिंतेत होते. बाळाने काही तरी गिळले असल्याची शंका डॉक्टरांना आली. त्यामुळे त्यांनी बाळाच्या गळ्याचा आणि पोटाचा एक्सरे काढला. त्यात हे लक्षात आले की, बाळाने चक्क नेलकटर गिळले आहे. त्यानंतर या बाळावर दुर्बिणीच्या सहाय्याने शस्त्रक्रीया करण्यात आली, यावेळी बाळाला कुठलीही इजा झाली नाही. अतिशय सुरक्षितपणे नेलकटर बाळाच्या गळ्यातून काढण्यात आले. आता बाळाची प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. मात्र, बाळाने चक्क नेलकटर गिळल्याचे पाहून डॉक्टरांसह बाळाचे आई-वडिल आणि कुटुंबियही आश्चर्यचकीत झाले. वेळीच उपचार मिळाल्याने बाळ सुखरुप आहे. अन्यथा अनावस्था प्रसंग ओढावला असता असे डॉक्टरांनी सांगितले आहे.
Shocking 8 Month Old Baby Swallowed a nail cutter
Nashik Health